Current Affairs of 20 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 जानेवारी 2017)
सीबीआयचे नवे संचालक आलोक कुमार वर्मा :
- दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची 19 जानेवारी रोजी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली.
- नीयत वयोमानानुसार वर्मा येत्या जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण आता त्यांना सीबीआय संचालक म्हणून पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल.
- तसेच या आधीचे संचालक अनिल सिन्हा गेल्या डिसेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिकामे होते व गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून काम पाहात होते.
- आलोक कुमार वर्मा हे 1979 च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. सीबीआय संचालक हे त्यांच्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील 24 वे पद आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार व लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे यांच्या निवड समितीकडून 45 पात्र उमेदवारांमधून वर्मा यांची निवड करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
महेंद्रसिंग धोनीचे वन-डे क्रिकेटमध्ये षटकारांचे व्दिशतक :
- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा वन-डे क्रिकेटमध्ये 200 षटकार ठोकणारा भारताचा पहिला आणि जगातील पाचवा फलंदाज बनला.
- तसेच दुसरीकडे युवराजसिंगने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा सचिनचा विक्रम मोडित काढला.
- कटकमध्ये दुसऱ्या वनडेत धोनीने स्वत:च्या 285 व्या सामन्यात सहा षटकारांसह 134 धावा ठोकल्या. धोनीच्या नावावर आता 203 षटकार झाले.
- पाकचा शाहीद आफ्रिदी याने सर्वाधिक 351, श्रीलंकेचा सनथ जयसूर्याने 270, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलने 238 तर धोनी आणि न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम यांनी 200 वर षटकार मारले.
- धोनीने 203 पैकी 191 षटकार भारतासाठी तर सात षटकार आशिया एकादशसाठी मारले आहेत. भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकण्यात धोनी आणि सचिन (195) नंतर सौरभ गांगुली (190), युवराजसिंग (152), वीरेंद्र सेहवाग (136), सुरेश रैना (120) आणि रोहित शर्मा (117) यांचा क्रम लागतो.
विजया राजाध्यक्षांना ‘जनस्थान’ पुरस्कार जाहीर :
- ज्येष्ठ लेखिका व समीक्षक-कथाकार विजया मंगेश राजाध्यक्ष यांना यंदाचा मराठीतील मानाचा “जनस्थान” पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या, मराठी भाषेतून गौरवास्पद लेखन करणाऱ्या साहित्यिकाला हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देऊन सन्मानित केले जाते.
- प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मुंबईत पुरस्कार निवड समितीचे सदस्य सतीश तांबे, दा. सु. वैद्य, रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर, अनुपमा उजागरे यांची मुंबईत बैठक झाली.
- तसेच त्यानंतर निवड समितीने विजया राजाध्यक्षांच्या नावाची घोषणा मुंबईत केली.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
- एक वर्षाआड दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप आहे.
प्रफुल्ल पटेल हे फिफाच्या अर्थ समितीच्या सदस्यपदी :
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (एआयएफएफ) खा. प्रफुल्ल पटेल यांची 19 जानेवारी रोजी चार वर्षांसाठी फिफाच्या महत्त्वपूर्ण अर्थ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
- मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये पटेल यांची आशियाई फुटबॉल परिसंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
- पटेल यांच्या प्रमुखपदाच्या काळात भारतात पहिल्यांदा पुढील वर्षी 17 वर्षे गटाच्या फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येत आहे.
- तसेच याशिवाय मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एआयएफएफने एएफसी 16 वर्षे गटाच्या स्पर्धेचे यजमानपददेखील भूषविले होते.
दिनविशेष :
- 20 जानेवारी 1775 हा विद्युत कंपनीचे मापन करण्याचे उपकरण ‘अॅंपिअर’ हे शोधून काढणारा फ्रान्सचे भौतिकशास्त्रज्ञ ‘आंद्रे-मरी अँपियर’ यांचा जन्मदिन आहे.
- स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान यांचा 20 जानेवारी 1988 हा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा