Current Affairs (चालू घडामोडी) of 2 April 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. राजस्थान मध्ये उंट हत्याबंदी
2. मिसाओ ओंकावा यांचे निधन
3. ‘आयसीसी’ अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा राजीनामा
4. मोबाइलसाठी आता एमएस-डॉस ऑपरेटिंग सिस्टम
5. दिनविशेष 

राजस्थान मध्ये उंट हत्याबंदी :

  • राजस्थान मध्ये उंट हत्या बंदी विधेयक मान्यता देण्यात आली.
  • उंटांची संख्या वाढविण्यासाठी राजस्थान सरकारने उंटाचे तात्पुरते स्थलांतर किंवा निर्यात बंदी विधेयक सभागृहात मान्य करण्यात आले.
  • उंटाची हत्या व बेकायदा वाहतूक करणार्‍यास 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

मिसाओ ओंकावा यांचे निधन :

  • जगातील सर्वात वृद्ध महिला मिसाओ ओंकावा यांचे बुधवारी जपानमध्ये निधन झाले.
  • त्या 117 वर्षाच्या होत्या.
  • त्यांची 114 व्या वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात वयोवृद्ध म्हणून नोंद झाली होती.

‘आयसीसी’ अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा राजीनामा :

  • विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयी संघाला करंडक देण्याचा मान न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष मुस्ताफ कमाल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मोबाइलसाठी आता एमएस-डॉस ऑपरेटिंग सिस्टम :

  • मायक्रोसॉफ्टने आपली एमएस-डॉस ऑपरेटिंग सिस्टम लुमिय मोबाइलकरिता सादर केली.

दिनविशेष :

  • 1679औरंगजेब बादशहाने हिंदूंवर जिझिया कर बसविण्यास सुरुवात केली.
  • 1934महाराजा रणजीतसिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रणजी करंडक’ या नावाने क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
  • 1975 – रशियन बुद्धिबळ खेळाडू अॅनातोलि कॉरपॉव्ह हा बुद्धिबळाचा जागतिक विजेता ठरला.
  • 2011भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.