Current Affairs of 21 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (21 जानेवारी 2017)

प्रियांका चोप्राला दुसर्‍यांदा ‘फेव्हरीट ड्रमॅटिक अॅक्ट्रेस’चा पुरस्कार :

  • हॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये ‘फेव्हरीट ड्रमॅटिक अॅक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला आहे.
  • प्रियांकाची हॉलिवूड मालिका ‘क्वॉटिंको’साठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार मिळाला आहे.
  • तसेच या मालिकेत तिने साकारलेली अॅलेक्स पॅरिशचे भूमिका गाजत आहेत. तिच्या अभिनयाचे जगभरातून कौतुक होत आहे.
  • हॉलिवूडमधील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाल्याने प्रियांका सध्या खूश आहे.
  • प्रियांकासोबत लिली सिंग या आणखी एका भारतीय वंशाच्या यूटय़ुब स्टारला ‘पिपल्स चॉईस पुरस्कार’ मिळाला आहे. लिलीला ‘फेव्हरीट यूट्युब स्टार’ या प्रकारात हा पुरस्कार मिळाला.

आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका :

  • भारताची सर्वात मोठी युद्धनौका आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मशिन सॅटेलाईटवर चालणार असून एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.
  • भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे.
  • आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे.
  • आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची 60 मीटर्स उंच असून ही उंची 20 मजली इमारतीएवढी आहे. तिच्या 20 मजल्यांमध्ये 24 डेक्स आहेत. या युद्धनौकेची लांबी 284 मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे.
  • तसेच या युद्धनौकेची 24 विमान आणि 10 हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • 2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती.

ईडन गार्डन्समधील एका स्टॅंडला सौरव गांगुली यांचे नाव : 

  • भारतीय क्रिकेट संघाला आक्रमकतेचे धडे देणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टॅंडला त्यांचे नाव दिले जाणार आहे.
  • गांगुली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टॅंडला दिले जाणार आहे.
  • ईडन गार्डन्स हे मैदान आणि त्याचा परिसर हा लष्कराच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे येथे कोणताही बदल करण्यासाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्‍यक असते.
  • ईडन गार्डन्सवरील काही स्टॅंडची दुरुस्ती, नूतनीकरण आणि त्यांचे नाव बदलण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने लष्कराकडे गेल्या वर्षी परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्याने आता स्टॅंडच्या नामकरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.
  • तसेच याशिवाय, माजी क्रिकेटपटू पंकज रॉय आणि बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बी. एन. दत्त, ए. एन. घोष आणि स्नेहांशू आचार्य यांचेही नाव ईडन गार्डन्समधील स्टॅंडला दिले जाणार आहे.

‘मिशन 11 मिलियन’ मोहीम उपयुक्त ठरणार :

  • भारताच्या यजमानपदाखाली यंदा आयोजित वर्ल्डकप अंडर-17 फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेली ‘मिशन 11 मिलियन’ ही मोहीम भारतीय फुटबॉलला विश्व पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देण्यात महत्त्वाची ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.
  • ‘फीफा अंडर-17 वर्ल्ड कप-2017’ याचे आयोजन म्हणजे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मिशन 11 मिलियन’ मोहीम राबविण्यात येत आहे.
  • प्रफुल्ल पटेल यांची अलीकडे फिफाच्या सर्वांत महत्त्वाच्या वित्त समितीमध्ये निवड झाली आहे.
  • तसेच या व्यतिरिक्त त्यांची आशियाई फुटबॉल परिषदेचे (एएफसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची धुरा सांभाळत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची फिफाचे अध्यक्ष जिएनी इन्फॅन्टिनो यांनी प्रशंसा केलेली आहे.

दिनविशेष :

  • 21 जानेवारी 1894 हा कवी माधव जूलियन उर्फ माधव त्रिंबक पटवर्धन यांचा जन्मदिन आहे.
  • मणिपूरमेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा 21 जानेवारी 1972 रोजी मिळाला.
  • जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन’ ने 21 जानेवारी 1999 रोजी च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
  • 21 जानेवारी 2003 रोजी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.