Current Affairs of 20 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 जून 2017)

चालू घडामोडी (20 जून 2017)

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे उमेदवार :

 • बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सर्वांनाच धक्का दिला.
 • दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाने कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.
 • रालोआचा उमेदवार 23 जून रोजी ठरणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपाच्या संसदीय बोर्डाने कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
 • पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषण केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोविंद यांना फोन करून त्यांचे अभिनंदनही केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जून 2017)

अमेरिका भारतात बनवणार एफ-16 फायटर जेट :

 • पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी ‘एफ-16’ लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.
 • तसेच यासाठी ‘एप-16’ विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या ‘पॅरिस एअर शो’मध्ये अधिकृत करार झाला.
 • या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी ‘एफ-16’ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे.
 • भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-16’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.

डॉ. माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर :

 • भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर झाला.
 • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी ही घोषणा केली. यावेळी ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, विश्‍वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.
 • एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी दिनांक 26 जून रोजी सायंकाळी पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल.
 • तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील.

पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचे निधन :

 • पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचे 18 जून रोजी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.
 • नरेंद्र मोदी आणि स्वामी आत्मस्थानंद यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक ऋणानुबंध होते.
 • 1966 मध्ये स्वामी आत्मस्थानंद राजकोट येथील रामकृष्ण मठाचे प्रमुख म्हणून गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी मोदी स्वामी आत्मस्थानंद यांना पहिल्यांदा भेटले होते.
 • पंतप्रधान मोदींनी वयाच्या 20व्या वर्षी स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारण्याचा सल्ला दिला. मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानले होते.

दिनविशेष :

 • किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ यांचा जन्म 20 जून 1869 मध्ये झाला.
 • पुणे येथे 20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना झाली.
 • 20 जून 1997 हा मराठीतील प्रथम शायर वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ ‘भाऊसाहेब पाटणकर’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.