Current Affairs of 15 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 जून 2016)

चालू घडामोडी (15 जून 2016)

‘ऍपल’ परिषदेसाठी अन्विताची निवड :

  • बालप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऍपल’ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऍप डेव्हलपर्सच्या परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या अन्विता विजय या नऊ वर्षाच्या बालिकेची निवड झाली आहे.
  • सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या ऍप परिषदेला उपस्थित राहणारी अन्विता ही सर्वांत लहान वयाची ऍप डेव्हलपर आहे.
  • या परिषदेत अन्विता वर्षभर युट्युब आणि इंटरनेटवर ‘फ्री कोडिंग ट्युटोरियल्स’चा अभ्यास करत होती.
  • तसेच तिने आपल्या नुकतेच रांगायला सुरूवात केलेल्या बहिणीसाठी ऍप विकसित केले आहे.
  • लहान मुलांना बोलायचे कसे, प्राणी कसे ओळखायचे याबाबत हे ऍप मार्गदर्शन करणार आहे.
  • आयफोनसाठी विकसित केलेल्या या ऍपद्वारे रंगांची ओळख कशी करतात हे ही लहान मुलांना शिकविण्यात येणार आहे.
  • जागतिक डेव्हलपर परिषदेचा एक भाग म्हणून अन्विताला ‘ऍपल’ची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जून 2016)

विश्वनाथन आनंदला मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद :

  • लिओन (स्पेन) पाच वेळचा विश्व चॅम्पियन भारताच्या विश्वनाथन आनंदने येथे सुरू असलेल्या मास्टर्स स्पर्धेत विक्रमी नवव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले.
  • सुपरग्रॅण्ड मास्टर्स आनंदने चीनच्या ग्रॅण्डमास्टर्स वेई यी कोला अंतिम फेरीत पराभूत केले.
  • 46 वर्षीय आनंदने अंतिम फेरीत पहिली बाजी मारल्यानंतर पुढील 3 डाव अनिर्णित राखले आणि 2.5-1.5 असे विजेतेपद आपल्या नावावर केले.
  • आनंदने यापूर्वी 1996-99-2000,01,05,06,07 आणि 2011 मध्ये हे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

शालेय विद्यार्थी सुरक्षेसाठी नवे ‘दामिनी स्कॉड’ :

  • शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भय विद्यार्थी अभियान’ राबविणार, विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी नव्याने ‘दामिनी स्कॉड’ निर्माण करणार अशा ठोस घोषणा मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधींच्या बैठकीत (दि.14) करण्यात आल्या.
  • पुणे पोलिस आणि महापालिकेचे शिक्षण मंडळ यांनी संयुक्तपणे शहरातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली.
  • विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांवर या वेळी मुक्तपणे चर्चा झाली.
  • शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी, अवाजवी शुल्कवाढ रोखणे, विद्यार्थिनींची सुरक्षितता अशा विद्यार्थ्यांशी संबंधित विषयावर या वेळी मते व्यक्त करण्यात आली तसेच त्यावर मार्गही सुचविण्यात आले.

जगातील ’10’ बुद्धिमान देश :

  • अमेरिकेतील मिन्नेआपोलिस या शहरातील ‘गॅझेट रिव्ह्यू’ कंपनीने बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था व काही चाचण्यांच्या आधारे एक सर्व्हे केला असून त्याद्वारे जगातील 10 बुद्धिमान देशांची नावे जाहीर केली आहेत.
  • पहिल्या क्रमांकावर हाँगकाँग, दुस-या स्थानी दक्षिण कोरिया व तिस-या क्रमांकावर जपान असून शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर स्वीडन हा देश आहे.
  • तसेच त्यानंतर क्रमवारीत तैवान, सिंगापूर, नेदरलँड, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया ह्या देशांची नावे आहेत.  
  • कोणत्याही देशांच्या तुलनेत हाँगकाँगमधील विद्यार्थी गणित व विज्ञानातील चाचणीमध्ये दुस-या स्थानावर असून फिनलँडनंतर सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था हाँगकाँगमध्येच आहे. तसेच हाँगकाँगचा सरासरी बुध्यांक 107 इतका आहे.
  • दक्षिण कोरिया हा देश जगातील सर्व इतर देशांपेक्षा अतिशय अभिनव कल्पना राबवणारा असून तेथील विद्यार्थी सर्व चाचण्यांमध्ये तिस-या क्रमांकावर आहेत. या देशाचा सरासरी बुध्यांक 106 आहे.

ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या गुरूसारख्या महाकाय ग्रहाचा शोध :

  • नासाच्या केप्लर अवकाश दुर्बिणीने दोन ताऱ्यांभोवती फिरणारा गुरूसारखा ग्रह शोधला असून तो आतापर्यंत शोधण्यात आलेला विश्वातील सर्वात मोठा खगोलीय घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • केप्लर 1647 बी असे या ग्रहाचे नाव असून तो हंस तारकासमूहात आहे.
  • तसेच त्याचा शोध नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरसॅनडियागो स्टेट युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे.
  • केप्लर 1647 हा ग्रह 3700 प्रकाशवर्षे दूर असून तो 4.4 अब्ज वर्षे जुना आहे. तो वयाने पृथ्वीइतकाच आहे असे संशोधकांनी म्हटले आहे.
  • तसेच तो ज्या ताऱ्यांभोवती फिरत आहे ते सूर्यासारखेच असून त्यातील एक सूर्यापेक्षा मोठा तर एक सूर्यापेक्षा लहान आहे. या ग्रहाचे वस्तुमान व त्रिज्या गुरूइतकी असून तो दोन ताऱ्यांभोवती सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रह असल्याचा दावा करण्यात आला.
  • जे ग्रह दोन ताऱ्यांभोवती फिरतात त्यांना सरकमबायनरी असे म्हटले जाते.

दिनविशेष :

  • 1938 : अण्णा हजारे, मराठी समाजसेवक यांचा जन्म.
  • 1954 : युएफाची स्थापना.
  • 1963 : नानासाहेब गोरे, ज्येष्ठ समाजवादी नेते यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.