Current Affairs of 21 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (21 एप्रिल 2016)

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता :

 • राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 • तसेच 3679.76 कोटी रुपयांची ही केंद्रीय योजना आहे, यामध्ये 3640 कोटी रुपये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासाठी तर 39.76 कोटी रुपये राष्ट्रीय जलसूचना केंद्रासाठी ठेवण्यात आले आहेत.
 • प्रकल्पाच्या 50 टक्के रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज रुपात मिळणार आहे.
 • केंद्र सरकार हे कर्ज फेडणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम केंद्रीय सहाय्यतेच्या रुपात मिळेल, दोन टप्प्यात हा प्रकल्प लागू केला जाईल.
 • जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या अखत्यारीत स्वतंत्र संस्था म्हणून राष्ट्रीय जल माहिती केंद्राच्या निर्मितीची यात तरतूद आहे.
 • राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामुळे जल-हवामान-विषयक माहिती एकत्रित करण्यासाठी मदत होईल.
 • वास्तव काळाच्या आधारावर त्याचे विश्लेषणही केले जाईल.
 • आधीचा जलविज्ञान प्रकल्प 13 राज्यांपुरताच मर्यादित होता मात्र आता या प्रकल्पाची व्याप्ती देशभर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 एप्रिल 2016)

मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन समुद्रातून धावणार :

 • मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल 21 किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे.
 • तसेच त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे.
 • मुंबई ते अहमदाबाद या मार्गात 21 किलोमीटर अंतर समुद्रातील असून, तो भाग ठाण्याचा आहे.
 • तसेच तिथे बुलेट ट्रेनसाठी समुद्रामध्ये बोगदे बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सुधा मूर्ती यांना रयत माऊली पुरस्कार जाहीर :

 • रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ पुरस्कार शिक्षण आणि विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे.
 • अडीच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाते.
 • मात्र, सुधा मूर्ती सध्या अमेरिकेत आहेत, तसेच त्यांच्या सोयीनुसार हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या स्पर्धेत विजय क्लब विजयी :

 • विजय क्लब आणि अमर क्रीडा मंडळ या कसलेल्या संघांनी आपापल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना, आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी घोडदौड कायम राखली.
 • मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय क्लबने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात श्री साई क्रीडा मंडळाचा 44-12 असा पराभव केला.
 • तसेच मध्यंतरालाच विजय संघाने 18-8 अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले.
 • अजिंक्य कापरे आणि अमित चव्हाण यांनी तुफानी चढाया करताना प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदला, तर साई संघाच्या ज्ञानेश्वर चव्हाण आणि रवींद्र मांडवकर यांनी अनुक्रमे चढाया व पकडींच्या जोरावर अपयशी झुंज दिली.

आता व्हॉट्‌सऍप ग्रुपसाठी लागणार परवाना :

 • सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्‌सऍपवर ग्रुप तयार करण्यासाठी यापुढे परवाना घ्यावा लागणार आहे.
 • सोशल नेटवर्किंगवरून होत असलेल्या अफवा थांबवण्यासाठी जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने (दि.19) हा निर्णय घेतला आहे.
 • राज्यातील सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनासुद्धा या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
 • नियम तोडणाऱयांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
 • जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात (दि.19) बैठकीचे आयोजन केले होते.
 • तसेच यावेळी व्हॉट्‌सऍप न्यूज ग्रुपला नोंदणी करण्याचे आदेश दिले.
 • राज्यातील व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या ऍडमिनला पुढील दहा दिवसांमध्ये नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
 • व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून एखादा चुकीचा मजकूर प्रसिद्ध झाला तर ग्रुपचा ऍडमिनला त्याला जबाबदार असेल.
 • शिवाय, त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे, असेही प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे.

दिनविशेष :

 • 1909 : ज.द. गोंधळेकर (जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर), मराठी चित्रकार यांचा जन्म.
 • 1926 : एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी यांचा जन्म.
 • 1932 : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.