Current Affairs of 22 May 2015 For MPSC Exams

तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा :

 • तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी शुक्रवार राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आहे.
 • तसेच मुख्यमंत्रीपदासाठी जे. जयललिता यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
 • उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी न्यायालयातून निर्दोष सुटका झाली त्यामुळे त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाच्या दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय :

 • राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन वर्ग वेळेवर सुरू व्हावेत, म्हणून यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम अचूकपणे भरावे लागतील.
 • तसेच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्याही दोनच प्रवेश फेऱ्या करण्याचा संचालनालयाचा विचार आहे.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 20 May 2015

राष्ट्रीय लोकशाही आघाडी कामकाजाचा अहवाल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्‍वभूमीवर वर्षभरात केलेल्या कामकाजाचा अहवाल विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 • pib.nic.in/nda/ या संकेतस्थळावर सरकारने वर्षभरात केलेल्या कामाची मंत्रालयानुसार माहिती देण्यात आली आहे.
 • तसेच या संकेतस्थळावर विविध छायाचित्रे, व्हिडिओज्‌, यशोगाथांचेही संकलन करण्यात आले आहे.

बॅडमिंटनपटून साईना नेहवालचे पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान :

 • भारताची बॅडमिंटनपटून साईना नेहवाल हिने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे.
 • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्लूएफ) तर्फे आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत साईनाला पहिले स्थान देण्यात आले आहे.
 • यापूर्वी गेल्या महिन्यात साईनाने प्रथमच क्रमवारीत पहिले स्थान मिळविण्याची कामगिरी केली होती. पण, पराभवामुळे तिला हे स्थान गमवावे लागले होते.
 • तसेच बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची घसरण होऊन ती 12 व्या स्थानावर पोहचली आहे.
 • पुरुषांच्या क्रमवारीत के. श्रीकांतने पुन्हा चौथे स्थान मिळविले आहे. तर, पी. कश्यप आणि एच. एस. प्रणॉय 13 आणि 15 व्या स्थानावर आहेत.

पश्‍चिम बंगालमधील विष्णुपूर या शहराला वारसा शहराचा दर्जा :

 • मध्ययुगातील टेराकोट्टा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले आणि देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा लाभलेले पश्‍चिम बंगालमधील विष्णुपूर या शहराला वारसा शहराचा दर्जा दिला जाणार आहे.
 • काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच या विष्णुपूरला वारसा शहराचा दर्जा दिला जावा, अशी शिफारस केंद्राकडे केली होती.
 • पाल यांनी त्याला आता मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले.
 • वैशिष्ट्य :
 • बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर हे शहर कोलकत्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून, मल्ल राजवटीमध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकात येथे प्रसिद्ध टेराकोट्टा मंदिराची उभारणी करण्यात आली.
 • हे शहर बालीचारी साड्या, टेराकोट्टा खेळण्या आणि बांकुराकालीन घोड्याच्या मूर्ती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
 • येथील मल्ल राज्यकर्ते संगीत कलेचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात. कधीकाळी येथील विष्णुपूर घराण्याचा संगीत क्षेत्रामध्ये मोठा दबदबा होता.

झांबिया  सरकारचा बिबटे आणि सिंहाच्या शिकारीवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय :

 • बिबटे आणि सिंहांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या शिकारीवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय झांबियाच्या सरकारने केला आहे.
 • पुढील वर्षीपासून हा निर्णय अमलात येणार असल्याचे पर्यटन मंत्री जेन कपाटा यांनी सांगितले.
 • आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असलेल्या झांबियाने सिंहांसह धोक्‍यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीवर 2013 पासून बंदी घातली होती.

बीएसएनएल मोबाइल इंटरनेट ग्राहकांना इंटरनेट डेटा पुन्हा वापरता येणार :

 • भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) मोबाइल इंटरनेट ग्राहकांना आधीच्या रिचार्जमधील शिल्लक राहिलेला (बॅलन्स) इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना त्यात जमा होणार आहे.
 • यापूर्वी रिचार्जची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेला डेटा पुन्हा वापरता येत नव्हता.
 • बीएसएनएल ही सवलत फक्त 2 जी आणि 3 जी मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात आल्याचे, बीएसएनएलकडून जाहीर करण्यात आले आहे.
 • या सवलतीचा लाभ फक्त प्री-पेड ग्राहकांनाच मिळणार आहे.

दिनविशेष :

 • 1772 – समाजसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय यांचा जन्म.
 • 1989 ‘अग्री’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 23 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.