Current Affairs of 20 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 जून 2016)

चालू घडामोडी (20 जून 2016)

RBI गव्हर्नरपदासाठी सात नावे चर्चेत :

 • रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याजागी कोण येणार याची आता चर्चा सुरु झाली आहे.
 • आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी एकूण सात उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
 • विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांचा आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी विचार होत आहे.
 • उर्जित पटेल सध्या आरबीआयचे उप गर्व्हनर म्हणून जबाबदारी संभाळत आहेत तसेच अरुंधती भट्टाचार्य  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जून 2016)

भारतीय हवाईदलाच्या इतिहासातील ‘माईलस्टोन’ :

 • भारतीय हवाई दलात (दि.18) इतिहास घडला. सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी इतिहास घडवित लढाऊ विमानांच्या कॉकपीटमध्ये प्रवेश केला.
 • अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंह या तीन रणरागिणींनी लढाऊ विमानांच्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे.
 • विशेष म्हणजे या तिन्ही महिला वैमानिकांकडे आणीबाणीच्या स्थितीमध्येही विमानाची सूत्रे सोपविण्यात येतील.
 • तसेच या तिघींचे यश हे भारतीय हवाईदलाच्या इतिहासातील ‘माईलस्टोन’ असल्याचे गौरवोद्‌गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले.
 • ‘एअरफोर्स अकादमी’च्या दीक्षान्त संचलनप्रसंगी बोलताना पर्रीकर यांनी लष्करातील लिंगसमानतेचा जोरदार पुरस्कार केला.

आयसीसीकडून वन-डे क्रिकेटसाठी नवीन लीगची योजना :

 • वन-डे क्रिकेटकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये काही बदल करण्याची तयारी केली आहे.
 • आयसीसीने जगातील 13 संघांच्या साथीने नव्या लीगचे आयोजन करण्याची योजना आखली आहे.
 • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी जगातील अव्वल 13 संघांच्या साथीने वन-डे लीगच्या आयोजनाची योजना आखत आहे.
 • 2019 पासून या नव्या लीगचा वन-डे क्रिकेटमध्ये प्रयोग होण्याची शक्यता आहे.
 • तसेच या नव्या नियमानुसार वन-डेतील 13 संघ आपसांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळतील.

चित्रपट महामंडळाची घटनादुरुस्ती :

 • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घटनेमध्ये सदस्यत्व नोंदणी, नूतनीकणापासून निवडणूक प्रक्रियेपर्यंतचे अनेक बदल करण्याची गरज संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
 • महामंडळाची घटना 1970 मध्ये तयार करण्यात आली होती.
 • घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
  त्यासाठी घटना समिती नेमण्यात आली असून समितीची पहिली बैठक दि. 21 जून रोजी होणार आहे.
 • ऑगस्टमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घटनादुरुस्तीला मंजुरी मिळणार आहे.
 • सप्टेंबर महिन्यापासून घटनादुरुस्ती लागू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष मेघराजे राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एनएसजी पाठिंब्यासाठी जयशंकर यांचा चीन दौरा :

 • अणवस्त्र तंत्रज्ञानावर नियंत्रण करणा-या एनएसजी देशांच्या संघटनेत भारताच्या समावेशाला चीनने पाठिंबा द्यावा यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर तीन दिवसांपूर्वी चीनला जाऊन आले.
 • चीनने विरोधाची भूमिका सोडून भारताला पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी चीनी अधिक-यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
 • दक्षिण कोरिया सेऊल येथे एनएसजी देशांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारताच्या प्रवेशावर अंतिम निर्णय होणार आहे.
 • तसेच बैठकीपूर्वी भारत सरकार एनएसजी समूहातील सर्व देशांचे एकमत घडवून आणण्यासाठी पडद्यामागून जोरदार कुटनितीक प्रयत्न करत आहे.
 • 48 देशांच्या एनएसजी समूहामध्ये भारताच्या प्रवेशाला चीनने विरोध केला आहे.
 • भारताचा समावेश करणार असाल तर, पाकिस्तानलाही स्थान द्या अशी भूमिका चीनने घेतली आहे.
 • 16-17 जून रोजी व्दिपक्षीय चर्चेसाठी परराष्ट्र सचिव चीनमध्ये होते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली आहे.

दिनविशेष :

 • आर्जेन्टिना ध्वज दिन.
 • 1921 : पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.