Current Affairs of 20 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2015)

शांतता प्रक्रिया ठरावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी :

 • सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली.

  तथापि, गुंतागुतीचे विषय विशेषत: अध्यक्ष बशर अल असद यांची काय भूमिका असेल याचा उल्लेख ठरावात नाही.

 • सिरियात संघर्ष सुरू झाल्यापासून सुरक्षा समितीत याबाबतचा हा पहिलाच ठराव आहे. ठरावात म्हटले आहे की, सिरियातील युद्ध संपुष्टात यावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख बान की मून यांनी पुढील महिन्यात 2012 च्या जिनिव्हा करारानुसार त्या देशातील सरकार व विरोधी पक्षांची बैठक बोलवावी.
 • जेणेकरून तेथील संघर्षावर तोडगा काढला जाईल.
 • सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने राजकीय प्रक्रिया सुरू केली जाईल व येत्या सहा महिन्यांत तेथे विश्वासार्ह, वंशभेदरहित, सर्वसमावेशक अशी राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली जाईल. तसेच नवी राज्यघटना तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. त्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीत सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली निवडणुका होतील.

सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायणाची प्रत सापडली :

 • कोलकात्यातल्या एका संस्कृत वाचनालयामध्ये अभ्यासकांना सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायणाची प्रत सापडली असून ही वाल्मिकी रामायणापाठोपाठची सगळ्यात जुनी प्रत असण्याची शक्यता आहे.
 • विशेष म्हणजे या रामायणात रामाला देवत्वापेक्षा जास्त मानवी अंगाने रंगवण्यात आले आहे. राम, सीता व रावण यांच्याभोवती रामायण घडत असले तरी दु:ख, अपयश आदी भाव भावनांचा या रामायणात विस्ताराने समावेश करण्यात आला आहे.
 • ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातले वाल्मिकी रामायण व 12व्या शतकातले तमिळ कवी कंब यांचे रामायण समाजमान्य असून त्यामध्ये सात खंड आहेत. मात्र, कोलकात्यात आढळलेल्या रामायणात मात्र पाच खंड आहेत आणि रामाच्या बालपणीच्या कालखंडाचा याच समावेश नाहीये. या रामायणात काही बाबी बारकाईने दिल्या आहेत.

  विवाहाच्या वेळी राम व सीतेचे वय काय होते, रावणाने सीतेला पळवले तो दिवस कुठला आदी बाबींचा समावेश या रामायणात असल्याचे या विषयातील तज्ज्ञ मनबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले आहे.

 • रामायणाची ही आवृत्ती अपघातानेच हाती लागली आहे. काही अभ्यासक संस्कृत वाचनालयामध्ये सहाव्या शतकातल्या अग्निपुराणावर संशोधन करत असताना त्यांना हे रामायण सापडले.

सीबीएसईची पुस्तके आता ऑनलाइनवर मोफत उपलब्ध :

 • सीबीएसईची पुस्तके आता ऑनलाइनवर मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत व तो सरकारच्या सुप्रशासन प्रयत्नांचा एक भाग आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.
 • पूर्व दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयातील कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सांगितले की, शाळांच्या अध्यापन प्रक्रियेत सुधारणा व्हावी व मुलांना शिक्षणाची चांगली साधने उपलब्ध व्हावीत हा त्यामागचा हेतू आहे.
 • सध्या एनसीईआरटीची पुस्तके ऑनलाईनवर इ बुक स्वरूपात उपलब्ध आहेत, मोबाइलवरही ही पुस्तके अ‍ॅपवर पाहता येतात. सीबीएसईची पुस्तकेही आता ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. त्यात चित्रफितीही असतील व त्यातून शिक्षणासाठी आणखी सुलभता निर्माण होणार आहे, सुप्रशासनाचाच हा एक भाग आहे.

राज्य कामगार विमा सेवेचे कार्डवाटप :

 • औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा सेवेचे कार्डवाटप करण्यात आले.
 • गंभीर आजार, शस्त्रक्रिया, अपघात किंवा अपघाती मृत्यू यासारख्या घटना घडल्यास या कार्डाचा आधार मिळतो. या सेवेचा लाभ एकूण 180 महिला व पुरुष कामगारांना मिळणार आहे.
 • विशेषतः महिला कामगारांना प्रसूतीकाळात सहा महिने पगारही मिळणार आहे. पुरुष कामगारांनाही काही गंभीर आजार झाल्यास उपचारांसह दरम्यानचा पगारही मिळणार आहे.
 • या सेवेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करणे आवश्‍यक असून, पगारातील साडेचार टक्के हिस्सा हा ठेकेदाराच्या वतीने; तर पावणेदोन टक्के हिस्सा कामगाराच्या पगारातून कपात केला जाणार आहे.

निवृत्त न्यायाधीश वीरेंद्र सिंह हे लोकायुक्तपदाची शपथ घेणार नाही :

 • निवृत्त न्यायाधीश वीरेंद्र सिंह हे लोकायुक्तपदाची शपथ घेणार नसल्याचे उत्तर प्रदेश सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले.
 • तीन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा निर्णय दिला होता.
 • सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले होते. या प्रकरणी 20 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता.

दिनविशेष :

 • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) स्वातंत्र्य दिन
 • 1995 : नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
 • 1999 : पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.