Current Affairs of 23 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 एप्रिल 2016)
एफटीआयआयचे नवे संचालक भूपेंद्र कैंथोला :
- भारतीय माहिती सेवेचे (आयआयएस) अधिकारी भूपेंद्र कैंथोला यांची पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- कैंथोला हे 1989 च्या तुकडीचे आयआयएस अधिकारी आहेत.
- कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) एका आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, ती तीन वर्षांसाठी असेल.
- सध्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
- तसेच या संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे गेले काही दिवस ही संस्था चर्चेत आहे, त्या पार्श्वभूमीवर कैंथोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
चीनच्या लष्करप्रमुखहपदी शी जिनपिंग यांची नियुक्ती :
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही (कमांडर इन चीफ) झाले आहेत.
- शी यांच्याकडे याआधीच कम्युनिस्ट पक्षाचे महासचिवपद (जनरल सेक्रेटरी) आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील लष्करी अधिकाऱ्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद आहे.
- तसेच या नव्या पदग्रहणामधून आता लष्करावर थेट सत्ता गाजविण्याची शी यांची मनीषा दिसून आल्याचे मानले जात आहे.
- गेल्या काही वर्षांत चीनच्या परराष्ट्र धोरणामधील आक्रमकता स्पष्ट झाली आहे.
- लष्कर हे ‘नि:शंकपणे एकनिष्ठ’ आणि ‘युद्धे जिंकण्याच्या क्षमतेचे’ असावयास हवे, असे शी यांनी पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.
- दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन सुरु असलेला राजनैतिक संघर्ष अधिकाधिक आक्रमक होण्याची चिन्हे असतानाच शी यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्यासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचे जागतिक राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
उज्जैनमध्ये महाकुंभाला सुरवात :
- उज्जैनला (दि.22) महाकुंभाला सुरुवात झाली.
- पहिल्या पवॅणीला मोठ्या उत्साहाने भाविक सहभागी झाले.
- क्षिप्रा नदीच्या तिरावर मध्यरात्री पासून रंगलेल्या साधू महंत व त्यांच्या समथर्ककांच्या शाही मिरवणूकांना मोठी गदी होती.
- उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तिरावर पश्चिमेला शैव पंथीयांच्या आखाड्यांच्या शाही मिरवणुका तर पूवेला वैष्णव आखाड्यांसह उदीसीन आखाड्यांनी मिरवणुकांनी येऊन त्यांच्या इष्टदेव व साधू महंतांना शाही स्नान केले.
- शैव पंथीय आखाड्याच्या नागा साधूनी पहाटे जौरदार मिरवणूका काढतांना नदीपात्रावरील वातावरण व उत्साहातील नूरच बदलून टाकला.
- दत्त आखाड्यापासून निघालेली पहिली मिरवणूक पहाटे पाचला येउन पौहौचली त्यानंतर एकेक आखाड्याचे चित्ररथ निघाले.
राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सहा खासदारांची नियुक्ती :
- प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
- राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त 10 पैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी सहा जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
- सातव्या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असून त्या जागेसाठी स्पर्धा आहे.
- सात सदस्यांच्या निवृत्तीनंतर तिथे कोणाच्या नियुक्ती होणार, यावर गेले काही दिवस दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आले होते.
- इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती.
- मात्र पक्षामध्ये एकमत न झाल्यामुळे सातव्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली नाही.
- राष्ट्रपती नियुक्त 10 सदस्यांपैकी दोन खासदार गेल्या नोव्हेंबरमध्ये, तर पाच सदस्य 2 एप्रिल रोजी निवृत्त झाले.
- तसेच उरलेले तिघे सदस्य 2018 साली निवृत्त होत आहेत.
चीनचा दक्षिण चीनी समुद्रात आण्विक उर्जा प्रकल्प :
- वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्रामध्ये सामुद्रिक आण्विक उर्जा प्रकल्प उभारण्याची चीनची तयारी जवळपास पूर्णत्वास पोहोचली असल्याचा दावा येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.
- तसेच या प्रकल्पामुळे दक्षिण चीनी समुद्रातील चीनच्या प्रकल्पांना ‘संरक्षण‘ देणे शक्य होईल, असेही त्यात नमूद केले आहे.
- गेल्या काही वर्षांमध्ये चीनने दक्षिण चीनी समुद्रातील बेटे बळकावून तिथे लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत.
- तसेच, या बेटांवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत.
- चीनच्या दाव्यानुसार मात्र, या सर्व सुविधा मुख्यत्वे नागरी हेतूंसाठी आहेत.
- ‘द ग्लोबल टाईम्स‘ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, या भागातील आण्विक उर्जा प्रकल्पांमुळे दुर्गम भागातही उर्जा पोहोचविण्याचा उद्देश साध्य केला जाऊ शकतो.
- चीनचे लक्ष्य असलेल्या दक्षिण चीनी समुद्रामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असल्याची शक्यता आहे.
- ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि व्हिएतनाम या देशांचाही या भागावर अधिकार आहे.
गुलाम अली यांना हनुमंत पुरस्कार प्रदान :
- पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना (दि.22) गुजरातमधील एका कार्यक्रमात हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
- आध्यात्मिक गुरू मुरारी बापू यांच्या चित्रकूट धाम न्यासातर्फे 19 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजित अस्मिता पर्वाची (दि.22) भावनगर जिल्ह्य़ातील तलगजरदा गावात पुरस्कार कार्यक्रमाने सांगता झाली.
- तसेच त्यात गुलाम अली यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
- वास्तविक गुलाम अली यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने या पर्वाचे उद्घाटन होणार होते, पण त्यांचा कार्यक्रम ऐन वेळी काही अपरिहार्य कारणांनी रद्द करण्यात आला होता.
- गुलाम अली आणि अन्य पाच जणांना न्यासातर्फे हनुमंत पुरस्कार देण्यात आले.
- तर बॉलीवूड कलाकार धर्मेद्र यांच्यासह तिघांना नटराज पुरस्कार देण्यात आला.
दिनविशेष :
- 1564 (baptised) : विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक यांचा जन्म.
- 1858 : पंडिता रमाबाई यांचा जन्म.
- 1873 : विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे थोर समाजसुधारक यांचा जन्म.
- जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन (World Book & Copyright Day)
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा