Current Affairs of 17 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2016)

एक दिवासीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विजय :

  • कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर धरमशालात सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसही भारताने विजयी सुरवात केली.
  • गोलंदाजांच्या अचूक कामगिरीला फलंदाजीची जोड मिळाल्याने भारताने 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर सहा गडी राखून विजय मिळविला.
  • प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 190 धावांत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता.
  • तसेच नंतर 33.1 षटकांत 4 बाद 194 धावा करून भारताने विजय मिळविला. विराट कोहली 85 धावांवर नाबाद राहिला.
  • हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांनी वेगवान गोलंदाजीस पूरक हवामानाचा सुरेख उपयोग करून घेतला.
  • पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात गुप्टिलची विकेट मिळवून हार्दिकने धडाक्‍यात सुरवात केली.
  • न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज टॉम लॅथम अखेरपर्यंत नाबाद राहिला, पण त्याला सहकाऱ्यांकडून काहीच साथ मिळाली नाही.
  • पदार्पणात तीन गडी बाद करणारा हार्दिक पांड्या सामन्याचा मानकरी ठरला.

भारतात सर्वांत ‘मुक्त’ अर्थव्यवस्था :

  • केंद्र सरकारने घडवून आणलेल्या आर्थिक सुधारणांचे परिणाम आता दिसायला लागले असून, आर्थिक वाढीचा वेग वाढण्याबरोबरच भारताचा आता जगातील सर्वाधिक मुक्त देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झाला आहे.
  • मागील दोन वर्षांमध्ये उद्योगास अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून बरेच नियम शिथिल करण्यात आले, याचे परिणाम आता तुमच्या समोर आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
  • “ब्रिक्‍स” देशांच्या व्यापार परिषदेमध्ये बोलताना मोदींनी भारताचे आर्थिक अंतरंग मांडले.
  • वस्तू आणि सेवाकर कायद्यामुळे व्यापार करणे आणखी सुलभ झाले असून, बॅंकांच्या दिवाळखोरीसंबंधीच्या कायद्यामुळे अडचणीत आलेल्या कंपन्या आणि आर्थिक संस्थांना मदत झाली आहे.  
  • तसेच पंतप्रधान यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख केला.
  • व्यापारानुकूलतेच्या बाबतीत जागतिक बॅंकेने तयार केलेल्या देशांच्या क्रमवारीमध्ये भारत 39 व्या स्थानी पोचला आहे.
  • परकीय गुंतवणुकीवर घालण्यात आलेली मर्यादा सरकार सातत्याने कमी करत असून, यामध्ये संरक्षण आणि आयुर्विमा कंपन्यांचाही समावेश आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान येणार भारत दौऱ्यावर :

  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत.
  • पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच युरोप बाहेरील दौरा ठरणार आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाने मे यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची घोषणा केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मे भारत-ब्रिटन सामरिक संबंधांचा आढावा घेणार आहेत.
  • तसेच यासोबत आर्थिक व व्यापारी संबंधांबाबतही उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.
  • भारत-ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेचे उद्‌घाटन मोदी आणि मे करणार आहेत.
  • कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे.

सुरक्षित अन्नधान्य निर्मितीसाठी ‘ग्रो सेफ फूड’ :

  • अलीकडच्या काही वर्षांत पीक उत्पादनावर वाढलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण बघता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशात ह्यग्रो सेफ फुडह्ण अभियान राबविण्यात येत आहे.
  • पण आजही एका पिकासाठी निर्माण करण्यात आलेले कीटकनाशक दुसर्‍या पिकावर वापर होत असल्याने मानवी आरोग्याला धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • मानवी आरोग्याला घातक असलेल्या अशा कीटकनाशकांवर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे.
  • देशात हजारो कीटकनाशक कंपन्या असून, या सर्व कंपन्यांना कीटकनाशके तयार करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, (कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशके) कीटकनाशक निर्मितीनंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात.
  • मानवी सुरक्षा व सावधानीपूर्वक मूल्यमापन चाचण्यानंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीद्वारे विशिष्ट उपयोगासाठी नोंदणी व परवाना दिला जातो.
  • केंद्रीय कीटकनाशक मंडळाने कापूस या पिकासाठी कीटकनाशकांना परवानगी दिली असते; पण तेच कीटकनाशक सर्रासपणे मूग, तूर किंवा इतर पिकांवर वापरण्याची शिफारस विक्रेते शेतकर्‍यांना करीत असतात.
  • परिणामी, चुकीचे कीटकनाशक वापरल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
  • कीटकनाशके लेबल क्लेमची व्यवस्था आहे; पण शेतकर्‍यांमध्ये याबाबत जनजागृतीची गरज आहे.

कुडनकुलम प्रकल्पाचे राष्ट्रार्पण :

  • भारताच्या नागरी अणुऊर्जा मोहिमेला महत्त्वपूर्ण आयाम देणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे 15 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत राष्ट्रार्पण करण्यात आले.
  • रशियाच्या सहकार्याने देशात आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मोदी यांनी जाहीर करतानाच त्यामुळे अणुऊर्जासंदर्भातील व्यापक सहकार्याचे संकेतही दिले.
  • मोदी व पुतीन यांनी बाणावलीतून तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पाच्या ई-फलकाचे अनावरण करून राष्ट्रार्पण केले.
  • तसेच या प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याची पायाभरणी केल्याचे जाहीर केले, तर पाचव्या व सहाव्या टप्प्याचे काम दृष्टीक्षेपात असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • कुडनकुलमच्या पहिल्या टप्प्यामुळे भारताला एक हजार मेगावॅट अणुऊर्जा प्राप्त झाली असून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आणखी एक हजार मेगावॅट अणुऊर्जा तयार होणार आहे.
  • भारत-रशिया यांच्यादरम्यान हायड्रोकार्बन क्षेत्रात सहभाग वाढणार असल्याचे जाहीर करतानाच गेल्या चार महिन्यांत भारतीय कंपन्यांनी हायड्रोकार्बन क्षेत्रात साडेपाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक रशियाच्या तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात केली आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.