Current Affairs of 22 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (22 जानेवारी 2016)

अन्नसुरक्षा कायदा :

 • सर्व राज्यांमध्ये मार्चपासून अन्नसुरक्षा कायदा लागू होणार आहे.
 • दुष्काळी स्थिती असली तरीही गोदामांत धान्यसाठा मुबलक असल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्‍वास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केला.
 • अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण खात्याच्या गेल्या 19 महिन्यांतील कामगिरीचा आढावा पासवान यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
 • देशातील 63 टक्के जनतेला अन्नसुरक्षेची हमी देणारा राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा (एनएफएसए) सद्यःस्थितीत सुरवातीला केवळ 11 राज्यांमध्ये लागू झाला होता, गेल्यावर्षी ही संख्या 25 पर्यंत पोहोचली.
 • याबद्दल बोलताना पासवान म्हणाले, की उर्वरित राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी मार्च 2016 पासून होणार आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना कालवश :

 • पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे (दि.21) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या.
 • चेन्नईतील स्वामिनाथन कुटुंबात जन्मलेल्या मृणालिनी भरतनाटय़म आणि कथकली या नृत्यप्रकारांत निपुण होत्या, मृणालिनी यांनी शांतिनिकेतन येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले होते.
 • मृणालिनी या ‘अम्मा’ या नावाने सुपरिचित होत्या, त्यांनी 1948 मध्ये दर्पण अकादमीची स्थापना केली होती आणि 18 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाटय़म आणि कथकली नृत्यप्रकारांत या अकादमीतून पदवी मिळविली आहे.

आकाशगंगेच्या विकास प्रक्रियेचा नकाशा :

 • आपली आकाशगंगा कशी विकसित होत गेली याचा विकास नकाशा संशोधकांनी तयार केला असून त्यात बालदीर्घिका ते सर्पिलाकार दीर्घिका ही वाटचाल अधोरेखित करण्यात आली आहे.
 • या विकास नकाशात 70 हजार ताऱ्यांचे वय सांगितले असून ते तारे आकाशगंगेच्या निम्म्या टप्प्यांपर्यंत पसरलेले आहेत व आपल्यापासून 50 हजार प्रकाशवर्षे दूर आहेत.
 • आपल्या दीर्घिकेच्या केंद्राशी जुने तारे असून ते विश्व लहान व तरूण असताना निर्माण झालेले आहेत.
 • फार पलीकडे आपल्याला तरूण तारेही दिसतात त्यामुळे आकाशगंगा टप्प्याने वाढत गेली असे जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी या संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञ मेलिसा नेस यांनी म्हटले आहे.

107 वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद :

 • संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 107 वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद झाली आहे.
 • तोरस्कर कुटुंबियांनी सातत्याने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला तब्बल 59 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.
 • 13 जानेवारी 2016 रोजी राज्य शासनाने अखेर शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची हुतात्मा म्हणून नोंद केली.
 • शंकरराव तोरस्कर हे पहिले बलिदान देणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते एकमेव शिलेदार होते.
 • 18 जानेवारी 1956 रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगिनीने जखमी झाले. यातच त्यांचा सात दिवसांत मृत्यू झाला.

भारतातील एफडीआय दुप्पट झाला :

 • भारतातील थेट परकीय गुंतवणूक 2015 मध्ये जवळपास दुप्पट होऊन 59 अब्ज डॉलर झाली असून यामध्ये अमेरिकेचा मोठा वाटा आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार व विकास परिषदेने गुरुवारी ही माहिती दिली.
 • भारतातील परकीय गुंतवणूक गेल्यावर्षी अनपेक्षितरीत्या 36 टक्के वाढली असल्याचे परिषदेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
 • परिषदेच्या गुंतवणूक व उपक्रम विभागाचे संचालक जेम्स झॅन यांनी सांगितले की, जागतिक गुंतवणुकीचा ओघ 10.7 ट्रिलियन इतका झाला असूत तो आर्थिक मंदीपूर्वीच्या गुंतवणुकीच्या जवळ जाणारा आहे, आर्थिक मंदी सुरू झाल्यापासूनची ही सर्वात जास्त गुंतवणूक आहे.
 • 2015 मध्ये परदेशी गुंतवणूकदारात अमेरिकेचा पहिला क्रमांक होता.

प्लुटोच्या पलीकडेही ग्रह :

 • प्लुटो या आठव्या ग्रहापलीकडे सूर्यमालेत आणखीही एक ग्रह असल्याचा सबळ पुराव्याचा दावा अमेरिकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.
 • हा ग्रह प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या दहापट असण्याची शक्‍यता आहे.
 • ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी‘ (कॅलटेक) या संस्थेत कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांनी सूर्यमालेत नववा ग्रह असल्याची ही शक्‍यता व्यक्त केली आहे.
 • मात्र या ग्रहाच्या अस्तित्वास पुष्टी देणारी निरीक्षणे या वैज्ञानिकांना अद्यापी मिळू शकलेली नाहीत, या ग्रहाचे निश्‍चित स्थान शोधून काढण्यासाठी येथील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
 • या ग्रहाचे निश्‍चित स्थान शोधून काढण्याची क्षमता असलेल्या अनेक अवकाश दुर्बिणी (टेलिस्कोप) सध्या अस्तित्वात आहेत.

‘अतुल्य भारत’च्या ब्रॅंड अॅम्बेसिडर :

 • केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ जाहिरात मोहिमेच्या ब्रॅंड अॅम्बेसिडरपदी अखेर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आली आहे.
 • अभिनेता आमीर खान अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसिडर होता, मात्र त्यांच्याशी करण्यात आलेला करार संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपनीने त्याचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला.
 • केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या ब्रॅंड अॅम्बेसिडरपदासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंताची यादी तयार केली होती.
 • या नावांमधूनच अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांचे नाव निश्चित करण्यात आले.

दिनविशेष :

 • 1958 : संयुक्त अरब प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.