Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 21 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 जून 2016)

चालू घडामोडी (21 जून 2016)

आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन :

 • देशभरात सर्वत्र (ता. 21) आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त जोरदार तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी विविध संस्था योग प्रशिक्षण शिबिरे अयोजित करत आहेत.
 • केंद्र सरकारनेही योग दिन जोरदार साजरा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.
 • 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर झाल्यानंतरचा हा दुसरा योग दिन आहे.
 • योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंदीगडमध्ये होणार आहे.
 • शाळांमध्ये योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे, तर हिमाचल प्रदेश सरकारने राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन केले होते.
 • विविध देशांमधील भारतीय दूतावासांनीही त्या त्या देशांशी संपर्क साधून योग दिनाची तयारी केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जून 2016)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मलेशियात अनावरण :

 • मलेशियातील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात (दि.20) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
 • तसेच या वेळी भारतीय राष्ट्रीय लष्कराचे (आयएनए) नऊ सदस्य उपस्थित होते, यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
 • गतवर्षी मलेशिया भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सांस्कृतिक केंद्राचे नाव “नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय सांस्कृतिक केंद्र” असे करण्याची घोषणा केली होती.
 • आयएनए, झाशी रेजिमेंट आणि बालक सेनेसाठी ऐतिहासिक असा हा क्षण नुकताच जुळून आला.

41 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात :

 • बरोबर आजच्याच दिवशी 41 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती.
 • सात जून ते 21 जून 1975 या कालावधील ही स्पर्धा झाली होती.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली होती.
 • प्रुडेनशियल कंपनीने स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याने पहिला वर्ल्डकप प्रुडेनशियल वर्ल्डकप म्हणून ओळखला जातो.
 • पहिला आंतराष्ट्रीय सामना 1844 मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
 • तसेच सध्या जगभरात 20 पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जातो.
 • 1877 मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली.
 • 1882 मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.

आयसीसी क्रमवारीत 13 व्या स्थानी अक्षर पटेल :

 • भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने (दि.20) जाहीर वन-डे गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 13 वे स्थान पटकावले, तर जसप्रीत बुमराहधवल कुलकर्णी यांनी झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर क्रमवारीतील स्थानामध्ये प्रगती केली आहे.
 • पटेलने झिम्बाब्वेविरुद्ध तीन बळी घेतले. तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज रविचंद्रन आश्विनच्या तुलनेत तीन स्थानांनी पिछाडीवर आहे.
 • वेगवान गोलंदाज बुमराह मालिकेत 9 बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने मानांकनामध्ये प्रगती करताना 97 वे स्थान पटकावले.
 • पाच बळी घेणाऱ्या कुलकर्णीने 29 स्थानांची प्रगती करताना 88 वे स्थान पटकावले आहे.

जागतिक शांततेसाठी लोकप्रिय संगीत दिन :

 • 1960 च्या सुमारास शहरातील तरुणांवर प्रभाव पाडणारे अमेरिकन सोल म्युझिक व रेग्गेचाही प्रभाव राहिला.
 • स्थानिकांमध्ये प्रिय असलेले बबलगम आणि जगाचे लक्ष वेधून घेणारी पहिली आफ्रिकन लोकप्रिय संगीत शैली क्वेला.
 • 1900 च्या सुमारास असलेली मराबी स्टाईल यांनी दक्षिण आफ्रिका, लेसोथो, स्वाझीलँड यांचे संगीत समृद्ध केले.
 • जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने सुरू केली. या दिवसाला तेथे ‘फेटे डे’ला ‘म्युसिक्यू’ असे संबोधतात.
 • फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरिश फ्लेरेट यांनी त्यावेळी असलेल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली.
 • लोकांना मोफत संगीत जलसे ऐकायला मिळावे यासाठी फ्रान्समध्ये एक घोषणा तयार करण्यात आली होती.
 • तसेच ‘म्युसिक्यू’ याचा अर्थ संगीत निर्माण करा.
 • जगभर संगीताच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करावी यासाठी युनेस्कोचे संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी 1975 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इतिहास रचण्यास सज्ज :

 • पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) काउंटडाऊन सुरू केले आहे.
 • बावीस जूनला सकाळी 9.26 वाजता येथील सतीश धवन अवकाशकेंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.
 • उड्डाणानंतर पन्नास मिनिटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.
 • तसेच यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्‍य होणार आहे.
 • अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे.
 • भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल.
 • तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे.
 • प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटांनंतर ‘पीएसएलव्ही’ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
 • तसेच याआधी पीएसएलव्ही-सी 9 च्या साह्याने ‘इस्रो’ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते.

दिनविशेष :

 • उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
 • दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
 • कॅनडा स्थानिक रहिवासी दिन.
 • आंतरराष्ट्रीय योग दिवस.
 • 1975 : वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World