Current Affairs of 22 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (22 एप्रिल 2016)

‘पंतप्रधान सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी’ पुरस्कार :

 • मूळचे सोलापूरचे व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘पंतप्रधान सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी’ पुरस्कार (दि.21) प्रदान करण्यात आला.
 • जनधन योजनेची सर्वात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नरेंद मोदी यांनी जोशी यांचे कौतुक करत त्यांना पुरस्कार प्रदान केला.
 • हरियाणा केडरमध्ये काम करणाऱ्या जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे.
 • अजित जोशी हे 2003 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्टात अव्वल तर देशात 29 वा कमांक मिळवला होता.
 • अजित जोशी यांनी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी जनधन योजना जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना, अत्यंत पभावीपणे अंमलबजावणी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
 • तसेच त्याची नोंद घेऊन भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च ‘प्राईम मिनिस्टर अॅवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
 • प्रभावी प्रसार व प्रचार यंत्रणा राबवून अजित जोशी यांनी निर्धारित वेळेपूर्वीच तब्बल 2 लाख 20 हजार खाती या योजनेअंतर्गत उघडली.
 • तसेच या योजनेशी अटल पेन्शन योजना व इतर योजनांना जोडून दीड लाखाहूंन अधिक नागरिकांना विमाकवच पुरविले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 एप्रिल 2016)

ग्रीसचे प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे रिओचे ‘काउंटडाउन’ सुरू :

 • ग्रीसचे प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे (दि.21) ऑलिम्पिक ज्योतीचे शानदार सोहळ्यात प्रज्वलन करण्यात आले.
 • तसेच यासोबतच ब्राझीलच्या रिओत ऑगस्ट महिन्यात आयोजित सर्वांत मोठ्या क्रीडा महाकुंभाचे काउंटडाउन सुरू झाले.
 • ब्राझीलमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आयोजक मात्र ऑलिम्पिक यशस्वी करण्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहेत.
 • ऑलिम्पिया येथील प्राचीन स्टेडियममध्ये एका अभिनेत्रीने हेरा मंदिरात काचेच्या मदतीने सूर्यकिरणांनी क्रीडाज्योतीचे पारंपरिक प्रज्वलन केले.
 • मशाल प्रज्वलित होताच ग्रीसचा जिम्नॅस्ट विश्वविजेता लेफ्टेरिस पेट्रोनियास याने रिलेला सुरुवात केली.
 • लेफ्टेरिस पेट्रोनियास याने ब्राझीलचा दोनदा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या व्हॉलिबॉल संघातील खेळाडू जियोनावे गाबियो याच्याकडे ज्योत सोपविली.

जेनिफर अॅनिस्टन ही जगातील सर्वात सुंदर महिला :

 • पीपल मॅगझिनने 2016 या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे.
 • पीपलच्या कव्हरपेजवर 47 वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.
 • अमेरिकन टेलिव्हीजनवरील ‘फ्रेंडस’ या शो मधील राचेल हे तिचे पात्र गाजले, या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली.
 • कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जाडेपणा काम मिळण्यामध्ये आडवा येत असल्याचे एजंटने सांगितले.
 • तसेच त्यानंतर मी स्वत:वर मेहनत घेतली, जेव्हा मी तंदुरुस्त असते तेव्हा मला आनंदी वाटते असे जेनिफरने पीपल्स मॅगझिनशी बोलताना सांगितले.

पाकिस्तान अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्स विकत घेणार :

 • अमेरिका पाकिस्तानला एएच-1 झेड व्हायपर प्रकारची नऊ हेलिकॉप्टर्स विकणार आहे, त्यांची किंमत 17 कोटी डॉलर्स आहे.
 • बेल एच 1 झेड व्हायपर हेलिकॉप्टर्स दोन इंजिनांची असून ती एएच 1 डब्ल्यू सुपरकोब्रा या हेलिकॉप्टर्सची आवृत्ती आहे.
 • ओबामा प्रशासनाने अलीकडे पाकिस्तानला आठ एफ 16 विमाने विकण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता हेलिकॉप्टर्सही दिली जाणार आहेत.
 • 6 एप्रिल 2015 ला परराष्ट्र खात्याने काढलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते, की अमेरिका पाकिस्तानला 95 कोटी डॉलर्सची लष्करी सामग्री देणार आहे.
 • पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या लष्करी सामुग्रीच्या मदतीअंतर्गत सप्टेंबर 2018 अखेरीस ही हेलिकॉप्टर्स दिली जाणार आहेत.
 • पाकिस्तानने एएत-1 झेड व्हायपर प्रकारची 15 हेलिकॉप्टर्स व  एडीएम 114 आर हेलफायर 2 प्रकारची 1000 क्षेपणास्त्रे, तर टी 700 जीई 401 सी प्रकारची 32 इंजिने मागितली होती.
 • भारताने तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी त्या वेळी पाकिस्तानला एफ 16 जेट विमाने देण्यास विरोध केला होता.

सीमा सुरक्षा साठी चीन-भारत चर्चेची 19 वी फेरी :

 • चीनभारत यांच्यात वादग्रस्त सीमा प्रश्नावर चर्चेची एकोणिसावी फेरी (दि.21) घेण्यात आली.
 • जैश ए महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालून र्निबध लागू करावे या भारताच्या प्रस्तावात चीनने कोलदांडा घातल्याने दोन्ही देशातील संबंध ताणले गेले असताना ही चर्चा झाली.
 • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल व त्यांचे चीनमधील समपदस्थ यांग जेइशी यांनी द्विपक्षीय पातळीवर सीमा प्रश्नी चर्चा केली.
 • सीमा प्रश्नाच्या व्यतिरिक्त वादग्रस्त द्विपक्षीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्देही चर्चेला होते.
 • चीनने या वर्षी लागोपाठ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या दहशतवादी नेत्यांविरोधात कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नात खीळ घातली आहे.
 • तसेच गेल्या महिन्यात मौलाना मसूद अझरवर र्निबधाच्या प्रस्तावात चीनने संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध समितीत नकाराधिकाराचा वापर केला होता.
 • अझरवर र्निबध घालण्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता होत नाही, असा दावा चीनने सुरक्षा मंडळात केला होता.
 • तसेच त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न उपस्थित केला होता.
 • अजित डोव्हल हे चीनचे पंतप्रधान ले केकियांग यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
 • संरक्षण मंत्री र्पीकर यांनीही केकियांग यांच्याशी अलीकडच्या भेटीत चर्चा केली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.