Current Affairs of 18 May 2015 For MPSC Exams

राज्यात कृती दल स्थापन करण्यात येणार :

  • केंद्राच्या नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार आहे.
  • तसेच प्रत्येक सरकारी विभागाला आता कॉर्पोरेट प्रणालीप्रमाणे काम करावे लागणार आहे.
  • विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांच्या समन्वयाने हे दल काम करणार असून विविध विभागाचा कामाचा आढावा घेणारी पुस्तिका कृती दलातर्फे तयार करण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या फेब्रुवारीत नवी दिल्लीत नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीत सर्व राज्यांच्या विविध विभागात विशेष कृती दल स्थापन करण्याची सूचना केली होती.
  • त्यानुसार महाराष्ट्र सरकारने कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक न्याय, ग्रामविकास, आदिवासी विकास, नगरविकास आदी विभागांचा “मेकओव्हर‘ करण्याचे ठरविले आहे.

येमेनमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने चर्चेला सुरवात :

  • येमेनमध्ये शांततेसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने आज चर्चेला सुरवात झाली.
  • येमेनचे सुमारे चारशे राजकीय नेते आणि आदिवासी नेते हे सभेला उपस्थित होते.

राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांची नव्या पक्षाची घोषणा :

  • राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते आणि माधेपुराचे विद्यमान खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली.
  • “जन क्रांती अधिकार मोर्चा” असे नव्या पक्षाचे नाव असून, आपला पक्ष बिहारमध्ये मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून देईल असे यादव यांनी सांगितले.
  • बिहार विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये घेण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आजच केली होती.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 16 May 2015

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत पुरविण्याची घोषणा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाची आर्थिक क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी एक अब्ज डॉलरची पतरेषा (मदत) पुरविण्याची घोषणा केली.
  • स्टेट पॅलेसमध्ये सैखानबिलेग यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांनी घोषणा केली.
  • मंगोलियासोबतचे संबंध ‘सर्वसमावेशक’ ते ‘राजनैतिक भागीदारी’ पर्यंत वाढविण्यासाठी भारताने मंगोलियासाठी एक अब्ज डॉलरची पतरेषा जाहीर केली.
  • नरेंद्र मोदी हे मंगोलियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
  • तसेच दोन्ही देशांमध्ये चौदा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून संरक्षण, सायबर सुरक्षा, शेती, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात करार केले.

उत्तर प्रदेश सरकारची समाजवादी जल एटीएम योजना :

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘समाजवादी शीतल पेयजल योजनेंतर्गत’ जल एटीएमचे उद्घाटन केले.
  • या एटीएमद्वारे बस प्रवाश्यांना स्वस्त दरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
  • त्यानुसार साध्या पाण्यासाठी 1 रुपये / प्रतिलिटर  आणि थंड पाण्यासाठी 2 रुपये / प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत.

पंजाब राज्य मृदा स्वास्थ्य कार्ड देणारे :

  • केंद्र सरकारच्या मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेंतर्गत पंजाब राज्य 12 मे 2015 रोजी मृदा स्वास्थ्य कार्ड देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
  • केंद्र सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोबाइल मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे.
  • सध्या पंजाब सरकारने अशा 66 प्रयोगशाळा स्थापन केल्या असून, एका वर्षात 3.5 लाख नमुन्यांचे परीक्षण करण्याची त्यांची क्षमता आहे.

हरभजन कौर धीर यांची ब्रिटनमधील महापौरपदी नियुक्त :

  • भारतीय वंशाची हरभजन कौर धीर 12 मे 2015 रोजी ब्रिटनमधील महापौरपदी नियुक्त होणारी पहिली आशियायी महिला ठरली.
  • विक्टोरिया हॉलमध्ये आयोजित एका समारंभात 62 वर्षीय हरभजन कौर धीर यांना तेज राम बाघा यांच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
  • हरभजन कौर यांनी अनेक शाळांचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे. तसेच कौर मानसिकरित्या अशक्त मुले व वृद्ध यांच्या अधिकारांसाठी कार्य करतात.
  • हरभजन कौर धीर यांचा जन्म 1953 मध्ये पंजाब मध्ये झाला होता. त्या 1975 साली भारतातून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या.

दिनविशेष :

  • 1962 – हिंदुस्थानी संगीतकार आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खॉ पैगंबरवासी झाले.
  • 1972 – महाराष्ट्रातील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाली.
  • 1974 – राजस्थान वाळवंटात पोखरण येथे भारताने भूमिगत अणुस्फोट चाचणी केली.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 19 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.