Current Affairs of 20 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (20 जानेवारी 2016)

युवकांना रोजगारक्षम बनविणार :

 • ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र‘ अभियानांतर्गत टाटा ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील एक लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 • टाटा ट्रस्ट आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभागादरम्यानचा सामंजस्य करार फडणवीस यांच्या उपस्थित मुंबई येथे झाला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ संकल्पनेस अनुसरून राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करणे, मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे.
 • स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.  
 • विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील संधींचा फायदा घेण्यासाठी राज्यातील तरुणांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

चिनी पाणबुड्यांच्या ‘स्वागता’साठी बोईंग :

 • हिंदी महासागर व अंदमान निकोबार भागामध्ये चीनच्या आण्विक व पारंपरिक पाणबुड्यांच्या वाढलेल्या वावराच्या पार्श्‍वभूमीवर भारताने या भागातील लष्करी तळाच्या सुरक्षेसाठी सागरी टेहळणी करण्याचे ठरविले आहे.
 • भारतीय नौदलातील सर्वांत कार्यक्षम असलेल्या पाणबुडी विध्वंसक पोसिएडॉन-8 आय जातीची दोन विमाने येथे तैनात करण्यात आहे, याशिवाय हवाईदल व नौदलाची ड्रोन विमानेही येथे काही काळासाठी पाठविण्यात आली आहेत.
 • बोईंग या अमेरिकी कंपनीशी 2009 मध्ये करण्यात आलेल्या 2.1 अब्ज डॉलर्स किंमतीच्या करारान्वये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये पी-8 आय जातीच्या आठ विमानांचा समावेश करण्यात आला आहे.
 • 1200 नॉटिकल मैलांपेक्षाही जास्त पल्ला असलेले हे विमान हिंदी महासागर क्षेत्रामधील संवेदनशील माहिती गोळा करण्याच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 • अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले हे विमान पाणबुडी व लढाऊ जहाजांविरोधात अत्यंत प्रभावीपणे वापरता येऊ शकते.

ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन :

 • ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकर यांचे (दि. 19) रोजी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
 • मागच्या काही दिवसांपासून टिकेकर यांना श्वसनाचा त्रास होता. टिकेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका व्यासंगी विचारवंतास मुकला, अशी भावना व्यक्त झाली.
 • डॉ. टिकेकर यांनी आपली कारकिर्द महाविद्यालयात व्याख्याता म्हणून सुरू केली. लेखन, वाचन, भाषा, संशोधन आणि साहित्याचा गाढा व्यासंग असलेल्या टिकेकरांनी दिल्लीतील यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेस ऑफिसमध्ये काम केले.
 • त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘टाइम्स’ पासून झाली, प्रारंभी तेथे संदर्भ ग्रंथालयात काम केल्यानंतर कालांतराने ते ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी रुजू झाले.
 • ‘लोकमत’, ‘सकाळ’ या दैनिकांमध्येही त्यांनी संपादकपद भूषवले होते.

तमिळनाडूमध्ये नागरिकांसाठी अनेक योजना :

 • तमिळनाडूमध्ये नागरिकांसाठी अनेक योजना मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सुरू केल्या आहे.
 • ‘अम्मा’ या ब्रॅंडखाली ‘अम्मा कॅंटीन’, ‘अम्मा मिनरल वॉटर’ यानंतर आता अम्मांनी कॉल सेंटरचा उपक्रम सुरू केला आहे.
 • नागरिकांना सरकारी सेवा तत्पर सेवा मिळावी, यासाठी या अम्मा कॉल सेंटरचे उद्‌घाटन झाले.
 • हे कॉल सेंटर वर्षभर दिवसा सुरू राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जयललिता यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला.
 • सरकारी कामाबाबतच्या तक्रारी नागरिकांनी 1100 हा टोल फ्री क्रमांकांवर नोंदविल्यास त्यांना तत्पर सेवा उपलब्ध होईल, असे सरकारने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तंत्रज्ञान करार :

 • भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तंत्रज्ञान देवाणघेवाणीचा करार झाला असून, एकमेकांना गोपनीय तंत्रज्ञान देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
 • याअंतर्गत लिग्नाइट कोळशाचा वापर करून वीजनिर्मिती आणि पोलाद उत्पादन करण्यासाठीचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया भारताला पुरविणार आहे.
 • या तंत्रज्ञानाद्वारे कार्बनचे कमी प्रमाणात उत्सर्जन होते, या करारामुळे दोन देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिकच दृढ झाले असून, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही बळ मिळणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे दक्षिण भारतातील वाणिज्यदूत सीन केली यांनी संगितले आहे.

जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा मृत्यू :

 • जगातील सर्वात वृद्ध पुरूष अशी ख्याती असणाऱ्या यात्सुरो कोईडे यांचा (दि.19) मृत्यू झाला. ते 112 वर्षांचे होते.
 • राईट बंधुंनी आकाशात पहिल्यांदा विमान उडवण्यापूर्वीच्या काळात यात्सुरो कोईडे यांचा जन्म झाला होता.
 • नागोया येथील रूग्णालयात हदय बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 • वायव्य टोकियोमध्ये राहणाऱ्या यात्सुरो यांचा जन्म 13 मार्च 1903 रोजी झाला होता.
 • काही दिवसांपूर्वीच त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुषाचा मान देऊन सन्मानित करण्यात आले होते.

बीएड्. शिक्षण शुल्कात होणार सुधारणा :

 • राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित अध्यापक विद्यालयातील बीएड् अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात सुधारणा करण्यात येणार आहे, त्यासाठी मुळचे अकोल्याचे प्राचार्य डॉ. एस.जी. बुटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
 • अलिकडच्या काही वर्षांमध्ये बीएड् अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे, त्यामुळे मोठय़ा संख्येने बीएड्च्या जागा रिक्त राहतात.
 • या पृष्ठभूमीवर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बी. एड् अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय 19 जानेवारी रोजी घेतला.
 • शिक्षण शुल्काबाबत सांगोपाग चर्चा करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला राज्य शासनाकडे सुधारित शिक्षण शुल्काबाबत शिफारशी करावयाच्या आहेत.
 • त्या अनुषंगाने कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य, मुळचे अकोल्याचे डॉ. एस.जी. बुटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.

‘इस्त्रो’च्या उपग्रहाचे प्रक्षेपण :

 • नव्या वर्षातील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) पहिल्या मोहिमेसाठी (दि.18) सकाळी साडेनऊ वाजता उलटगणती सुरू झाली.
 • भारतीय विभागीय दिशादर्शक उपग्रहाचे (आयआरएनएसएस-1ई) (ता. 20) सकाळी साडेनऊ वाजता पीएसएलव्ही-31 प्रक्षेपकाच्या माध्यमातून अवकाशात  प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्यासाठीची 48 तासांची उलटगणती सुरू झाल्याची माहिती ‘इस्त्रो’तर्फे देण्यात आली.
 • ‘इस्त्रो’च्या श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण तळावरून ‘आयआरएनएसएस-1ई’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
 • भारताने आत्तापर्यंत सात उपग्रहांच्या मालिकेतील चार दिशादर्शक उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
 • अवकाशातील सात आणि पृथ्वीवरील दोन अशा एकूण नऊ उपग्रहांच्या साहाय्याने भारतीय दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती ‘इस्त्रो’ तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.