Current Affairs of 21 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2015)
बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया (वय 75) यांचे निधन झाले.
- हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- दालमिया यांनी सुमारे तीन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटचे प्रशासक म्हणून काम पाहिले.
- तसेच याचवर्षी मार्चमध्ये ते दुसऱ्यांदा “बीसीसीआय”चे अध्यक्ष झाले होते.
- त्यांनी “आयसीसी”चे अध्यक्षपदही भूषविले आहे.
Must Read (नक्की वाचा):
शास्त्रज्ञांनी तयार केली “वंशावळ” :
- पृथ्वीवर साधारणपणे साडे तीन अब्ज वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सजीवसृष्टीचा वेध घेत शास्त्रज्ञांनी प्रथमच 23 लाख प्राणी, वनस्पती, बुरशी आणि जीवाणूंच्या प्रजातींची “वंशावळ” तयार केली आहे.
- आतापर्यंत वनस्पतींच्या काही प्रजातींची वंशावळी तयार केल्या होत्या.
- यामध्ये काही वंशावळींमध्ये एक लाखांहून अधिक प्रजातींची नावे आहेत.
- मात्र, आता प्रथमच सर्व शाखांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.
- एकूण अकरा संस्थांनी मिळून हे काम केले आहे.
- या वंशावळीमध्ये एका शाखेतील एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या प्रजातींमधील संबंधही दाखविण्यात आला आहे.
- पृथ्वीवर असणाऱ्या लाखो प्रजातींचा परपस्परांशी संबंध शोधत असतानाच शास्त्रज्ञांना नवी औषधे, पीक उत्पादन वाढविण्याबाबत माहिती मिळाली.
- तसेच, इबोला, एचआयव्हीसारख्या रोगांचे मूळ शोधण्यातही काहीसे यश आले आहे.
- नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस मध्येही त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ध्वज बैठकीचे आयोजन :
- जम्मू- नियंत्रण रेषेवर शांतता कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आज ध्वज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
- जम्मू आणि काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात “चकन दा बाग” येथे ही बैठक होत आहे.
- ब्रिगेडिअर कमांडर पातळीवरील ध्वज बैठक भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
- सीमेवरील शस्त्रसंधी भंगाच्या वारंवार होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही ध्वज बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बरोलिया गाव मनोहर पर्रीकर यांनी घेतले दत्तक :
- पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यापाठोपाठ केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील गाव दत्तक घेतले आहे.
- राहुल यांच्या अमेठी मतदारसंघातील बरोलिया गाव पर्रीकर यांनी पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे.
विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन केले तयार :
- युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचा विद्यार्थी पॅडी न्यूमन याने विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन तयार केले असून त्याने नासाचे सध्याचा इंधनाचा कमाल वापर करण्याचा विक्रम मोडीत काढल्याचे समजले जात आहे.
- न्यूमन हा विद्यापीठाचा भौतिकशास्त्राचा डॉक्टरेटचा विद्यार्थी आहे.
- आयन प्रोपल्शन (विद्युतभाराने पुढे ढकलणे) हे असे तंत्रज्ञान आहे की त्यात अंतरीक्ष यान पुढे ढकलण्यासाठीच्या वायूचे विद्युतभारित कणांत रूपांतर होते.
- अंतराळ यानाला प्रेरक शक्ती म्हणून पारंपरिक रासायनिक गॅसचा वापर करण्याऐवजी गॅस झेनोन (हा गॅस न्यूआॅन किंवा हेलियमसारखा; परंतु जड असतो) विजेची शक्ती देतो किंवा विद्युतभारित कणांत रूपांतर होतो.
- नासाचा सध्याचा इंधनाच्या कमाल वापराचा विक्रम हाय पॉवर इलेक्ट्रिक प्रॉपल्शन (एचआयपीईपी) सिस्टीमचा आहे.
- ही सिस्टीम निश्चित अशा प्रेरक शक्तीचे 9,600 (प्लस/मायनस 200) सेकंद देते.
- पॅडी न्यूमनने हीच शक्ती 14,690 (प्लस/मायनस 2,000) एवढी विकसित केली
नेपाळने केला पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही नव्या घटनेचा स्वीकार :
- सात वर्षे सखोल विचारविनिमय केल्यानंतर नेपाळने रविवारी पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही अशा नव्या घटनेचा स्वीकार केला.
- संसदेने मंजूर केलेली आणि संसदेच्या अध्यक्षांनी अधिप्रमाणित केलेली नेपाळची घटना रविवार, 20 सप्टेंबर 2015 पासून नेपाळच्या जनतेसमोर लागू होत आहे, अशी घोषणा अध्यक्ष रामबरन यादव यांनी संसदेत या कायद्याचे अनावरण करताना केली.
- 67 वर्षांच्या संघर्षांनंतर निर्वाचित लोकप्रतिनिधींनी तयार केलेली ही पहिलीच घटना आहे.
लेखिका जॅकी कॉलिन्स यांचे निधन :
- लेखिका जॅकी कॉलिन्स (वय 77) यांचे कर्करोगाने निधन झाले.
- ‘हॉलीवूड वाइव्हज’ व ‘द स्टड’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी खपाचे उच्चांक गाठले आहेत.
- कॉलिन्स यांच्या 32 कादंबऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या खूपविक्या (बेस्ट सेलर) पुस्तकांच्या यादीत होत्या.
आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-2 आता देशांतर्गत वाहतुकीसाठीही सज्ज :
- देशातील देखण्या विमानतळांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-2 आता देशांतर्गत वाहतुकीसाठीही सज्ज झाले असून यातील पहिला टप्पा 25 सप्टेंबर रोजी कार्यान्वित होणार आहे.
- गो एअर या कंपनीची विमाने आता टर्मिनल 1-ए ऐवजी टर्मिनल 1-बी वरून रवाना होणार आहेत.
- तर 1 ऑक्टोबरपासून एअर इंडियाच्या सर्व देशांतर्गत विमानांची वाहतूक टर्मिनल-2 वरूनच होईल.
- मात्र, गो एअर कंपनीची मुंबईत उतरणारी विमाने टर्मिनल 1-ए येथेच उतरणार आहेत.
- 25 सप्टेंबरपासून गो एअरची मुंबईबाहेर जाणारी सर्व देशांतर्गत विमाने टर्मिनल 1-बी वरून रवाना होतील.
जपानने सैन्य परदेशात पाठवण्यास दिली परवानगी :
- जपानने सत्तर वर्षांनी प्रथमच आपले सैन्य परदेशात लढण्यासाठी पाठवण्यास परवानगी दिली आहे.
- त्याबाबतची वादग्रस्त सुरक्षा विधेयके तेथील संसदेने शनिवारी पहाटे मंजूर केली.
- देशातील लष्करावर असलेले र्निबध शिथिल करण्याच्या उद्देशाने खासदारांनी ही विधेयके मंजूर केली आहेत.
- ही विधेयके मंजूर झाल्याने आता जपान हा देश त्यांचे सैन्य मित्र देशांच्या संरक्षणासाठी पाठवू शकेल.