Current Affairs of 21 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2015)

विल्यम्सनने आपले शतक पूर्ण करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला :

 • केन विल्यम्सनच्या जिगरबाज शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाच गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली.
 • श्रीलंकेचा दुसरा डाव नाट्यमयरीत्या कोलमडल्यानंतर न्यूझीलंड संघ दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता.
 • विजयासाठी अवघ्या 47 धावांची गरज असताना विल्यम्सनने आपले शतक पूर्ण करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तो 108 धावांवर नाबाद राहिला.
 • विल्यम्सनचे या वर्षातील पाचवे कसोटी शतक आहे. या वर्षभरात विल्यम्सनने न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम केला आहे. न्यूझीलंला विजयासाठी 189 धावांटी गरज होती.
 • 2 बाद 11वरून त्यांचा डाव विल्यम्सनने लावून धरला. प्रथम रॉस टेलर आणि नंतर कर्णधार ब्रेंडन मॅक्‌लमला साथीला घेत त्याने न्यूझीलंडचा विजयाच्या मार्गावर आणून ठावले.
 • न्यूझीलंडचा पहिला डाव 237 धावांत संपुष्टात आला.

जगातील प्रमुख शहरांत मुंबईने स्थान पटकावले :

 • बड्या अर्थव्यवस्थांना चालना देणाऱ्या, विकासाचे ‘इंजिन’ समजल्या जाणाऱ्या जगातील प्रमुख शहरांत मुंबईने स्थान पटकावले आहे.
 • नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात शांघाय, बीजिंग आणि दुबईनंतर व्यापाराच्या दृष्टीने मुंबई जगातील चौथ्या क्रमांकाचे उदयोन्मुख शहर झाले आहे.
 • देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत किरकोळ ग्राहकांची मागणी काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जेएलएल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढला आहे.
 • “ग्लोबलायझेशन ऍण्ड कॉम्पिटिशन : दी न्यू वर्ल्ड ऑफ सिटीज‘ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.
 • विकासाचा वेग वाढवण्यासाठी गुंतवणुकीवर भर, दर्जेदार सोयीसुविधा, कुशल मनुष्यबळ हे घटक महत्त्वाचे आहेत. या यादीत दिल्ली आणि बंगळूर अनुक्रमे 14 आणि 18 व्या स्थानी आहेत.
 • मुंबईला आजही जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. प्रमुख महागड्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत रिअल इस्टेट, आयटी, आऊटसोर्सिंग तसेच इतर क्षेत्रांत मोठी गुंतवणूक झाली आहे; मात्र त्या तुलनेत पायाभूत सोयीसुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे या शहरात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना दळणवळण, शीतगृहांची कमतरता अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
 • शहराला ‘स्मार्ट‘ करण्यासाठी नियोजनबद्ध विकासाची गरज असून केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच महापालिकेची भूमिका महत्त्वाची असेल, असे मत या अहवालात मांडण्यात आले आहे.

यंदाच्या मिस वर्ल्ड किताबाच्या स्पर्धेत स्पेनच्या मिरिया लालगुना हिने बाजी मारली :

 • क्षिण चीनमधील हैनान प्रांतात शनिवारी रात्री झालेल्या यंदाच्या मिस वर्ल्ड किताबाच्या स्पर्धेत स्पेनच्या मिरिया लालगुना हिने बाजी मारली आहे.
 • स्पेनमधील बार्सिलोना शहरातील मिरिया फार्मसीचे शिक्षण घेते. तिने जगभरातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या 113 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हा किताब पटकाविला.
 • सान्या शहरात 65 व्या मिस वर्ल्ड किताबासाठी झालेल्या या स्पर्धेत परीक्षकांनी एकमताने मिरियाची निवड केली.
 • या स्पर्धेत रशियाची सोफिया निकीटचक दुसऱ्या आणि इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर राहिली. या निवडीनंतर मिरिया म्हणाली, की सर्व नागरिकांकडून मला मोठा पाठिंबा मिळाला. याचमुळे मी हा किताब जिंकू शकले. मी खूप आनंदी आहे.

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण :

 • भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने व्यावसायिक सर्किटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना बुल्गारियाच्या सामेत हुसेइनोव्ह याला नमवताना विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
 • प्रथमच सहा फेऱ्यांच्या लढतीत सहभागी झालेल्या विजेंदरने दुसऱ्या फेरीत अवघ्या 35 सेकंदातच हुसेइनोव्हवर ठोशांची बरसात केली.
 • त्यामुळे रेफरीला अखेर ही लढत थांबवावी लागली व भारतीय मुष्टियोद्ध्याला तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजयी घोषित करावे लागले.
 • आॅक्टोबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारा ऑलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये अजूनपर्यंत एकही लढत गमावलेली नाही. त्याने त्याचे तिन्ही विजय नॉकआऊट पद्धतीने तीन फेऱ्यांच्या आतच मिळवले.
 • विजेंदरची लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि त्यांनी ‘सिंग इज किंग’ या धुनीवर स्टेडियममध्ये प्रवेश केला.
 • लढतीआधी डरकाळ्या फोडणारा हुसेइनोव्ह विजेंदर रिंगमध्ये उतरताच घाबरलेला दिसला.
 • भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरने रिंगमध्ये लीलया मुव्हमेंट करताना बुल्गारियाच्या प्रतिस्पर्ध्यास बॅकफूटवर ढकलले. 

15 खेळाडू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले :

 • भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी 2015 वर्ष संमिश्र यशाचे ठरले. ज्यात 15 खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि युवा खेळाडू दुती चंदचा जागतिक संघटना आयएएफविरुद्ध ऐतिहासिक विजय हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.
 • भारताने अद्यापपर्यंत ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचे खाते उघडले नाही; परंतु आतापर्यंत 15 खेळाडू पात्र ठरल्यामुळे पुढील वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे ट्रॅक अँड फिल्डचे पथक मोठे होण्याची शक्यता आहे.
 • भारताचा दिग्गज थाळीफेकपटू विकास गौडा हा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आयएएफने सहभागींची संख्या निश्चित केल्यानंतर क्वालिफिकेशन स्तर 66 मीटरवरून 65 मीटर केला. गौडाने मे महिन्यात जमैका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान 65.14 मीटर थाळीफेक करीत आपला सहभाग निश्चित केला होता.
 • बीजिंगमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. यात फक्त ललिता बाबर हिने 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. ती आठव्या स्थानी राहिली होती. यादरम्यान तिने 9 मिनीट 27.86 सेकंद वेळेचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता.
 • भारतीय पथकाने चार सुवर्णपदकांसह एकूण 13 पदके जिंकताना तिसरे स्थान मिळवले.
 • माजी आॅलिम्पिक चॅम्पियन सॅबेस्टियन यांची या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवड झाली. दरम्यान अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रथमच ब्रिटनचे ऑलिम्पियन डेरेक बुसे यांना हाय परफॉर्मन्स संचालक नेमण्यात आले. त्यांचे लक्ष्य 2020 ऑलिम्पिकपर्यंत भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये कमीत कमी एक पदक मिळवून देणे हे आहे.

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-20 क्रिकेटमध्ये केला विश्वविक्रम :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 600 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
 • सध्या गेल ऑस्टे्रलियामध्ये बिग बैश टी-20 स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ब्रिस्बेन हिट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने 16   चेंडूंत 23 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने 2 षटकारही खेचले. यासह गेलने आपल्या टी-20 कारकिर्दीमध्ये 600 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला.
 • सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचाच किएरॉन पोलार्ड आहे.
 • पोलार्डने आपल्या टी-20 मध्ये 388 षटकार खेचले असून, तृतीय स्थानावरील न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने 290 षटकार ठोकले आहेत. त्याचवेळी चौकारांच्या बाबतीतही गेलने आपली छाप पाडली असून, तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.
 • ऑस्टे्रलियाच्या ब्रॅड हॉजने सर्वाधिक 664 चौकार मारले असून, गेलने 653 चौकार खेचले आहेत.
 • त्याचप्रमाणे टी-20 मध्ये गेलच्या नावावर सर्वाधिक 8,363 धावांचा विक्रम असून, सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची 2015 ची मिस वर्ल्ड बनली :

 • स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची 2015 ची मिस वर्ल्ड बनली आहे.
 • रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.
 • चीनच्या ब्युटी क्राऊन ग्रँड टरी हॉटेलमध्ये तीन तास चाललेल्या मिस वर्ल्डच्या या भव्य कार्यक्रमात मिरिया लालागुना रोयोची निवड जाहीर करण्यात आली.
 • मागील वर्षीची विजेती दक्षिण आफ्रिकेची रोलेने स्ट्रॉस हिने मिरियाला मिस वर्ल्डचा मुकुट देऊन गौरविले.
 • मिरिया लालागुना रोयो ही बार्सिलोनाची रहिवासी आहे आणि ती सध्या फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकत आहे. मिरिया ही अतिशय उत्कृष्ट पियानो वाजविते.
 • दरम्यान, भारताची आदिती आर्या पहिल्या 20 स्पर्धकांमध्येही स्थान मिळवू शकली नाही.

चार दशकानंतर प्रथमच ‘मिस इराक’ स्पर्धा :

 • युद्ध व यादवीने उद्ध्वस्त झालेल्या इराकमध्ये चार दशकांनंतर प्रथमच सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली असून वीस वर्षांची शायमा अब्देल रहमान ‘मिस इराक’ मुकुटाची मानकरी ठरली.
 • अल्कोहोल फ्री व स्वीमिंग सूट स्पर्धेचा समावेश नसलेली ही स्पर्धा एक महत्त्वाचा विजय मानला जात आहे.
 • स्पर्धेचे आयोजक हुमाम अल-ओबेदी म्हणाले की, आमचे जीवनावर प्रेम नाही असे काहींना वाटते.
 • आपल्या प्रसिद्धीचा वापर शैक्षणिक प्राधान्यासाठी करणार असून युद्धामुळे विस्थापित झालेल्यांच्या शिक्षणाची समस्या गंभीर आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) सहकार्य घेणार :

 • अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या चित्रांच्या मदतीने देशातील अवैध खाणकाम हुडकून काढण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) सहकार्य घेणार आहे.
 • राज्यांना आपल्या खाणींचे उपग्रहांमार्फत छायाचित्र घेण्यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि प्रत्येक 15 ते 30 दिवसांत ते नियमितपणे अद्ययावत सांगितले जाईल.
 • गरिकांना उत्तम आणि प्रभावी सेवा पुरविण्यासाठी इस्रोशी सहकार्य करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या प्रारंभी खनन आणि शहर विकास मंत्रालयासह अन्य काही मंत्रालयांना दिलेले होते. अवैध खाणकामांवर निगराणी ठेवण्यासाठी सरकारने योजना तयार केल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
 • प्रमुख खनिज पदार्थांचा शोध घेण्यासाठी इंडियन ब्युरो आॅफ माईन्स (आयबीएम) आणि इस्रो यांच्यादरम्यान स्वाक्षरी होणार असलेल्या सामंजस्य कराराचा (एमओयू) मसुदा आयबीएमद्वारे तयार करण्यात आलेला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

राम मंदिरासाठी देशभरातून शिलादानाचे आवाहन :

 • राम मंदिरासाठी देशभरातून शिलादानाचे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केल्यानंतर आज दोन ट्रक भरून शिला अयोध्येत आणण्यात आल्या. सहा महिन्यांपूर्वी विहिंपने हे आवाहन केले होते.
 • अयोध्येतील विहिंपच्या मालकीच्या रामसेवक पुरम येथे या शिला उतरविण्यात आल्या असून, रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी शिलापूजन केले. मंदिर उभारणीची ‘वेळ’आल्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
 • दरम्यान, अयोध्येचा मुद्दा राजकीय आणि न्यायालयीन वादात अडकला असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पालोक बसू हा प्रश्‍न शांततामय मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

चेन्नईचा कर्णधार इलॅनो ब्लुमेर याला गोवा संघाच्या सहमालकांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक :

 • चेन्नई संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेतेपद पटकाविल्यानंतर काही वेळातच चेन्नईचा कर्णधार इलॅनो ब्लुमेर याला गोवा संघाच्या सहमालकांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आयएसएलमध्ये चेन्नई आणि गोवा संघांमध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यात चेन्नई संघाने 3-2 असा विजय मिळविला.
 • विजयानंतर इलॅनो याने गोवा संघाचे सहमालक दत्तराज साळगावकर यांचा अपमान करत शिवीगाळ केली. या प्रकरणानंतर इलॅनोला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर 341 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरणावेळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत होते.
 • या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही उपस्थित होते.

‘राफेल’च्या 36 विमानांमुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्याला बळकटी मिळणार नाही :

 • आपल्या पाचव्या पिढीची ग्रायपेन ही लढाऊ विमाने भारतात तयार करणे आणि त्यासोबतच भारताला या विमानाचे तंत्रज्ञानही देण्याचा प्रस्ताव स्वीडनच्या ‘साब’ या संरक्षण साहित्याचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने दिला आहे.
 • ‘साब’ला 2011 मध्ये भारतीय वायुसेनेसाठी ‘मिडीयम मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’चा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळविण्यात अपयश आले होते. हे कंत्राट डसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीला मिळाले होते. ‘राफेल’च्या 36 विमानांमुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्याला बळकटी मिळणार नाही.
 • ‘साब’ने भारतात केवळ एक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचाच प्रस्ताव दिलेला नाही तर पुढची 100 वर्षेपर्यंत विमान क्षेत्राच्या विकासात मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.
 • एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या विमानांचा विकास व डिझाईनचे काम पाहात आहे.

बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी मोबाईल कॉल दर घटविले :

 • बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी मोबाईल कॉल दर योजनेतहत मोबाईल कॉल दर 80 टक्क्यांपर्यंत घटविले आहेत. अर्थात, ही सवलत पहिल्या दोन महिन्यांसाठीच लागू राहील.
 • बीएसएनएलचे चेअरमन व प्रबंध संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनीने आपला पायाभूत आराखडा ठीकठाक केला असून, नवीन ग्राहकांसाठी पहिल्या दोन महिन्यांसाठी कॉल दर 80 टक्क्यांपर्यंत घटविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या चांगल्या सेवेचा त्यांना अनुभव घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
 • कनेक्शन घेतल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांसाठी ते लागू राहतील. नवीन ग्राहकांना कनेक्शन घेण्यासाठी प्रतिसेकंद प्लानसाठी 36 रुपये आणि प्रतिमिनिट प्लानसाठी 37 रुपयांचे व्हाऊचर खरेदी करावे लागेल.
 • जे ग्राहक 37 रुपयांची योजना निवडतील, त्यांना बीएसएनएलच्या क्रमांकावर लोकल आणि एसटीडी कॉलसाठी 10 पैसे प्रतिमिनिट आकारण्यात येतील.
 • याच योजनेतील ग्राहकांनी अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास 30 पैसे प्रतिमिनिट आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 36 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांकडून बीएसएनएलच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या लोकल व एसटीडी कॉलसाठी तीन सेकंदांसाठी एक पैसा आणि दुसऱ्या नेटवर्कसाठी तीन सेकंदांसाठी 2 पैसे चार्ज लागेल.

काँग्रेसच जीएसटी विधेयकाला अडथळे : 

 • वस्तू व सेवा कर विधेयकात (जीएसटी) सरकारने कराचा प्रत्यक्ष दर समाविष्ट न करण्याची जी भूमिका घेतली आहे, ती चुकीची आहे, असे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. कराचा दर हा वैधानिक पद्धतीत म्हणजेच विधेयकात समाविष्ट करण्याची पूर्वापारपासूनची पद्धत आहे व विशेष परिस्थितीत नवीन कर लादण्याचे अधिकारही सरकारला असतात, असे त्यांनी सांगितले.
 • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असे म्हटले होते, की काँग्रेसच जीएसटी विधेयकाला अडथळे आणत आहे, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिदम्बरम यांनी सांगितले, की सरकारला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. सोनिया गांधी व नरेंद्र मोदी यांची त्यावर चर्चाही झाली होती.
 • मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या जीएसटीबाबत आमच्या तीनपैकी दोन मागणया आधीच मान्य केल्या आहेत. त्यात आंतरराज्य वस्तू वाहतुकीवर 1 टक्का अतिरिक्त कर लावू नये असे काँग्रेसचे म्हणणे असून जीएसटी कर 18 टक्क्य़ांपेक्षा जास्त असता कामा नये असे म्हटले आहे.

जम्मू व काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार सत शर्मा : 

 • जम्मू व काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार सत शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खासदार जुगलकिशोर शर्मा यांच्या जागी ही निवड झाली आहे.
 • नुकत्याच झालेल्या लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
 • शर्मा यांच्या नेतृत्वात भाजप बळकट होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात व्यक्त केली.

पृथ्वीपासून 14 प्रकाशवर्षे दूर :

 • सौरमालेबाहेरचा जास्त वसाहतयोग्य असलेला ग्रह खगोलवैज्ञानिकांनी शोधला असून तो आपल्या पृथ्वीपासून 14 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाभोवती फिरत आहे.
 • हा ग्रह वस्तुमानाने आपल्या पृथ्वीच्या चार पट असून लाल रंगाच्या वूल्फ 1061 या ताऱ्याभोवती फिरत असलेले जे तीन ग्रह आहेत, त्यांच्यापैकी तो एक ग्रह आहेत.
 • ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचे डंकन राईट यांनी हा शोधनिबंध लिहिला असून त्यात म्हटल्यानुसार हा उत्साह वाढवणारा शोध असून कारण तीनही ग्रह खडकाळ असण्यास आवश्यक इतक्या वस्तुमानाचा असून त्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे.
 • वूल्फ 1061 पेक्षाही जवळ अंतरावरच्या काही ताऱ्यांभोवतीही ग्रह सापडले आहेत, तेही वसाहतयोग्य असू शकतात. आता सापडलेले तीन ग्रह थंड असून ताऱ्याभोवती त्यांची प्रदक्षिणा अनुक्रमे 5, 28 व 67 दिवसांत पूर्ण होते. त्यांची वस्तुमाने ही पृथ्वीच्या 1.4, 4.3 व 5.2 पट आहेत.
 • बाहेरचा मोठा ग्रह हा वसाहतयोग्य गोल्डीलॉक झोनच्या बाहेर आहे व तोही खडकाळ असू शकतो तसेच आतल्या भागातील ग्रह ताऱ्याच्या जवळ असून तोही वसाहतयोग्य ठरू शकतो.
 • वूल्फ 1061 बाबत हायअ‍ॅक्युरसी रॅडियल व्हेलॉसिटी प्लॅनेट सर्चर स्पेक्ट्रोस्कोप या युरोपीयन सदर्न ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळेच्या वर्णपंक्तीमापकाचा वापर केला आहे.हे तीनही ग्रह आपल्या परसदारी असल्यासारखे असून ते वसाहतयोग्य ग्रहांच्या गटात मोडतात. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.