Current Affairs of 18 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जून 2016)

चालू घडामोडी (18 जून 2016)

सोमनाथ गिराम हे शैक्षणिक सदिच्छा दूत :

 • सोमनाथ गिराम याची शिक्षण विभागाने शैक्षणिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
 • सोमनाथ हा पुण्यात चहा विक्री करून सनदी लेखापाल बनला आहे.
 • सोमनाथची ही यशोगाथा हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरावी, म्हणून त्याची शैक्षणिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
 • विद्यापीठ, महाविद्यालयांत सोमनाथची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.
 • तसेच त्याच्या या यशामुळे अनेक विद्यार्थी ‘कमवा आणि शिका’ या योजनेमार्फत शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवू शकतील, अशी सरकारची धारणा आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जून 2016)

हाशिम आमला सर्वात वेगवान शतके करणारा फलंदाज :

 • दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने वेस्ट इंडिजविरोधात तिरंगी मालिकेत शतक ठोकत विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.
 • आमलाचे हे 23 वे शतक आहे. त्याने 135 एकदिवसीय सामन्यांत 132 डाव खेळत हे शतक पूर्ण केले.
 • तसेच तो याबाबतीत विराट कोहलीला मागे टाकत सर्वात वेगवान 23 शतके करणारा फलंदाज बनला आहे.
 • हाशिम आमलाने 132 डावांत 52.26 च्या सरासरीने 6429 धावा केल्या. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता.
 • तसेच या यादीत ए.बी. डीव्हीलियर्स (187 डाव) तिसऱ्या, तर सचिन तेंडुलकर (214 डाव) चौथ्या क्रमांकावर आहे.

स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची यशस्वी चाचणी :

 • भारताने (दि.17) स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची यशस्वी चाचणी घेतली.
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडने (एचएएल) तयार केलेल्या या हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) या विमानाच्या उड्डाणावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
 • तीनही सेवा दलांच्या प्रशिक्षणार्थी जवानांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे विमान तयार करण्यात आले आहे.
 • भारतीय हवाई दल किमान 70 एचटीटी-40 विमाने खरेदी करण्याची शक्‍यता आहे.
 • तसेच, ही संख्या दोनशेपर्यंत वाढविण्याचे सूतोवाचही पर्रीकरांनी केले आहेत. ही विमाने शस्त्रधारीही असतील. या विमानांना प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याची परवानगी 2018 पर्यंत मिळू शकते. हे विमान एचपीटी-32 या विमानाची जागा घेईल.

भारत, म्यानमार व थायलंड यांच्यात महत्त्वपूर्ण करार :

 • भारत आणि थायलंड यांच्यात महासागर तसेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत (दि.17) महत्त्वपूर्ण करार झाले.
 • भारत- म्यानमार- थायलंड या तीन देशांत त्रिपक्षीय राजमार्ग योजना आणि मोटार वाहन करार, तसेच आर्थिक सहकार्याबाबत लवकरात लवकर करार करण्यावर भर देण्यात आला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ चा यांच्यात हैदराबाद हाउसमध्ये दोन तासांहून अधिक काळ द्विपक्षीय शिखर परिषद झाली.
 • तसेच त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी करारासंदर्भात घोषणा केली.
 • उभय देशांत सांस्कृतिक देवाण-घेवाण तसेच नालंदा विद्यापीठ आणि चियांग मई विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सहकार्याबाबतच्या करारावर हस्ताक्षर करण्यात आले.

भारतातून चहाची विक्रमी निर्यात :

 • भारताला तब्बल 35 वर्षांनंतर चहा निर्यातीत 230 दशलक्ष किलोचा टप्पा पार करण्यात यश आले आहे.
 • गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) देशातून 232.92 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली आहे. त्याबदल्यात देशाला 4,493.10 कोटी रुपये मिळाले आहेत.
 • तसेच यापुर्वी 1980-81 साली देशातून 231.74 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती.
  त्याआधी 1976-77 आणि 1956-57 साली अनुक्रमे 242.42 दशलक्ष किलो आणि 233.09 दशलक्ष किलो चहा निर्यात झाला होता.
 • तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे.
 • रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात आणि पोलंडसारख्या देशांनी अधिक चहा खरेदी केल्याने निर्यात वाढली आहे.

गोव्यामध्ये सरकारी नोकरीची वयोमर्यादा 45 वर्षे :

 • सरकारी नोकरीसाठी सर्वसाधारण वर्गवारीची वयोमर्यादा 40 वरून 45 वर्षे करण्याचा निर्णय गोवा सरकारने (दि.17) घेतला.
 • राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी ही वयोमर्यादा वाढविण्याचा हेतू होता, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेतबोलताना माहिती दिली.
 • काही पदे वगळता यापूर्वी सर्वसाधारण गटात अ, ब, क व ड पदांसाठी सरकारी सेवेत नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे होती.
 • सरकारने नोकरभरती प्रक्रिया नियमांत दुरुस्ती करून ती आता 45 वर्षे केली आहे. ज्या पदांसाठी 40 वर्षे पूर्वी वयोमर्यादा होती, त्यांनाच ही लागू असेल.
 • क व ड वर्गातील पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा कमी होती किंवा अ व ब गटातील पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा अधिक होती. त्याला ही दुरुस्ती लागू होणार नाही, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
 • सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना यामध्ये पाच वर्षांची सूट असेल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.