Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 14 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 जून 2016)

चालू घडामोडी (14 जून 2016)

युवा भारतीय संघाने मालिका जिंकली :

 • धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 126 धावांत बाद केल्यानंतर 127 धावांचे आव्हान 26.5 षटकात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत 3 सामन्याची मालिका 2-0 ने जिंकली.
 • कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून झिम्बाम्वेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले.
 • झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात सर्वबाद 126 धावा केल्या.
 • के राहूल आणि करुन नायर यांनी 14.4 षटकात 58 धावांची सलामी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जून 2016)

याहू मेसेंजर आता नवीन मेसेंजरमध्ये अपडेट :

 • याहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे.
 • 1998 साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता.
 • एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर.
 • युझर्सला स्वत:च्या चाट रूम तयार करता येणे तसेच वेगवेगळे इमोशन्स पाठविता येणे यामुळे नेटकरी लोकांमध्ये याहू मेसेंजरने एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
 • मात्र जसजसा काळ बदलला तसतसा मेसेंजर मध्ये स्पर्धा निर्माण होत गेली.
 • फेसबुक मेसेंजर ,व्हॉट्सअ‍ॅप,आदी मेसेंजरच्या स्पर्धेत याहू मेसेंजर काहीसे मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे याहू मेसेंजर चे अनेक युझर्स इतर मेसेंजरकडे शिफ्ट झाले.
 • तसेच याचा परिणाम म्हणून याहू मेसेंजरने स्वत:मध्ये अनेक बदल घडवत नवीन याहू मेसेंजर डिसेंबर 2015 साली लॉंच केले.
 • आता मात्र याहूने त्यांचे 18 वर्ष जुने याहू मेसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याजागी नवीन याहू मेसेंजर अधिक फीचर्स सह आणणार आहे.

लिंक्डइन साइट ही मायक्रोसॉफ्टला जोडली जाणार :

 • सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे.
 • जगभरातल्या व्यावसायिकांसाठी संपर्काची सर्वात मोठी साइट म्हणून लिंक्डइन परिचित आहे.
 • मायक्रोसॉफ्ट ही साइट 26.6 बिलियन डॉलरला खरेदी करणार आहे.
 • 26.6 बिलियन डॉलरची भारतीय रुपयामध्ये किंमत 1,78,485 कोटी रुपये एवढी होती.  
 • लिंक्डइन खरेदी करण्यासंदर्भात रिड आणि जेफशी ब-याच काळापासून बोलत होतो, असंही यावेळी नाडेला यांनी सांगितलं आहे.
 • खरेदीसंदर्भातला करार 2016 मध्ये होणार असल्याचं कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
 • लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्टच्या उत्पादकता आणि व्यावसायिक प्रक्रियेचा भाग होणार असल्याची माहिती सत्या नाडेला यांनी दिली आहे.

‘आयसीएचआर’ची पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता :

 • 18 व्या शतकातील वैदिक पर्वापासून देशाने मिळविलेल्या प्राचीन वैज्ञानिक यशाचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर) पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
 • ऐतिहासिक संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या या परिषदेने बंगळुरूतील जैन विद्यापीठाचे प्राध्यापक आर. एन. अय्यंगार यांना पाच लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.
 • मार्च महिन्यात झालेल्या परिषदेच्या शेवटच्या बैठकीत गर्ग-ज्योतिषबाबत अभ्यास करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
 • तसेच या बैठकीचे इतिवृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, अनुदान दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे.
 • वृद्ध-गर्ग-संहिताच गर्ग-ज्योतिष म्हणून ओळखली जाते, या प्राचीन ग्रंथात 800 अध्याय आहेत आणि त्याचा आर्यभट्टांच्या गणितीय खगोलशास्त्रावर प्रभाव आहे, असा दावा अय्यंगार यांनी केला आहे.

दिनविशेष :

 • 1775 : अमेरिकन क्रांती खंडीय सेनेची स्थापना.
 • 1868 : कार्ल लॅण्डस्टेनर, रक्तगटांचे संशोधक यांचा जन्म.
 • जागतिक रक्तदाता दिन

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 जून 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World