Current Affairs of 18 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 जानेवारी 2017)
निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर :
- पेटत्या घरातून एका चिमुकलीचा जीव वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
- देशातील 25 बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील निशाचा समावेश आहे.
- भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
नागालँडचा हॉर्नबिल महोत्सव :
- हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा सर्वात मोठा वार्षिक महोत्सव असून, त्याचा आनंद लुटण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक येथे येतात. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेण्यात येतो.
- राज्याचा पर्यटन विभाग आणि कला व संस्कृति विभागातर्फे किसामा या गावात त्याचे आयोजन करण्यात येते.
- राज्याची राजधानी कोहिमापासून 12 कि.मी.वर असलेले हे गाव नागांचे जीवन आणि त्यांच्या इतिहासाचे दर्शन घडविते.
- हॉर्नबिल महोत्सव सात दिवस चालतो. त्यात नागा जमातीची समृद्ध जीवन संस्कृति दाखविली जाते.
- नागा लोकांच्या टोपीत हॉर्नबिल पक्षाचे पंख असतात. त्यामुळे या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल ठेवण्यात आले आहे.
तारापूरच्या स्वप्नील चाफेकरला सुवर्णपदक :
- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात एम.ए.मध्ये मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान तारापूरच्या स्वप्नील चाफेकर यांनी मिळविला असून 16 जानेवारी रोजी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती डॉ. मुकेश अंबानी यांचे हस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
- तसेच चाफेकर यांचे हे दुसरे सुवर्णपदक असून प्राचीन कला केंद्र, चंदिगढ कडून मिळालेल्या ‘संगीत भास्कर’ या एम.ए. समकक्ष पदवीतही त्याला सुवर्णपदक मिळाले होते.
- झी मराठी सा रे ग म प स्पर्धेतून त्याचे नाव व आवाज महाराष्ट्राला परिचित आहे.
पीयूष लोहिया सीए परीक्षेत देशातून दुसरा :
- ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबर 2016 मध्ये घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पीयूष रमेश लोहिया या विद्यार्थ्याने महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. 71.75 टक्के गुण मिळवून पीयूषने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक मिळविला.
- पीयूषने दोन्ही ग्रुपमधील आठही विषयांची परीक्षा एकदम देऊन 800 पैकी 574 गुण मिळविले.
- लखनऊ येथील इति अग्रवाल 74.88 टक्के गुण मिळवून (599/800) देशात पहिली तर 70.75 टक्के गुण (566/800) गुण मिळविणारी अहमदाबाद येथील ज्योती मुकेशभाई माहेश्वरी देशात तिसरी आली.
- देशभरातील 382 केंद्रांवर एकूण 74 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 36 हजार 768 विद्यार्थ्यांनी ग्रुप-1 व ग्रुप-2 अशा दोन्ही ग्रुपची परीक्षा एकदम दिली होती. त्यातील 11.57 टक्के विद्यार्थी दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले.
दिनविशेष :
- 18 जानेवारी 1842 हा न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्मदिन आहे.
- भारतीय ज्ञानपीठाची स्थापना 18 जानेवारी 1944 रोजी झाली.
- 18 जानेवारी 1972 हा भारतीय क्रिकेट खेळाडू विनोद कांबळी यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा