Current Affairs of 2 February 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2017)
भारताची मालिका विजयांची हॅटट्रिक :
- भारताने इंग्लंडचा तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात 75 धावांनी पराभव केला आणि मालिका विजयांची हॅटट्रिक केली.
- भारतीय संघाने याच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतही यश मिळवलेले आहे.
- तसेच धावांच्या तडाख्यानंतर यजुवेंद्र चहलने सहा बळी मिळवण्याची करामत केली, त्यामुळे इंग्लंडचे आठ फलंदाज आठ धावांत बाद करून भारताने मोहीम फत्ते केली.
- भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. सुरेश रैना (45 चेंडूंत 63), महेंद्रसिंग धोनी (36 चेंडूंत 56) आणि युवराज सिंग (10 चेंडूंत 27) या सीनिअर्सनी केलेली तुफानी टोलेबाजी महत्त्वपूर्ण ठरली; तर यजुवेंद्र चहल या युवा गोलंदाजाची सहा विकेटची कामगिरी निर्णायक ठरली.
- तसेच चहलने या सामन्यातील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सामनावीरसह मालिकावीरचा किताबही पटकावला.
Must Read (नक्की वाचा):
अर्थसंकल्प 2017 बँकांच्या सक्षमीकरणावर भर :
- केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटलींनी बँकांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.
- अर्थसंकल्पात जेटलींनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी वर्ष 2017-18 साठी दहा हजार कोटींच्या कोटींची तरतूद जाहीर केली आहे.
- ”इंद्रधनुष योजनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दहा हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक असल्यास बँकांसाठी अतिरिक्त निधी दिला जाईल,” असे केंद्रीय अर्थमंत्री जेटली 2017-18 अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले. बुडित कर्जांच्या वसुलीसाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असून दिवाळखोरी जाहीर करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्याचा इशारा दिला आहे.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या अर्थसंकल्पात सात कलमी ‘इंद्रधनुष’ योजना जाहीर केली होती.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दरवर्षी रु.25 हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी आर्थिक वर्ष 2017-18 आणि 2018-19 मध्ये दहा हजार कोटी देण्यात येणार आहे.
सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी ‘स्वयम’ योजना :
- केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ऑनलाईन शिक्षणासहीत रोजगार प्रशिक्षणावरही भर देण्यात आले आहे.
- 2022 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयम’ योजना आणण्यात आली आहे. तर संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून याद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- तसेच IIT, मेडिकलसह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्ड’ स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. शिवाय देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
जोशी हत्या प्रकरणातून साध्वी प्रज्ञाची निर्दोष मुक्तता :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी हत्याप्रकरणातून देवास येथील न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
- साध्वी प्रज्ञा ठाकूर, वासुदेव परमार आणि आनंद राज कटारिया यांच्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार वर्मा यांनी कलम 120 (बी) (गुन्ह्याचा कट) अन्वये 2015 साली दोषी ठरविले होते.
- देवास येथील न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सध्या भोपाळ येथील मध्यवर्ती तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे त्या सध्या पंडित खुशीलाल आयुर्वेद रुग्णालयात उपचार घेत आहेत.
- तसेच मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून केंद्रीय अन्वेषण विभागाने साध्वी प्रज्ञा यांची अलिकडेच निर्दोष मुक्तता केली आहे.
- सुनील जोशी यांची 29 डिसेंबर 2007 साली मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी देवास येथील चुना खादन येथे हत्या केली होती. या हत्या प्रकरणाचा तपास 2011 साली केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.
दिनविशेष :
- 2 फेब्रुवारी हा अमेरिकाचा ग्राउंडहॉग दिन आहे.
- ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1884 रोजी झाला.
- 2 फेब्रुवारी 1917 हा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा