Current Affairs of 19 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (19 जानेवारी 2017)

नारायण जाधव यांना जीएनएन पुरस्काराने सन्मानित :

  • ‘लोकमत’चे ठाणे जिल्हा ब्युरो चीफ नारायण जाधव यांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल व्दितीय राष्ट्रीय जीएनएन गौरव पुरस्काराने 16 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
  • नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस भागातील मुक्तधरा ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या समारंभात पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुरेश सिंह यांच्या हस्ते जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • देशभरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
  • तसेच यंदा या पुरस्कार सोहळ्याचे व्दितीय वर्ष होते. पाच जणांच्या निवड समितीने पुरस्काराकरिता अंतिम निवड केली होती.
  • निवड समितीमध्ये आयपीपीसीआयचे अध्यक्ष नरेंद्र भंडारी, दिल्ली न्यूज एजन्सीचे अध्यक्ष देवेंद्र पवार, ‘सांध्य वीर अर्जुन’चे वृत्तसंपादक विजय शर्मा, ‘श्रम’ न्यूज चॅनलचे प्रमुख विजय तोगा आणि ‘दी पॉलिटीकल अ‍ॅण्ड बिझनेस’ डेलीच्या चीफ रिपोर्टर अंजली भाटिया यांचा समावेश होता.

रिपाई-भाजपाची युती जाहीर :

  • राज्यातील 10 महापालिका व 25 जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी 18 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
  • रिपाईने केवळ भाजपासोबत युती झाल्यास 60 जागांची मागणी केली आहे.
  • शिवसेना युतीत सामील झाली, तर रिपाईला किमान 40 जागा हव्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
  • वॉर्डनिहाय चर्चेनंतरच जागावाटपाचा निर्णय घेणार असल्याचे रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूमधील सत्यमंगलम अभयारण्य :

  • भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे.
  • सत्यमंगलमला 2008 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन 2011 मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली.
  • 1,411.6 चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. 2013 मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.
  • सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते.
  • 2009 मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे 10 वाघ, 866 भारतीय हत्ती, 672 गवे आणि 27 बिबटे होते.
  • तथापि, 2012 च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत.

दिनविशेष :

  • 19 जानेवारी 1996 रोजी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड झाली.
    तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची 1995 च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
  • 19 जानेवारी 2007 रोजी सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.