Current Affairs of 19 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 जून 2017)

चालू घडामोडी (19 जून 2017)

एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारत विजयी :

  • दिनांक 18 जून रोजी पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या.
  • शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती.
  • भारतीय हॉकी संघाने एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी 7-1 गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले.
  • पाकिस्तानचा पराभव केल्याने त्यांनी सर्वाची मने जिंकलीच. पण सोबतच भारतीय जवानांप्रती आदर दाखवत सर्वांचा मानही मिळवला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जून 2017)

राष्ट्रीय सेवा योजनेत सोलापूर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट :

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे पुरस्कार जाहीर झाले असून सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा सन्मान सोलापूर विद्यापीठाला मिळाला आहे.
  • 2016-17 या वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
  • विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती रुजावी, यासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
  • सोलापूर विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या डॉ. बब्रुवान काबंळे यांची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीकांत ठरला इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचा चॅम्पियन :

  • भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने अंतिम सामन्यात जपानचा क्वॉलिफायर काजुमासा साकाई याच्यावर सरळ गेम्समध्ये विजय नोंदवताना इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याचे हे सुपर सीरीजचे तिसरे विजेतेपद ठरले.
  • एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनच्या फायनल्समध्ये पोहोचणारा जगातील 22 व्या क्रमांकावरील खेळाडू श्रीकांतने 47 व्या रँकिंगच्या साकाई याचा अवघ्या 37 मिनिटांत 21-11, 21-19, असा पराभव करताना 75,000 डॉलर बक्षीस रकमेचा धनादेश आपल्या नावे केला.
  • तसेच श्रीकांतने 2014 मध्ये चायना सुपर प्रीमिअर आणि 2015 मध्ये इंडिया सुपर सीरीज जिंकली होती.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी :

  • चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला 180 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.
  • तसेच या पराभवासह पाकिस्तानने साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली.
  • चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला.
  • दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. पाकिस्तान संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.

दिनविशेष :

  • सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
  • 19 जून 1901 हा भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ ‘रामचंद्र बोस’ यांचा जन्मदिन आहे.
  • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 मध्ये महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.