Current Affairs of 19 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2015)

आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी केले निलंबित :

 • “कॉल मनी” रॅकेटप्रकरणी राज्य शासनाने चर्चा करावी, या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या वायएसआर कॉंग्रेसच्या पन्नास सदस्यांना आज आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याचाही समावेश आहे.

माजी संरक्षण सचिव आर. के. माथूर यांची नियुक्ती :

 • माजी संरक्षण सचिव आर. के. माथूर यांची मुख्य माहिती आयुक्तपदी (सीआयसी) नियुक्ती करण्यात आली.
 • विजय शर्मा हे डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यामुळे सीआयसीचे पद रिक्त होते. सध्या कार्यरत असलेल्या माहिती आयुक्तांमधून सीआयसीची निवड करण्याच्या प्रथेला फाटा देत सरकारने माथूर यांची निवड केली आहे.

मदर टेरेसा यांना लवकरच संत घोषित केले जाणार :

 • गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर टेरेसा यांना लवकरच संत घोषित केले जाणार आहे.
 • पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या दुसऱ्या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली असून, यामुळे टेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.
 • मदर तेरेसा यांना संताचा दर्जा मिळणार असून, आम्हाला याबाबत व्हॅटिकनकडून अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे. चर्चने दुसऱ्या चमत्कारालाही मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला ‘चमत्कार’ झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती.
 • 2003 मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांना तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती.
 • मदर तेरेसा यांनी 87 वर्षांच्या असताना 1997 मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1979 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय :

 • कामात पारदर्शीपणा आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने आयपीएलमधील रिटेन खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून फॅ्रन्चायसींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली.
 • आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवी फ्रॅन्चायसी पुणे आणि राजकोट यांच्यासाठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेची माहिती बीसीसीआय वेबसाईटवर टाकण्याची घोषणा केली. ही माहिती 31 डिसेंबरपर्यंत पहिली ट्रेडिंग विंडो संपताच उपलब्ध होईल. यामुळे रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंचे मूळ वेतन सार्वजनिक होणार आहे.

भारताने रशियाकडून हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेण्यास मान्यता :

 • पाकिस्तान व चीन यांच्याबरोबरच्या सीमारेषेवर सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने रशियाकडून एस-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेण्यास मान्यता दिली आहे.
 • अशी पाच प्रगत क्षेपणास्त्रे  खरेदी केली जात असून त्यांची किंमत 39 हजार कोटी रूपये आहे.
 • ही क्षेपणास्त्रे (229 नाटो देशांनाही हादरवणारी असून त्यांच्या मदतीने 40 कि.मी टप्प्यातील विमाने, लढाऊ विमाने व ड्रोन विमाने तसेच इतर क्षेपणास्त्रे 229 यांना लक्ष्य करता येते.
 • संरक्षण शस्त्रास्त्र खरेदी मंडळाने रशियाशी हा करार सरकार पातळीवर करण्याचे ठरले आहे. एस 400 क्षेपणास्त्रे 229 तनात करण्यास प्रत्यक्षात काही वर्ष लागणार आहेत.
 • पश्चिमकेडील पाकिस्तान सीमेवर तीन व पूर्वेकडे चीनच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे लावल्यानंतर भारताची संरक्षक फळी मजबूत होणार आहे.

यंदाचे वर्ष 136 वर्षांतले सर्वात उष्ण वर्ष :

 • यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरणार असून गेला नोव्हेंबर महिना हा गेल्या 136 वर्षांतला सर्वात उष्ण ठरला आहे.
 • पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे कल बघता हे वर्षही इतिहासातील उष्ण वर्षांमध्ये नोंदले जाईल, असे अमेरिकी सरकारच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
 • नोव्हेंबरशिवाय इतर सात महिन्यातही विक्रमी तापमानाची नोंद झाली असल्याचे नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे एनओएए या संस्थेने त्यांच्या मासिक हवामान अहवालात म्हटले आहे.
 • नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान 1.75 अंश फॅरनहीट (0.97 अंश सेल्सियस) होते व ते विसाव्या शतकातील सरासरी पृष्ठभाग तापमानापेक्षा अधिक होते. नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान 1880 ते 2015 या काळातील सर्वाधिक होते. यावर्षी नऊ महिन्यात उष्णतेचा विक्रम मोडला गेला आहे. 2015 च्या पहिल्या अकरा महिन्यात जगातील जमीन व सागरावरचे तापमान सर्वाधिक होते.
 • 2015 हे उष्णतेत 2014 या गेल्या वर्षांला मागे टाकणार आहे. जगात सगळीकडेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त होते, असे एनओएएचे हवामान वैज्ञानिक जेक क्राउन्च यांनी सांगितले. तसेच जपानमध्ये तुलनेने गेला महिना कमी तापमानाचा होता तशी स्थिती यापूर्वी 1910 मध्ये होती.

‘कोर्ट’ चित्रपट ऑस्करच्या पात्रता फेरीतच झाला बाद :

 • ‘कोर्ट’ हा चैतन्य ताम्हणे यांचा मराठी चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट परदेशी चित्रपट स्पर्धेच्या पात्रता फेरीत बाद झाला आहे. एकूण 80 चित्रपट स्पर्धेत होते, त्यातील नऊ चित्रपट ऑस्कर स्पर्धेच्या अंतिम फेरीत उरले आहेत. त्यातील सात युरोपियन आहेत. 88 व्या ऑस्कर स्पर्धेसाठी आता पुढच्या टप्प्यात या चित्रपटांमध्ये चुरस आहे.
 • ताम्हणे यांचा पहिलाच चित्रपट असलेल्या ‘कोर्ट’ला राजकुमार हिराणी यांचा पी.के., नीरज घायवन यांचा कान पुरस्कार विजेता मसान, उमंगकुमार यांचा मेरी कोम, विशाल भारद्वाज यांचा हैदर, एम मणिकंदन यांचा काका मुटाई व एसएस राजामौळी यांचा बाहुबली या चित्रपटांशी भारतातून निवड होताना सामना करावा लागला होता.
 • बेल्जियमचा द ब्रँड न्यू टेस्टॅमेंट, कोलंबियाचा एम्ब्रेस ऑफ द सर्पेट, डेन्मार्कचा ए वॉर, फिनलंडचा द फेन्सर, फ्रान्सचा मस्टँग, जर्मनीचा लेबरिंथ ऑफ लाईज, बंगेरीचा सन ऑफ सोल, आर्यलंडचा विवा, जॉर्डनचा थीब यांचा समावेश आहे. यातील नऊ पैकी सात चित्रपट युरोपातील आहेत, तर एक मध्यपूर्वेतील आहे. एक दक्षिण अमेरिकेतील आहे, आशिया व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व मेक्सिको यांना स्थान मिळालेले नाही.
 • ऑस्ट्रियातील गुडनाईट मॉमी, ब्राझीलचा द सेकंड मदर, इराणचा महंमद- द मेसेंजर ऑफ गॉड, पॅलेस्टाईनचा द वाँटेड 18, पोलंडचा 11 मिनिटस, पोर्तुगालचा अरेबियन नाईट व्हॉल्यूम 2, द डेझोलेट वन हे चित्रपट प्रवेश मिळवू शकले नाहीत.
 • ऑस्कर पुरस्काराची नामांकने 14 जानेवारीला जाहीर होणार असून 28 फेब्रुवारीला हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर येथे पुरस्कार वितरण होईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.