Current Affairs of 16 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 जून 2016)
स्टेट बँकेच्या संलग्न बँकांचे विलीनीकरणाला मंजूरी :
- स्टेट बँकेच्या पाच संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
- (दि.15) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- तसेच यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा समावेश आहे.
- सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात स्टेट बँक आणि संलग्न बँकांच्या समभागांच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली.
- विलीनीकरणाची ही प्रक्रिया मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
यंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक बदल :
- अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीए, एमसीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा अनेक बदल करण्यात आले आहेत.
- ऑनलाइन अर्ज सादरीकरण, पसंतीक्रम भरण्याची पद्धत, प्रवेश फेऱ्या, बाद फेरी, कागदपत्रांची अनिवार्यता व त्यांची वैधता यांत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
- तसेच या बदलांविषयी सखोल माहिती 18 जून रोजी “पुणे अभियांत्रिकी महाविद्यालया”त (सीओईपी) आयोजित केलेल्या “प्रवेशाचा गेटवे” या मार्गदर्शन कार्यक्रमात दिली जाणार आहे.
- राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी स्वतः ही माहिती देणार आहेत.
- प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या तज्ज्ञांकडूनच मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
- सीओईपीमधील हा कार्यक्रम राज्यभरातील 250 हून जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांत (एआरसी सेंटर्स) थेट प्रक्षेपित होणार आहेत.
लुइस हॅमिल्टनकडून विजेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण :
- फॉर्म्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे.
- हॅमिल्टनने फॉर्म्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील 45वा विजय मिळवला.
- सेबॅस्टियन व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र नंतर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले. त्याने ही शर्यत एक तास, 31 मिनिटे, 5.296 सेकंदांत पूर्ण केली.
- तसेच विल्यम्स संघाच्या व्हालटेरी बोटासने तिसरे स्थान मिळवले.
भारताचा झिम्बाब्वेला ‘क्लीन स्विप’ :
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वन-डेत भारतानं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला.
- नागपूरचा सुपुत्र फैज फझलनं पदार्पणातच नाबाद राहत 61 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार लगावत 55 धावा काढून अर्धशतक पार केलं आहे.
- तसेच लोकेश राहुलनंही नाबाद खेळीच्या जोरावर 4 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला आहे.
- फैज फझल आणि लोकेश राहुलनं नाबाद खेळत 126 धावांची भागीदारी केली आहे.
- झिंबाब्वे 42.2 षटकांत सर्व बाद 123 तर भारत 21.5 षटकांत बिनबाद 126 धावा करत 123 धावांचा लक्ष्य पार केले.
श्रीदेवींना यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार :
- यंदा ‘आयफा रॉक्स 2016’ स्पेनमध्ये होणार आहे. हा सोहळा 23 ते 26 जून दरम्यान होईल.
- सर्वाधिक प्रतिष्ठित असा ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट’ हा अवॉर्ड यंदा ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना दिला जाणार आहे.
- तसेच आयफाच्या या पुरस्काराने गौरविल्या जाणाऱ्या श्रीदेवी या सर्वांत कमी वयाच्या स्टार ठरणार आहेत.
दिनविशेष :
- 1903 : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
- 1920 : हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार यांचा जन्म.
- 1963 : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक 6 या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा