Current Affairs of 1 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 एप्रिल 2016)
पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला :
- राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- याआधीचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के.के. पाठक हे (31 मार्च) निवृत्त झाले.
- रश्मी शुक्ला या सन 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त तसेच आयुक्तपद भूषविले आहे.
- मुंबई पोलिस दलातही त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजावले असून एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.
- पुण्याच्या पोलिस आयुक्त होण्याचा मान मिळवणार्या रश्मी शुक्ला या दुसर्या महिला पोलिस अधिकारी आहेत.
- तसेच यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तपद भूषवले.
- आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
Must Read (नक्की वाचा):
आता रेल्वेचे आरक्षित तिकीट फोनवर रद्द करता येणार :
- 1 एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य होणार आहे.
- फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना 139 क्रमांकावर फोन करावा लागेल.
- तसेच त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल.
- पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.
- रेल्वे तिकिटांचा काळा-बाजार करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवासभाड्याच्या नियमांमध्ये बदल केले होते.
- मात्र गरजू प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता, त्यामुळेच आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी 139 क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधांसाठी टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार :
- दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात (दि.31 मार्च) विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनात नऊ सामंजस्य करार करण्यात आले.
- वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्करोगाचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचार उपलब्ध होणार आहेत.
- बोनमॅरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, त्यामुळे रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थॅलेसेमिया अशा स्वरूपाच्या दुर्धर आजारांच्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल.
- महाराष्ट्र राज्य औषध पुरवठा महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने लागणारे सर्व तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य टाटा ट्रस्ट उपलब्ध करून देणार आहे.
राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात वाढ :
- सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात 31-03-2016 च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
- तसेच वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 13.08 कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.
- सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.
- सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो.
स्वच्छ भारत मोहिमेला जागतिक बॅंकेची मदत :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहीम या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी जागतिक बॅंक 1.5 अब्ज डॉलरची (सुमारे 10 हजार कोटी रुपये) मदत करणार आहे.
- जागतिक बॅंक कर्जाच्या रूपाने ही मदत करणार असून, केंद्र सरकारबरोबरच्या करारावर सह्याही झाल्या.
- 2019 पर्यंत उघड्यावरील शौचाची समस्या संपविण्याच्या हेतूने बॅंकेने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
- जागतिक बॅंक काही राज्य सरकारांना तांत्रिक सहकार्य म्हणून 2.5 कोटी डॉलर (सुमारे 160 कोटी रुपये) देणार आहे.
- जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक ओन रूहल व अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सहसचिव राज कुमार यांनी (दि.30) या संदर्भातील करारावर सह्या केल्या.
- स्वच्छ भारत अंतर्गत पाच वर्षांदरम्यान ग्रामीण विकासावर ही रक्कम खर्च केली जाईल.
रेडीरेकनरमध्ये 7 टक्के वाढ :
- राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे रेडिरेकनर दरात केवळ 7 टक्के वाढ करण्यात आल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
- राज्यातील वेगवेगळ्या भागातून रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारडे दाखल झाल्या आहेत.
- 2010 साली या दरात 14, 2011-18, 2013-27 आणि 2014-22 टक्के असा वाढविला होता.
दिनविशेष :
- 1578 : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे यांचा जन्म.
- 1882 : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.
- 1889 : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक यांचा जन्म.
- 1920 : पंडित रविशंकर यांचा जन्म.
- 1933 : भारतीय विमानदलाची स्थापना.
- 1935 : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
- 1941 : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
- 1969 : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
- 2004 : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा