Current Affairs (चालू घडामोडी) of 4 April 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. मरियम सिद्दीकीचा भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक
2. विश्र्वनाथन आनंदचे आंतराळातील लघुग्रहाला नाव
3. ब्रॅंडन मॅक्युलमला ‘रिचर्ड हॅडली’ पुरस्कार प्रदान
3. सायना नेहवाल मलेशियन स्पर्धेत पराभूत 

मरियम सिद्दीकीचा भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक :

  • मुंबईची 12 वर्षीय मरियम सिद्दीकीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवत गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • 3 हजाराहून अधिक स्पर्धकांना मागे टाकून तिने विजेतेपद पटकावले आहे.

विश्र्वनाथन आनंदचे आंतराळातील लघुग्रहाला नाव :

  • बुद्धिबळपट्टू विश्र्वनाथन आनंदच्या नावावरून अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे ‘विशी आनंद 4528′ त्याचे नामकरण झाले नव्हते अमेरिकेतील लघुग्रह केंद्राचे सदस्य मायकेल मांडला होता.

  • या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या लघुग्रहाचे नामकरण ‘विशी आनंद 4528’ असे करण्यात आले.


ब्रॅंडन मॅक्युलमला ‘रिचर्ड हॅडली’ पुरस्कार प्रदान : 

 

  • न्यूझीलंडच्या कर्णधार ब्रॅंडन मॅक्युलमला न्यूझीलंडचा सर्वोकृष्ट पुरस्कार  ‘रिचर्ड हॅडली पदक’ देऊन गौरविण्यात आले.

  • विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला विंसर कप देऊन गौरविण्यात आले.

  • ब्रॅंडन मॅक्युलमची आयसीसी संघाच्या कर्णधारपदी देखील निवड करण्यात आली.

सायना नेहवाल मलेशियन स्पर्धेत पराभूत :

  • मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची अव्वल बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल पराभूत झाली आहे.
  • चीनच्या ली झुएरुई हिने 13-21, 21-17, 22-20 असा सायनाचा पराभव केला.
  • तिसर्‍यांदा सायनाना मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यत पोहचली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.