Current Affairs of 21 January 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 जानेवारी 2016)
‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात’ प्रयोग सुरू :
- अंतराळात एक वनस्पती वाढवून तिचे फूल फुलविण्याचा एक अभिनव प्रयोग शास्त्रज्ञांनी नुकताच यशस्वी पार पाडला.
- पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरून फेऱ्या मारणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात‘ हे प्रयोग सुरू आहेत.
- पृथ्वीभोवती फेऱ्या मारणाऱ्या उपग्रहांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे‘ महत्त्व आगळेवेगळे आहे, हे स्थानक फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचे असून, त्याचे बांधकाम अंतराळातच सोळा राष्ट्रांनी मिळून पंधरा वर्षांत पूर्ण केले.
- या स्थानकासाठी 150 अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च आला आहे. सध्या तेथे सहा अवकाशयात्री राहात आहेत.
- तसेच हे स्थानक पृथ्वीभोवती चारशे किलोमीटर उंचीवरून ताशी 28000 किलोमीटर वेगाने फिरत आहे, ते दिवसाला सोळा वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालत असून, त्याच्या प्रचंड वेगामुळे स्थानकामध्ये वजनरहित अवस्था निर्माण झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत :
- आयआरएनएसएस-1 ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह (दि.20) यशस्वीरीत्या कक्षेत स्थिरावताच भारताने अमेरिकेच्या जागतिक स्थितीदर्शक यंत्रणेच्या धर्तीवर (जीपीएस) स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत स्थान मिळविले आहे.
- पीएसएलव्ही सी 31 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाने सकाळी 9.31 वाजता स्थानिक सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजनानुसार उड्डाण केले.
- अवघ्या 19 मिनिटे 20 सेकंदात सदर उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या तुकडीचे अभिनंदन केले आहे.
- इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात.
जगातील सर्वात मोठी दरी :
- दक्षिण ध्रुवावर अंटाक्र्टिका मोहिमेसाठी गेलेल्या वैज्ञानिकांना अमेरिकेतील ग्रेट कॅनयनपेक्षाही मोठी दरी (घळ) सापडली आहे, ती 1000 कि.मी. लांब, 1500 मीटर खोल व 26.5 किलोमीटर रूंद आहे.
- पृथ्वीवरील ही सर्वात मोठी दरी आहे, चिनी वैज्ञानिकांच्या 32 व्या अंटाक्र्टिका मोहिमेत ती सापडली आहे.
- चीनच्या शोध मोहिमेतील संशोधक गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण ध्रुवावर प्रिन्सेस एलिझाबेथ भागात गेले होते व त्यांनी तेथे बराच काळ वास्तव्य केले होते, तेव्हा त्यांना तेथे बर्फाची तळी व दरीतील काही प्रवाह सुरूवातीला दिसले.
- अंटाक्र्टिकाच्या बर्फाखाली त्यांना ओलसर जागा दिसली, अनेक सरोवरांच्या खाली उबदार बर्फ (वॉर्म आईस) सापडले, हे अशा प्रकारचे बर्फ असते जे पाण्यात असतानाच चटकन वितळते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवे वीज दर धोरणा :
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत नव ऊर्जा साधनांचे लक्ष्य ठेवून नव्या वीज दर धोरणाला मंजुरी देण्यात आली.
- सुलभ वितरण आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन ही या वीज दर धोरणाची आणखी काही वैशिष्टय़े आहेत.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले नवे वीज दर धोरण स्वच्छ ऊर्जा मोहिमेला पाठिंबा देणारे आहे.
- स्वच्छ भारत अभियानाला पूरक आणि गुंतवणुकीला प्राधान्य देणारे हे ऊर्जा दर धोरण आहे, गुंतवणूकदारांसाठी सुलभ असलेले हे धोरण अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणारे आहे.
भारतातही लवकरच ‘अॅपल’ स्टोअर्स :
- अमेरिका आणि चीनमध्ये ‘अॅपल’ च्या विविध उत्पादनांच्या घटलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता भारतात विस्तारीकरणाची योजना आखण्यास सुरुवात केली असून, त्याच दिशेने एक पाऊल टाकत कंपनीने भारतात किरकोळ विक्रीसाठी दुकाने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
- भारतातील स्मार्टफोनधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊनच कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
- ‘अॅपल’ने केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विभागाकडे अर्ज दाखल केला असून, या विभागाने कंपनीकडून सविस्तर माहिती मागवून घेतलीये.
- एक ब्रॅंड विक्री क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारने वाढ केल्यानंतरच ‘अॅपल’ने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
‘एज’ हा आधुनिक सुविधांनी युक्त ब्राऊजर :
- मायक्रोसॉफ्टने जुने असलेले इंटरनेट एक्स्प्लोरर-7, 8, 9 आणि 10 हे ब्राऊजर्स 12 जानेवारी 2016 या एकाच दिवशी बंद केले.
- आता केवळ ‘Internet Explorer 11’ हा एकच ब्राऊजर सुरू असून अन्य ब्राऊजर्सचे अपडेटस् बंद करण्यात आले आहेत.
- तसेच ‘एज’ हा आधुनिक सुविधांनी युक्त ब्राऊजर जारी करण्यात आला आहे, हे दोन्ही ब्राऊजर्स ‘विंडोज-10’ या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करतील.
- विशेष म्हणजे स्मार्टफोन ते कॉम्प्युटर, लॅपटॉपवर याचा सहज वापर करता येईल.
फलोत्पादनात भारत दुसरा :
- स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या भारताने हरितक्रांतीनंतर कृषी उत्पादनात स्वयंपूर्णत: मिळविताना आता फळांच्या उत्पादनात जगात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
- विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विक्रमी फळ उत्पादनामुळे भारताला हे यश मिळवणे शक्य झाले आहे.
- राज्यातील पुणे, औरंगाबाद, जळगाव व सांगली हे जिल्हे देशात फळ उत्पादनाच्या नकाशावर झळकले आहेत, केळी उत्पादनात जळगाव जिल्हा देशात अग्रेसर ठरला आहे.
- फळांच्या वाढत्या उत्पादनामुळे भारतीयांच्या आहारातही त्यांचे प्रमाण वाढत असल्याने लोकांचे आरोग्यमानही सुधारणार आहे.
- कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये भारताने फळांच्या उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे.
- विविध फळांच्या निर्यातीतही भारताने बाजी मारली असून, त्यात द्राक्ष अग्रस्थानी आहेत.
भारत बटालियन-3 चा मुख्यालय :
- पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-3 चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही 100 एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे.
- नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे.
दिनविशेष :
- दुसर्या महायुध्दात ‘फिल्ड मार्शल लिबियन’ या मोहिमेस प्रारंभ.
- 1894 : कवी माधव जूलियन (माधव त्रिंबक पटवर्धन) यांचा जन्म.
- 1972 : मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा