Current Affairs of 19 November 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2015)
नवीन शिक्षण धोरणासंदर्भातला महाराष्ट्र राज्याचा मसुदा मागे घेतला :
- नवीन शिक्षण धोरणासंदर्भातला महाराष्ट्र राज्याचा मसुदा प्रखर टीकेनंतर अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे.
- विद्यार्थ्यांना शाळेचे ठराविक तासांचे बंधन करावे, त्यासाठी शाळा 6 ऐवजी 8 तास असाव्यात, या मसुद्यातल्या शिफारशीवर टीकेची झोड उठल्यानंतर हा मसुदा मागे घेण्यात आला असून, नवा मसुदा येत्या दोन आठवड्यांत तयार करण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात येणार आहे.
- त्यासाठी प्रत्येक राज्याकडून शिफारशी मागवण्यात आल्या आहेत.
- त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने शिक्षणक्षेत्रातल्या तज्ज्ञ, मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या चर्चासत्रानंतर “महाराष्ट्र रिपोर्ट ऑन नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी”अशा शीर्षकाखाली हा मसुदा शिक्षण विभागाने संकेतस्थळावर अपलोड केला.
Must Read (नक्की वाचा):
“गुगल”ला एखादा प्रश्न विचारने आता आणखी सोपे होणार :
- लोकप्रिय सर्चइंजिन असलेल्या “गुगल”ला एखादा प्रश्न विचारने आता आणखी सोपे होणार आहे.
- सर्च करताना यापुढे मोजके आणि नेमके शब्द वापरण्याची गरज पडणार नसून “गुगल”च्या नव्या सर्च पर्यायामुळे युजरच्या लिखाणाच्या सवयीनुसार “सर्च” करता येईल.
- त्यामुळेच युजर्सना नवा आणि वेगळा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
- जास्त शब्दांचा वापर, कठीण प्रश्न आणि वाक्प्रचारही सहज शोधता येतील, अशी सुविधा “गुगल”ने “सर्च इंजिन”मध्ये दिली आहे.
- “गुगल”ने 2012 मध्ये सुरू केलेल्या “नॉलेज ग्राफ” प्रकल्पाचा हा एक भाग आहे.
- “गुगल वेब” आणि ऍप्लिकेशनच्या वापरकर्त्यांना ही सुविधा देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह चीनला शासकीय दौऱ्यासाठी रवाना :
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चीनला शासकीय दौऱ्यासाठी रवाना झाले.
- हा संपूर्ण दौरा सहा दिवसांचा असेल.
- या दौऱ्यामध्ये राजनाथसिंह चीनचे प्रीमियर ली केक्वियांग यांना भेटणार आहेत.
- तसेच, चीनचे गृहमंत्री गुओ शेंगकून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
‘इन्स्टंट आटा नूडल्स‘च्या विक्रीस एफएसएसएआय परवानगी दिली नसल्याचा खुलासा :
- योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने सोमवारी सादर केलेल्या ‘इन्स्टंट आटा नूडल्स‘च्या विक्रीस भारतीय अन्न सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाने (एफएसएसएआय) परवानगी दिली नसल्याचा खुलासा एका वृत्तपत्राने केला आहे.
- तरीही पतंजली आटा नूडल्सच्या पाकीटांवर एफएसएसएआयने दिलेला परवाना क्रमांक देण्यात आल्याचे समोर आले आहे.
- पतंजलीच्या नूडल्सची विक्री पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी :
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या भारताच्या रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी मारली आहे.
- नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार तो 13 व्या क्रमांकावर आला आहे.
- ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन या क्रमवारीत अद्याप प्रथम क्रमांकावर कायम आहे.
- जडेजाने पहिल्या कसोटीत 8 बळी, तर पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या कसोटीतील एका डावात चार बळी घेतले आहेत.
इंदिरा गांधी स्मृती पुरस्कारांची घोषणा :
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
- मोबाइल किरणोत्सर्गाबाबत जनजागृती केल्याबद्दल हिंदी चित्रपट अभिनेत्री जुही चावला, धावपटू कविता राऊत, लेखिका-कवयित्री कविता महाजन, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, शिक्षणतज्ज्ञ फरीदा लांबे, उद्योजक मेघा फणसाळकर आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राही भिडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारी आणि काँग्रेसचे मुख्य सचिव जनार्दन द्विवेदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा :
- भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
- न्या. ठाकूर 3 डिसेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत.
- विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे 2 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
- न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.
- न्या. ठाकूर यांची सरन्यायाधीशपदाची मुदत 4 जानेवारी 2017 रोजी संपुष्टात येणार आहे.
दिनविशेष :
- नागरिक दिन
- 1946 : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
- 1969 : अपोलो 12तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
- 1999 : चीनने शेन्झू 1 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- 1917 : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्मदिन