Current Affairs of 23 May 2015 For MPSC Exams

प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषदेचे शनिवारी उद्घाटन :

  • भारतीय जनता पार्टीच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषदेचे शनिवारी उद्घाटन होणार आहे.
  • पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभरातील सत्रासाठी पक्षाचे अन्य मंत्री व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
  • शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावर पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषद होत आहे.
  • तसेच या वेळी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 22 May 2015

जी. मोहनकुमार यांची नवे संरक्षण सचिवपदी नियुक्ती :

  • भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी जी. मोहनकुमार यांची नवे संरक्षण सचिवपदी शनिवारी नियुक्ती करण्यात आली.
  • मोहनकुमार हे ओदिशा केडरच्या 1980 चे अधिकारी असून सध्या संरक्षण उत्पादन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत.
  • मोहनकुमार यांच्या नियुक्तीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने शिक्कामोर्तब केले असून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्या तारखेपासून त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल, असे संबंधित आदेशात म्हटले आहे.
  • विद्यमान संरक्षण सचिव राधाकृष्ण माथूर यांची मुदत येत्या 28 मे रोजी संपत असून त्यांच्याकडून मोहनकुमार सूत्रे स्वीकारतील.

मनमोहन सिंग यांनी घेतले कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भातील निर्णय :

  • कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भातील सर्व अंतिम निर्णय तत्कालीन कोळसा मंत्री या नात्याने मनमोहन सिंग यांनीच घेतल्याची माहिती माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी दिली.

दिनविशेष :

  • 1795 – ब्रिटीश वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स बॅरी यांचा जन्म.
  • 1984 – श्रीमती बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.
  • 1919 – राजमाता महाराणी गायत्री देवी यांचा जन्म.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 25 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.