Current Affairs of 20 May 2015 For MPSC Exams

“वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन’ योजना राबविण्याचा निर्णय :

  • आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्यसरकारने “वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन” अर्थात वॉश ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने 250 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
  • यातून विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय आणि स्वच्छतापूर्वक वातावरण निर्माण करण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे उद्दिष्ट समोर ठेवून “स्वच्छ भारत मिशन” हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला.
  • शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव करून देणे, स्वच्छतेचा प्रसार व प्रचार करणे, तसेच आरोग्य सुविधा पुरविण्याचे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • वॉश योजना टप्प्याटप्प्याने सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळा, तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये राबविण्यात येणार असून, सुरवातीला हा कार्यक्रम आदिवासी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमध्ये 2015-16 या शैक्षणिक वर्षांपासून राबविण्यात येणार आहे.
  • योजना यशस्वी होण्यासाठी “युनिसेफ” या आंतरराष्ट्रीय संस्थेने राज्यसरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 19 May 2015

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचा एकत्र येण्याचा निर्णय :

  • तालिबानी दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि अफगाणिस्तानातील गुप्तचर संस्था असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने (एनडीएस) गुप्तवार्तांची देवाण-घेवाण करण्याबाबतच्या कराराला मंजुरी दिली.
  • गुप्तचर संस्थांमध्ये माहितीचे आदान-प्रदान, गुप्तचर संस्थांची संयुक्त कारवाई आदी मुद्‌द्‌यांबाबत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

देशांमधील भागीदारीस “विशेष व्यूहात्मक भागीदारी”चा दर्जा देण्यात आल्याची घोषणा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण कोरियामधील दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील भागीदारीस “विशेष व्यूहात्मक भागीदारी”चा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
  • द्विस्तरीय कर टाळण्यासंदर्भातील करारासहित भारत व दक्षिण कोरियामध्ये सात महत्त्वपूर्ण करार झाले असून, दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य अधिक वाढविण्यासंदर्भात परस्पर सहमती दर्शविली.
  • दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्था व लष्करांमधील सहकार्य अधिक वाढविण्याचा निर्णयही या चर्चेदरम्यान घेण्यात आला आहे.
  • तसेच संरक्षण क्षेत्रामधील तंत्रज्ञान आणि संरक्षण साहित्याचे भारतामधील उत्पादन, या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनविशेष :

  • 1498 – वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत बंदरात आला.
  • 1850 – आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
  • 1902क्युबाचा स्वातंत्र्यदिन
  • 2005 – महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे चार कंपन्यांत विभाजन

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 22 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.