Current Affairs of 19 May 2015 For MPSC Exams

भारत आणि दक्षिण कोरियात सात करार :

  • भारत आणि दक्षिण कोरियात दुहेरी करपद्धती टाळणे यांसारख्या विषयांसह सात करारांवर सह्या झाल्या आहेत.
  • तसेच विशेष रणनीती भागीदारीसह द्विपक्षीय संबंध वाढविणे तसेच संरक्षण क्षेत्रात आणखी सहकार्य वाढविणे यांसारख्या मुद्‌द्‌यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन-हे यांच्याबरोबर चर्चा केली.
  • दक्षिण कोरियाने पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटींचा विकास, वीजनिर्मिती आणि अन्य बहुउद्देशीय क्षेत्रांसाठी भारताला 10 अब्ज डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला.
  • तसेच मोदींनी या दौऱ्यात दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांसमवेत संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, प्रादेशिक सहकार्य यांसारख्या मुद्‌द्‌यांवर विस्ताराने चर्चा झाली आणि हे मुद्दे गतीने सोडविण्यावर एकमत झाले.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 18 May 2015

अरुणा शानबाग यांचा मृत्यू :

  • अरुणा शानबाग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले.
  • त्या 65 वर्षाच्या होत्या.
  • वॉर्डबॉयकडून झालेली अमानुष मारहाण व बलात्कारामुळे तब्बल 42 वर्षे कोमात गेल्या होत्या.

दिनविशेष :

  • 1904 – टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचे निधन.
  • 1913 – माजी राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचा जन्म
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 20 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.