Current Affairs of 21 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 जून 2017)

चालू घडामोडी (21 जून 2017)

अमिताभ बच्चन जीएसटीचे नवे ब्रँड अँबेसिडर :

  • बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत.
  • जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे.
  • केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली.
  • बच्चन यांच्यासोबत 40 सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे.
  • तसेच या आधी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू जीएसटीची ब्रॅंड अँबेसिडर होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जून 2017)

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवास :

  • निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसेच आपल्या विचारांमध्ये पॉसिटीव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योगा करा असा सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो.
  • इतकच नाही, तर योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे.
  • पण विशेष म्हणजे जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचे संपूर्ण श्रेय हे भारताला जाते.  
  • भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असे जाणकार सांगतात.
  • योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचलली होती. नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती.
  • तसेच या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम कसे असताता या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्थानी दोन वर्ल्डकप :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारताच्या यजमानपदाखाली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा स्थगित करीत त्याच्या जागी चार वर्षांच्या कालावधीत दोन टी-20 विश्वकप स्पर्धांच्या आयोजनाचा विचार करीत आहे.
  • आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी ही माहिती दिली. रिचर्डसन म्हणाले, पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2021 मध्ये होईलच, याची हमी देता येणार नाही. याबाबत आयसीसीच्या वार्षिक  बैठकीमध्ये या आठवड्यामध्ये चर्चा होईल. आम्ही विश्व स्पर्धेंदरम्यान पुरेसे अंतर ठेवण्यास प्रयत्नशील आहोत. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2021 मध्ये भारतात होणार आहे.
  • तसेच जर चार वर्षांत दोन टी-20 विश्वकप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रद्द करावी लागेल.

निम्न तापी लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना :

  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
  • तसेच या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसासिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
  • तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 502.09 दलघमी एवढा पाणीसाठा होणार असून 63 हजार 565 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या  प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे.
  • मात्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाणी उपसा करणे शक्‍य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी पाच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

दिनविशेष :

  • 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पाळला जातो.
  • भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापकपहिले सरसंघचालक ‘केशव बळीराम हेडगेवार’ यांचा 21 जून 1940 हा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.