Current Affairs of 17 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 जानेवारी 2017)
एक जुलैपासून लागू होणार जीएसटी :
- एक एप्रिल 2017 मध्ये लागू होणारे जीएसटी आता लांबवणीवर गेले आहे. एक एप्रिलऐवजी एक जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
- केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे 1 जुलै रोजी जीएसटी प्रणाली देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- प्रस्तावित वस्तू व सेवा कराशी (जीएसटी) संबंधित सर्व प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा केला जाईल आणि ही करव्यवस्था 1 एप्रिलपासून लागू केली जाईल, असा आशावाद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 11 जानेवारी रोजी व्यक्त केला होता.
- मात्र जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीत एक एप्रिल ऐवजी आता एक जुलैला देशात जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
Must Read (नक्की वाचा):
नवज्योतसिंग सिद्धूंचा काँग्रेसमध्ये प्रवेश :
- भाजपचे माजी नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी 15 जानेवारी रोजी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेटू घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- पंजाबमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे.
- दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊऩ सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वीही सिद्धू आणि राहुल यांच्यात चर्चा झाली होती. त्यामुळे सिद्धू यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानण्यात येत होता.
- पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह सिद्धू पक्षाचे स्टार प्रचारक असतील. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
लडाखचे प्रवेशव्दार द्रास :
- लडाखचे प्रवेशव्दार असा ज्याचा उल्लेख केला जातो ते ठिकाण म्हणजे द्रास. जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यापासून 62 किमी अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 3280 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे.
- एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून याची ओळख तर आहेच पण, भारत आणि पाकिस्तानात 1999 ला झालेल्या युद्धाचे हेच ते ठिकाण आहे.
- द्रासच्याजवळ सुरू व्हॅलीत ट्रॅकिंगही करता येते. येथे ‘द्रास वॉर मेमोरियल’ पाहण्यासारखे ठिकाण आहे.
- कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली म्हणून हे स्थापन करण्यात आले आहे. या युद्धात दोन्हीकडील 1200 सैनिक मारले गेले होते.
- तसेच जगातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.
जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे भूमिपूजन :
- गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरा येथे होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गुजरात क्रिकेट संघटनेचे (जीसीए) उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले.
- या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे 700 करोड रुपये खर्च होतील. यावेळी नाथवाणी यांनी घोषणा केली की, या स्टेडियमची निर्मिती दोन वर्षात पुर्ण होईल. जुन्या ‘सरदार पटेल गुजरात स्टेडियम’च्या जागेवर याची उभारणी होत आहे.
- तसेच या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार असून हे स्टेडियम सध्या ऑस्ट्रेलियाच्या 90 हजार प्रेक्षक क्षमतेच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियम पेक्षा मोठे असणार आहे.
दिनविशेष :
- एक प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक ‘बेंजामिन फ्रँकलिन’ यांचा जन्म 17 जानेवारी 1706 रोजी झाला.
- 17 जानेवारी 1945 हा हिंदी व उर्दू भाषांतील कवी व गीतकार जावेद अख्तर यांचा जन्मदिन आहे.
- नवी दिल्ली येथे 17 जानेवारी 1981 रोजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा