Current Affairs (चालू घडामोडी) of 1 April 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर |
2. | आंतरराष्ट्रीय क्रिकेटला डॅनियल व्हिटोरीचा अलविदा |
3. | नरसिंह राव यांचे स्मारक उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय |
4. | सुट्टीच्या कामाचे वेतन मिळणार पोलिसांना |
आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा विराट कोहली चौथ्या स्थानावर कायम राहिला
- तर शिखर धवन सहाव्या व कर्णधार महेंद्रसिंह धोनीहा पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत आहे.
- आयसीसी कडून ऑस्ट्रेलियाला 1 लाख 75 हजार डॉलरचे आणि भारताला 75 हजार डॉलरचे बक्षीस मिळाले आहे.
Must Read (नक्की वाचा):
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला डॅनियल व्हिटोरीचा अलविदा :
- न्यूझीलंडच्या महान फिरकीपट्टू डॅनियल व्हिटोरीने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा मंगळवारी केली.
- 18 वर्षाच्या कारकीर्तीत डॅनियल व्हिटोरीने कसोटी, टी-20 तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 705 बळी टिपले आहेत.
- डॅनियल व्हिटोरीची क्रिकेटची 18 वर्षाची कारकीर्त आहे.
नरसिंह राव यांचे स्मारक उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय :
- मोदी सरकारने देशाचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक पी.व्ही.नरसिंह राव यांचे दिल्लीत स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- नरसिंह राव हे भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जातात.
सुट्टीच्या कामाचे वेतन मिळणार पोलिसांना :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय दिला आहे.
- सुट्टीच्या दिवशी काम केल्याबद्दल पोलिसांना 68 रुपये मिळत होते तर आता एका दिवसाचे वेतन मिळणार आहे.
- या निर्णयामुळे पोलिसांना सुमारे 490 ते 900 रुपये वेतन मिळणार आहे.
- तसेच मुंबई पोलिसांच्या भत्यात सरकारने वाढ केली आहे.