Current Affairs of 22 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2016)

सुनील गावसकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर :

 • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने सुवर्ण जयंती सोहळ्यात प्रसिद्ध क्रिकेटर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.
 • गावसकर यांना हा पुरस्कार 11 डिसेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे.
 • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने याआधी पहिला जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना प्रदान केला होता.
 • गावसकर यांनी भारतीय क्रिकेटसोबत आपले शानदार 50 वर्षे पूर्ण केली.
 • तसेच त्यांनी आपले प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण ऑक्टोबर 1966 मध्ये मोइनू-दोल्ला गोल्डकपच्या उपांत्यपूर्व सामन्यात केले होते.

‘उडान’ योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला :

 • विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने ‘उडे देश का आम नागरिक’ या घोषवाक्‍यासह घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे.
 • जानेवारी 2017 पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 • या योजनेचा शिर्डीसह राज्यातील सुमारे 10 शहरांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचा विमान प्रवास अवघ्या दोन हजार पाचशे रुपयांत शक्‍य होणार आहे.
 • नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू व राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिल्लीत ‘उडाण’ योजनेची घोषणा केली.
 • सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार ‘हवाई चप्पल’ (स्लीपर) घालणाऱ्या माणसांनाही हवाई प्रवास घडविणे, हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे.

देशातील प्रभावशाली आशियाई नागरिक :

 • लंडनचे महापौर सादिक खान ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली आशियाई आहेत.
 • इंग्रजांच्या या देशातील प्रभावशाली आशियाई नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, 101 जणांचा समावेश असलेल्या या यादीत पाकिस्तानी वंशाचे सादिक यांचे नाव सर्वात वर आहे.
 • सादिक यांच्याशिवाय नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई, हिंदुजा बंधू, लक्ष्मी मित्तल आणि संगीतकार जायन मलिक यांनीही या यादीत स्थान मिळविले.
 • द्विभाषिक साप्ताहिक ‘गरवी गुजरात’ने तयार केलेल्या ‘जीजी२पॉवर लिस्ट’नुसार, सादिक खान यांनी ब्रिटनच्या राजधानीचे महापौर बनून इतिहास घडविला आहे.
 • पार्क प्लाझा हॉटेलमध्ये 21 ऑक्टोबर रोजी ‘जीजी2 लीडरशिप अवॉर्डस्’मध्ये भारताचे ब्रिटनमधील प्रभारी उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी ही यादी जाहीर केली.
 • तसेच या यादीत माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून सरकारमध्ये व्यापार, नवोन्मेष आणि कौशल्यमंत्री राहिलेले साजीद जावेद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • भारतीय वंशाच्या विद्यमान आंतरराष्ट्रीय विकासमंत्री प्रीती पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • नोबेल पुरस्कार विजेते सर व्यंकटरमन रामकृष्णन चौथ्या, एस.पी. हिंदुजा यांचा हिंदुजा परिवार सहाव्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातून द. आफ्रिका बाहेर :

 • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या कार्यकक्षेतून बाहेर पडण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला असून त्यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
 • तसेच गेल्या आठवड्यात बुरुंडी या देशानेही न्यायालयाच्या कार्यकक्षेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
 • आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सुरवातीपासूनचे पाठीराखे असलेल्या दक्षिण आफ्रिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 • दक्षिण आफ्रिकेने दोन दिवसांपूर्वीच एक अधिसूचना जारी करत ही माहिती दिली.
 • वंशच्छेदाचा आरोप असलेले सुदानचे अध्यक्ष ओमर अल बाशीर हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आश्रयाला असताना त्यांना अटक करण्यात अपयश आल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांच्यावर मोठा दबाव होता.
 • बाशीर यांना अटक करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले असतानाही स्थानिक न्यायालयाने सरकारने त्यांना जाऊ दिले होते.
 • सुदानप्रश्‍नी शांततापूर्ण मार्गाने चर्चेची आवश्‍यकता असल्याने न्यायालयाच्या निकालाबाबत आक्षेप होता, असे झुमा यांनी सांगितले होते.
 • तसेच, न्यायालयाचे कायदे काळानुरूप न बदलल्याने बाहेर पडत असल्याचे प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर नयन खानोलकरना BBC चा पुरस्कार :

 • डोंबिवलीचे रहिवासी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर नयन वि. खानोलकर यांना बीबीसीतर्फे ‘फोटोग्राफर ऑफ दि ईयर’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
 • तसेच या पुरस्कारासाठी जगभरातून 50,000 अर्ज आले होते, ज्या 10 जणांची निवड करण्यात आली.
 • इंग्लंडच्या राजघराणाच्या प्रतिनिधींच्या हस्ते लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ येथे खानोलकर यांना 21 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • गेल्या 60 वर्षात फक्त 3 भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 • श्री खानोलकर यांनी मुंबई आणि परिसरातील बिबळे यांचा प्रश्न छायाचित्राच्या माध्यमातून श्री राज ठाकरे यांच्या मदतीने मांडला होता.
 • तसेच त्यामधीलच ‘Urban Leopard’ या छायाचित्रासाठी हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
 • विशेष म्हणजे 2012 साली सहयोगने खानोलकर यांचा “उद्योग रत्न” पुरस्कार देऊन गौरव केला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.