Current Affairs of 18 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2016)

गीर अभयारण्य पर्यटनास खुले :

 • चार महिने बंद असलेले गीर अभयारण्य 16 ऑक्टोबर रोजी पर्यटनासाठी खुले करण्यात आले.
 • सौराष्ट्रातील या एकमेव आशियाई सिंहांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्याकडे हल्ली पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.
 • गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अलीकडे पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे चित्र असून, राज्य पर्यटन विभागाने अमिताभ बच्चन याना घेऊन केलेल्या जाहिरातींमुळे पर्यटक गीरकडे आकर्षित होत असल्याची चर्चा आहे.
 • जुनागढचे मुख्य वनसंरक्षक ए. पी. सिंघ यांनी पुढील 90 दिवसांसाठी आगाऊ आरक्षण झाल्याची माहिती दिली.
 • तसेच ही संधी हुकलेल्या पर्यटकांनी सिंह पाहण्यासाठी देवालिआ क्षेत्रास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 • देवालिया क्षेत्र 412 हेक्‍टरमध्ये पसरलेले आहे. देवालिया क्षेत्र हे पूर्ण वर्षभर खुले असते.

आधारकार्डशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार :

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता.
 • मात्र त्यास विरोध होऊ लागल्याने आधारकार्ड नसेल, तर आधारकार्डसाठी अर्ज केलेला नोंदणी क्रमांकही स्वीकारला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 • राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक केले होते. परंतु, आधारकार्ड सक्तीस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला.
 • तसेच मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी आधारकार्ड सक्ती रद्द करावी, अशी मागणी राज्य मंडळाकडे केली. त्यावर मंडळातर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • परीक्षा अर्ज भरताना आधारकार्ड अनिवार्य केले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसेल, तर आधार नोंदणी क्रमांक परीक्षेसाठी ग्राह्य धरला जाईल.
 • आधारकार्डसाठी अद्याप नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल, असे संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांकडे लेखी देणे आवश्यक आहे.
 • आधारकार्र्ड नसले तरीही परीक्षा अर्ज भरता येणार आहे, असे राज्य मंडळाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारचा ‘महा-मेट्रो’ प्रस्ताव :

 • पुणे मेट्रोला केंद्राच्या आर्थिक परिषदेने (पीआयबी) हिरवा कंदील दाखविल्यावर राज्यातील मुंबई, नागपूर व पुणे या तिन्ही मेट्रोमार्गांचे काम जलदगतीने व्हावे यासाठी ‘महाराष्ट्र’ म्हणजेच ‘महा-मेट्रो’ नावाचे स्वायत्त महामंडळ वा कंपनी स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठविला आहे.

 • आधीच असंख्य मतभिन्नतेत सापडलेल्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या प्रस्तावाला केंद्राने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानंतर यासाठी दिल्लीतील ‘डीएमआरसी’च्या धर्तीवर एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या हालचालींना सुरवात झाली.
 • नागपूर मेट्रोचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीप्रमाणेच सुपरफास्ट सुरू आहे.
 • तसेच या मेट्रोचे डबे तयार करण्याबाबत नागपूरने दिल्ली मेट्रोप्रमाणे ‘बंबार्डियर’ कंपनीचा पर्याय न स्वीकारता ‘चायना रेल्वे रोलिंग स्टॅक कॉर्पोरेशन’ या चिनी कंपनीशी करार केला आहे.

चीनच्या ‘शेंझोऊ-11’चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण :

 • दोन अंतराळवीरांचा समावेश असलेल्या शेंझोऊ 11 या अवकाशयानाचे चीनने यशस्वीपणे प्रक्षेपण केले.
 • हे अवकाशयान दोन दिवसांनी चीनच्या अवकाश प्रयोगशाळेला जोडले जाणार आहे.
 • तेथे हे दोन अंतराळवीर एक महिना थांबणार असल्याने अशा प्रकारची चीनची ही पहिली सर्वांत मोठी मोहीम ठरणार आहे.
 • जिंग हेपेंग (वय 50) आणि चेंग डोंग (वय 37) अशी या दोन अंतराळवीरांची नावे आहेत.
 • ‘लॉंग मार्च-2 एफ’ या प्रक्षेपकाच्या मदतीने शेंझोऊ-11 ला अवकाशात सोडण्यात आले.
 • जिंग यांची ही तिसरी, तर चेंग यांची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे.
 • 2020 पर्यंत अवकाशात अवकाशकेंद्र उभारण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 • चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी या यशस्वी उड्डाणाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर :

 • देशभरात रिक्त असलेल्या लोकसभेच्या चार व विधानसभेच्या आठ जागांसाठीची पोटनिवडणूक 19 नोव्हेंबरला पार पडेल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
 • 26 ऑक्‍टोबरला याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, मतमोजणी 22 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
 • लाखिमपूर (आसाम), शहडोल (मध्य प्रदेश), कुचबिहार आणि तामलूक (प. बंगाल) या चार लोकसभा मतदारसंघांसह आसाम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, प. बंगाल, तमिळनाडू, त्रिपुरा आणि पुद्दुचेरीतील रिक्त असलेल्या विधानसभेच्या आठ जागांसाठी 19 नोव्हेंबर या एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 • भाजपने मे महिन्यात आसाम विधानसभा काबीज केल्यानंतर लाखिमपूर मतदारसंघाचे खासदार सर्वांनंद सोनेवाल यांनी खासदारकीचा राजीनामा देत मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती.
 • विधानसभेच्या बैठालांगसो मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेल्या मानसिंग रॉंग्पी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता.
 • शहडोह लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपनेते दलपत सिंह, तसेच कूचबिहारमधून निवडून आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या रेणुका सिन्हा यांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
 • तामलूक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले तृणमूलचे सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममधून विधानसभा लढविली.
 • विजयी अधिकारी यांची नंतर मंत्रिपदावर वर्णी लागल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.