Current Affairs of 17 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 जून 2016)
मनस्विनी लता रवींद्र यांना 2016 चा युवा पुरस्कार :
- साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या (दि.16) इंफाळ येथे झालेल्या बैठकीत 2016 साठीच्या युवा पुरस्कार आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
- मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या “ब्लॉगच्या आरश्यापल्याड” या लघुकथासंग्रहाची निवड करण्यात आली.
- तसेच बालसाहित्य पुरस्कारासाठी राजीव तांबे यांची निवड करण्यात आली.
- कोंकणी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अन्वेषा अरुण सिंगबाळ यांच्या ‘सुलुस’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली, तर बालसाहित्य पुरस्कारासाठी दिलीप बोरकर यांच्या ‘पिंटूची कल्लभोनवड्डी’ या लघुकादंबरीची निवड करण्यात आली.
- राजीव तांबे यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे.
- तसेच पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि गौरवचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
- बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिनी केले जाते.
Must Read (नक्की वाचा):
आता टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’ :
- टाईप रायटरची परीक्षा (दि.19) अखेरची असणार आहे. कारण टंकलेखनाच्या परीक्षांना आता फुलस्टॉप मिळाला आहे.
- राज्यभरातील टंकलेखन परीक्षा बंद होणार असून, त्याची जागा आता संगणक घेणार आहे.
- पूर्वी नोकरी करायची म्हटली की, टायपिंग येणे आवश्यक असायचे. पण बदलत्या काळानुसार मोठाल्या टाईपरायटरची जागा संगणकाने घेतली.
- संगणक अनेकांच्या पसंतीस उतरु लागला आणि कालांतराने टाईपरायटर मागे पडला.
- तसेच संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य शासनाने टंकलेखन परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अलका लांबा प्रवक्ते पदावरून निलंबित :
- दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.
- दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते.
- त्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावी. यामुळे झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल.
- तसेच या वक्तव्यावरून त्यांच्या पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत प्रवक्ते पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
भारत व घानामध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढणार :
- भारत व घानाला दहशतवादाचा समान धोका असल्याने सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात घानाला भेट दिली.
- तसेच घानाचे अध्यक्ष जॉन द्रमाणी महामा यांच्याशी मुखर्जी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही एक आपत्ती असून, दोन्ही देश त्याच्या छायेखाली आहे. त्यामुळेच अधिक सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
- घानाच्या विकासासाठी सवलतीच्या दरातील कर्जरूपाने भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल घानाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
- तसेच कॉन्टिनंट कोमेंडा साखर कारखाना व एलमिना मत्स्यप्रक्रिया प्रकल्पांसारख्या आर्थिक-सामाजिक योजनांमध्ये भारताच्या सहकार्याबद्दल घानाच्या अध्यक्षांनी मुखर्जी यांचे आभार मानले.
लष्करी सहकार्यवाढीस अमेरिकी सिनेटची मंजुरी :
- भारताबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यास अमेरिकी सिनेटने (दि.16) एकमताने मंजुरी दिली.
- तसेच त्यानुसार दोन्ही देशांत आता लष्करी नियोजन, संभाव्य धोक्याचे विश्लेषण, लष्करी दस्सावेज, गुप्त माहितीची देवाणघेवाण, लॉजिस्टिकल प्रतिसाद अशा क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
- अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार कायद्यातील सुधारणेला सिनेटने या आठवड्याच्या सुरवातीलाच 85-13 अशा मतांनी संमती दिली होती.
- तसेच त्यातील सुधारणेला सिनेटने आवाजी मतांनी मंजुरी दिली. सिनेटर जान सुलिव्हॅन यांनी हे दुरुस्ती विधेयक सादर केले.
- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारत-अमेरिकेतील सहकार्य वाढविण्यासाठी योग्य पातळीवर प्रयत्न करावेत, असे सिनेटने संमत केलेल्या विधेयकात म्हटले आहे.
दिनविशेष :
- 1867 : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.
- 1898 : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1920 : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा