Current Affairs of 2 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (2 एप्रिल 2016)

पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुकमध्ये :

  • प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
  • भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक जास्त गाणी गायिल्याने त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
  • पी. सुशीला मोहन यांनी भारतातील 12 भाषेतून 17,695 गाणी गायली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे, तर अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 17,330 गाणी गायल्याचे नोंद करण्यात आले आहे.
  • रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेली गाणी ही 1960 पासूनची आहेत.
  • तसेच गेल्या पाच दशकाच्या करिअरमध्ये पी. सुशीला मोहन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 एप्रिल 2016)

महाराष्ट्र रत्नांचा गौरव सोहळा :

  • कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून रुग्णांना मुक्त करणारे टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचा ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ पुरस्काराने, जगाला आपल्या आवाजाची भुरळ पाडणाऱ्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, विविध क्षेत्रांत  कर्तृत्वाचा सोनेरी ठसा उमटवणाऱ्या नीता अंबानी यांचा ‘महाराष्ट्र युथ आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने तर ‘बाजीराव मस्तानी’फेम रणवीर सिंह याचा ‘लोकमत अभिमान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
  • ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार विजेत्यांची यादी :  
  • लोकसेवा, समाजसेवा – रज्जाक जब्बारखान पठाण
  • विज्ञान तंत्रज्ञान – प्रा. दिपक फाटक (आयटी तज्ञ)
  • परफॉरमिंग आर्ट – शंकर महादेवन
  • कला – शशिकांत धोत्रे, पेन्सील स्केच
  • क्रीडा – ललिता बाबर
  • रंगभूमी – मुक्ता बर्वे
  • चित्रपट(स्त्री) – अमृता सुभाष
  • चित्रपट(पुरुष) – नाना पाटेकर
  • इन्फ्रास्ट्रक्चर –  सतीश मगर
  • बिझनेस – डॉ आनंद देशपांडे
  • प्रशासन – विभागीय – संदीप पाटील, (जिल्हा पोलिस प्रमुख, गडचिरोली)
  • प्रशासन – राज्यस्तर – अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त

सेबीला सहारा समुहाची मालमत्ता विकण्याची परवानगी :

  • सर्वोच्च न्यायालयाने भांडवली बाजार नियामक मंडळ ‘सेबी‘ला सहारा समुहाच्या 86 मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.
  • मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्यासाठीदेखील वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
  • परंतु सर्कल रेटपेक्षा 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दराने निविदा आल्या नाही तर या मालमत्ता विकू नयेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
  • सुब्रतो रॉय 14 मार्च 2014 पासून तुरुंगात असून न्यायालयाने त्यांच्या जामीनासाठी 10,000 कोटी रूपये रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे.
  • तसेच त्यापैकी 5,000 कोटी रोख तर उर्वरित रक्कम बँक गॅरंटीच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे.
  • सर्व व्याजासह 36,000 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची अवघड अट कंपनीसमोर आहे.
  • सहारा समुहातील गुंतवणूकदारांना ही रक्कम परत केली जाणार आहे.
  • नियोजित रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीच्या विदेशातील मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी सहारा समूहाला मिळाली होती.

ग्रँट इलियटची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती :

  • विश्वचषक टी-20 स्पर्धेत जबरदस्त कामगिरीनंतरही विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या न्यूझीलंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्रँट इलियटने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • इलियटने गतवर्षी वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये आफ्रिकेच्या डेल स्टेनला षट्कार ठोकत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.

सिगारेट कंपन्यांचा ‘उत्पादन बंदी’चा निर्णय :

  • सिगारेट पॅकवर आरोग्यासंबंधी चित्रात्मक इशारा प्रसिद्ध करण्याच्या नवीन नियमाचा विरोध करण्यासाठी आय.टी.सी.,गोडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी यासारख्या बड्या कंपन्यांनी (दि.1) एक अभूतपूर्व निर्णय घेऊन आपल्या कारखान्यातील सिगारेटचे उत्पादन त्वरित थांबविले.
  • सिगारेट पॅकेवर 85 टक्के हिश्श्यावर चित्रात्मक इशारा छापणे बंधनकारक आहे.
  • टोबॅको इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सदस्य असलेल्या या कंपन्या सिगारेटवरील कराच्या स्वरूपात 98 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान करीत असतात.
  • टीआयआय ने एका निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील इशारा प्रसिद्ध करण्याचा नवीन नियम संशयास्पद असल्याने एप्रिल 2016 पासून सिगारेटचे उत्पादन जारी ठेवणे अशक्य आहे.

दिनविशेष :

  • 1679 : औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
  • 1975 : कॅनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे 555.35 टॉवर बांधून पुर्ण झाला.

  • 2011 : अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.