Current Affairs of 15 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2016)
कुडनकुलम प्रकल्प आराखड्याला अंतिम स्वरूप :
- अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवत भारत आणि रशियाने कुडनकुलम अणु प्रकल्पाच्या केंद्र क्रमांक पाच आणि सहाची उभारणी करण्याच्या कराराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे.
- ‘ब्रिक्स’ परिषदेदरम्यान भारत आणि रशियातील द्वीपक्षीय चर्चेनंतर या कराराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
- 15 आणि 16 ऑक्टोबरला गोव्यामध्ये ब्रिक्स परिषद होणार असून, यामध्ये भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
- या परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची स्वतंत्रपणे भेट होणार आहे.
- तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणु प्रकल्पामध्ये केंद्र 5 आणि 6 उभारणीसाठीच्या रशियाबरोबरील कराराच्या मसुद्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे.
- तसेच या अणु प्रकल्पातील केंद्र क्रमांक दोनचे उद्घाटन आणि केंद्र तीन आणि चारचे भूमिपूजन करण्याचाही दोन्ही देशांचा विचार आहे.
- कुडनकुलम अणु प्रकल्पातील केंद्र क्रमांक एकची उभारणी भारत आणि रशियाने संयुक्तपणे केली असून, या प्रकल्पातून 2013 पासून वीजनिर्मितीला सुरवात झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिन :
- अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर हात साबणाने धुणे आवश्यकच आहे. अनेक आजारांचे मूळ हे अस्वच्छतेत असते.
- खाण्यासाठी आपण हातांचा वापर करतो, ते हातच अस्वच्छ असतील तर त्यांच्या माध्यमातून रोगजंतूंचा पोटात शिरकाव होतो. यातून अनेक आजारांना ते निमंत्रण मिळते.
- तसेच या पार्श्वभूमीवर हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करणे व त्याच्या जनजागृतीसाठी 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून पाळला जातो.
- हातांची स्वच्छता म्हणजे निरोगी आयुष्याच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे.
- लहान मुलांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. जेवणापूर्वी तर स्वच्छ हात धुणे याला पर्यायच नाही.
देशाच्या करसंकलनात 26 टक्के वाढ :
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाच्या अप्रत्यक्ष कर संकलनात 26 टक्के तर प्रत्यक्ष कर संकलनात 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
- प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन रु. 7.35 लाख कोटी झाले आहे.
- एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन रु. 4.08 लाख कोटींवर पोचले आहे.
- प्रत्यक्ष कर संकलन रु. 3.27 कोटी झाले आहे.
- उत्पादन शुल्कात 46 टक्के वाढ झाल्याने यंदा एकूण अप्रत्यक्ष करांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
- एकूण चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने अप्रत्यक्ष कर संकलनाचे रु. 7.79 लाख कोटी तर प्रत्यक्ष कर संकलनाचे रु. 8.47 लाख कोटी ध्येय राखले आहे.
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2016-17 साठी रु. 16.26 लाख कोटी एकूण कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.
दिनविशेष :
- 15 ऑक्टोबर 1896 रोजी स्वातंत्र्यसैनिक, सेठ गोविंद दास यांचा जन्म झाला होता.
- हरगोविंद खुराना यांना 15 ऑक्टोबर 1968 रोजी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा