Current Affairs of 20 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2016)

संचालक अपात्रता अधिनियम लागू :

 • अनियमित कामकाजामुळे सहकारी बॅंका आर्थिक दिवाळखोरीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना दहा वर्षांसाठी अपात्र ठरविणारा सुधारीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम राज्यात नुकताच लागू झाला आहे.
 • तसेच हा अधिनियम पूर्वलक्षीप्रभावाने मागील दहा वर्षांपासून राज्यात लागू होणार आहे. त्यामुळे राज्यात यासंदर्भात जारी करण्यात आलेला वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय 18 ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री परिषदेने घेतला.
 • राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार अधिनियम 1960 च्या कलम 73 क(अ) मध्ये सुधारणा करून पोटकलम (3अ) नव्याने समाविष्ट करण्यात आले.
 • तसेच त्यामुळे अनियमित कामकाजामुळे बॅंक आर्थिक दिवाळखोरीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना अपात्र ठरविले जाणार आहे.
 • असे संचालक दहा वर्षांसाठी किंवा दोन पंचवार्षिक निवडणुकांसाठी अपात्र ठरणार आहेत.

नव्या ‘जनरेशन’चे ब्राह्मोस क्षेपणास्त्र :

 • भारत आणि रशिया लवकरच संयुक्तपणे 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे नव्या ‘जनरेशन’चे ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्यात येणार आहे.
 • तसेच यामुळे संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे.
 • भारत यावर्षी जून महिन्यात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियामक संस्थेचा (MTCR) सदस्य बनला आहे. या सदस्यत्वाचा परिणाम म्हणूनच रशिया भारतासोबत मिळून हे क्षेपणास्त्र बनविणार असल्याचे एक इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे.
 • MTCR गटाच्या नियमांनुसार यामधील सदस्य देश गटाबाहेरील देशांना 300 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये भागीदारी करू शकत नाहीत, किंवा विकू शकत नाहीत. त्यामुळे भारताला या सदस्यत्वाचा फायदा झाला आहे.
 • भारताकडे सध्या असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता 300 किलोमीटरपर्यंतच आहे.
 • तसेच या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या आतील प्रदेशांना लक्ष्य करणे कठीण आहे.
 • भारताकडे ‘ब्राह्मोस’पेक्षा अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रेही आहेत, परंतु ज्यावर हल्ला करायचा आहे त्या लक्ष्याच्या भोवती कितीही सुरक्षा असेल तरी त्यावर नेमका निशाणा साधणे ही ब्राह्मोसचे वैशिष्ट्य आहे.

भारत-म्यानमारमध्ये तीन करारांवर सह्या :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांच्यादरम्यान कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी तीन करारांवर सह्या केल्या.
 • स्यू की यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी, स्यू की यांनी लोकशाहीसाठी केलेला संघर्ष आणि त्यांना यामध्ये मिळालेले यश जगाला प्रेरणा देणारे असून, त्या एक आदर्श नेत्या असल्याचे नमूद केले.
 • दुसऱ्या बाजूला स्यू की यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत सांगितले, की म्यानमारची जनता आर्थिक आणि राजकीय घडामोडींच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीतून फायदा होण्याची आशा बाळगून आहे.
 • मोदी आणि स्यू की या दोन्ही नेत्यांनी भारत आणि म्यानमारच्या सुरक्षा संबंधांवर प्रामुख्याने भर दिला.
 • प्रदेशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी सहकार्य वाढविणे आणि एकत्रितपणे काम करण्याला दोन्ही देश प्राधान्य देतील, असे मोदींनी सांगितले.

दिल्लीमध्ये आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन :

 • दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान नवव्या आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन करण्यात आले आहे.
 • भारतासह विविध 10 देशांतील 14 थिएटर स्कूलचे रंगकर्मी आपल्या नाट्य कलाकृती, संस्कृती व कला क्षेत्रातील अनुभव यांचे आदान प्रदान करतील.
 • ‘द स्ट्रेंग्थ ऑफ आशिया इन कंटेंपररी थिएटर परफॉर्मन्स कल्चर’ ही नवव्या आशिया पॅसिफिक मीटची थिम आहे.
 • तसेच त्याला अनुसरून 10 थिएटर स्कूलशी संलग्न 20 देशातले नाट्य कला शिक्षक, विद्यार्थी, समीक्षक व रंगभूमी कलाकार या संमेलनात सहभागी होत आहेत.
 • यानिमित्ताने भारतीय रंगभूमीचे कलाकार आपल्या थिएटर कलेचा व रंगभूमीच्या महान परंपरेचा अविष्कार जगासमोर सादर करतील.
 • भारतातल्या रंगकर्मींना आशिया पॅसिफिक ब्युरो स्कुल थिएटरच्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधीही मिळेल.
 • नवव्या आशिया पॅसिफिक मीटच्या संयोजन समितीच्या सूत्रधार प्रा. त्रिपुरारी शर्मा आहेत.
 • एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रे हे आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.