Current Affairs of 21 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2016)

कोल्हापूर होणार पर्यटन जिल्हा :

 • कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.
 • कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी, शाहूनगरी, चित्रनगरी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नगरी आहे. त्यात आता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीने ती ‘पर्यटननगरी’ही होणार आहे.
 • महाराष्ट्राला पर्यटनाचे अनेक पैलू आहेत; पण त्यांतील एकाचेही धड मार्केटिंग करण्यात आलेले नाही.
 • तसेच त्यास कोल्हापूरचादेखील अपवाद नाही. खरे तर ‘महाराष्ट्राचे दक्षिणद्वार’ म्हणून कोल्हापूरचे एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आहे.
 • या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपरांचा येथे मिलाफ आहे.
 • संपूर्ण महाराष्ट्राला गोवा, कोकण आणि कर्नाटकात जाताना सहजच कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जाता येते.
 • अंबाबाई देवस्थानची भक्ती-शक्ती प्रबळ आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या सणात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवसांत 23 लाख भाविकांनी भेट दिली आहे. 

ग्लोबल सिटिझन महोत्सव प्रथमच मुंबईत :

 • संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि समाजधुरिणांच्या संयुक्त प्रयत्नांतून एक लोकचळवळ उभी करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून पुढील महिन्यात मुंबईत ‘ग्लोबल सिटिझन्स’ महोत्सवाचे आयोजन होत आहे.
 • हा महोत्सव येत्या 16 नोव्हेंबर रोजी होणार असून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरानंतर त्याच्या आयोजनाचा मान मिळणारे मुंबई हे पहिले शहर आहे.
 • ‘ग्लोबल सिटिझन’ हे सामाजिक चळवळीचे व्यासपीठ आणि ‘दि ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड लीडरशिप फौंडेशन’ यांच्यातर्फे हा अभिनव उपक्रम हाती घेतला जातो.
 • तसेच त्यांच्या ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ या भारतीय शाखेतर्फे मुंबईतील या महोत्सवाचे आयोजन होईल.
 • महाराष्ट्र सरकार व संयुक्त राष्ट्र संघ यांच्या सहकार्याखेरीज इतरही अनेक संस्था त्यात सहभागी असणार आहेत.

आता सॅमसंग कंपनी भारतात फक्त 4जी स्मार्टफोन सादर करणार :

 • कोरियातील आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात केवळ 4 जी/व्होल्ट स्मार्टफोन सादर करणार आहे.
 • बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
 • सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (मोबाईल व्यवसाय) मनू शर्मा म्हणाले, ‘देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपैकी 80 टक्के 4 जी सेवेकडे वळले आहेत.’
 • तसेच यामुळे या विभागात भविष्यात स्मार्टफोन सादर करण्यात येतील.
 • स्मार्टफोनचे उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी नोएडा येथील प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
 • भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 48.6 टक्के आहे.
 • भारतात सॅमसंगचे 4 जी असलेले 25 स्मार्टफोन बाजारपेठेत आहेत.

अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सीची हॅट्ट्रिक :

 • अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी याच्या जबरदस्त हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोना एफसीने चॅम्पियन्स लीगमध्ये मँचेस्टर सीटीएफसीला 4-0 ने पराभूत केले. तर, अन्य सामन्यात बायर्न म्युनिचने पीएसव्ही आर्इंडहोवनला 4-1 ने पराभूत केले.
 • गुआर्डिओलाच्या परतण्याने महत्त्वाच्या सामन्यात मेस्सीने फर्नांडिन्होच्या स्लिपवर 17व्या मिनिटात पहिला गोल केला आणि त्यानंतर सामन्यात गोलकीपर क्लोडिओ ब्रावोच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन गोल करीत हॅट्ट्रिक पूर्ण केली.
 • मेस्सीने 69व्या मिनटाला तिसरा गोल केला आणि युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरी हॅट्ट्रिक आपल्या नावे केली.
 • ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने बार्सिलोनासाठी चौथा गोल केला आणि संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला.
 • स्पॅनिश क्लबचा हा गेल्या 3 सामन्यांतील सलग विजय आहे. या विजयाने ग्रुप सीमध्ये 9 गुणांसोबत अग्रस्थानी आहे.
 • तसेच मॅँचेस्टर सिटी 4 गुणांनी दुसऱ्या स्थानी आहे.

चीनमधील मोबाईल कंपनीचे भारतात सर्वाधिक विक्री :

 • शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत.
 • देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
 • भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी होण्याचा शाओमीचा मानस आहे.
 • भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी स्मार्टफोन बाजारपेठ आहे.
 • शाओमी जागतिक पातळीवरील धोरणात भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.
 • चीनच्या बाहेरील ती सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.
 • शाओमीची स्पर्धक कंपनी हुवेईने भारतात स्मार्टफोन जोडणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • चीनमधील बाजारपेठेत स्मार्टफोनची विक्री कमी होत असल्याने तेथील कंपन्या बाहेरील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.