Current Affairs of 18 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 नोव्हेंबर 2015)

केंद्र सरकारची जाम योजना :

 • प्रधानमंत्री जनधन योजनेत वर्षभरात देशात अठरा कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत.
 • या योजनेची व्याप्ती वाढवत याला मोबाईलची जोड देण्यात येणार आहे.
 • यासाठी जनधन, आधार आणि मोबाईल यांचा एकत्रित आविष्कार असणारी जाम (JAM) योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.
 • तसेच देशातील संपूर्ण 585 कृषी बाजार समित्यांना एकत्रित जोडण्यात येणार आहे.
 • यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास बाजाराची संकल्पना अमलात आणली आहे.
 • सर्व राज्यांना राष्ट्रीय कृषी विकास बाजार स्थापना अनिवार्य असून जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी व्यक्त केला.

भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर :

 • भारतातील इंटरनेट युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डिसेंबर 2015 अखेरीस भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार असल्याची माहिती इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि इंडियन मार्केट मार्केट रिसर्च ब्युरोने (आयएमआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 • ऑक्‍टोबर 2015 अखेर भारतामध्ये एकूण 37.5 कोटी इंटरनेट युजर आढळून आले आहे.
 • सध्या इंटरनेट युजर्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने डिसेंबर 2015 अखेरपर्यंत भारतामध्ये 40.2 कोटी इंटरनेट युजर्स असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.
 • अशाप्रकारे अपेक्षित वाढ झाली तर भारत अमेरिकेला मागे टाकणार असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार आहे.
 • याबाबतीत जगामध्ये चीन सर्वांत पुढे असून तेथे 60 कोटी इंटरनेट युजर्स आहेत.
 • गेल्या दशकभरात भारतामध्ये इंटरनेट युजर्समध्ये 1 कोटी वरून 100 कोटी एवढी वाढ झाली आहे.
 • तर मागील तीन वर्षात ही संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोचली आहे.
 • याचाच अर्थ असा की डिजीटल इंडस्ट्रीमध्ये भारत मोठी झेप घेत असून भारतामध्ये ई-कॉमर्सला मोठी संधी आहे असेही अहवालात पुढे म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन :

 • रामजन्म चळवळीतील अग्रणी, विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप) ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन झाले. ते अविवाहित होते.
 • 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात कारसेवकांचा मोठा सहभाग होता.
 • सिंघल यांचा जन्म 2 ऑक्‍टोबर 1926 रोजी झाला.

‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल :

 • मॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या ‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने सर्वोच्च Maggiन्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
 • त्यामुळे मॅगीची न्यायालयीन लढाई संपलेली नाही.
 • फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने अगदी सुरुवातीस म्हणजे 5 जून रोजी मॅगीवर बंदी आणली होती.
 • तर लगेचच 6 जून रोजी राज्य सरकारने मॅगीवर बंदी आणली होती.
 • या बंदीच्या विरोधात मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

बेलफास्ट, लिव्हरपूल येथील विद्यापीठांचे संशोधन :

 • कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, आता पॅरिसमधील हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जन कुणी किती कमी करायचे यावर तू-तू-मैं-मैं होईल, पण प्रत्यक्षात हे उत्सर्जन वातावरणात पसरू नये यासाठी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे.
 • त्यांनी एका सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते, परिणामी ते वातावरणात मिसळत नाही.
 • सच्छिद्रतेचा गुणधर्म असलेला द्रव जगात प्रथमच तयार करण्यात आला आहे.
 • ब्रिटनमधील बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठ व लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी हा नवीन द्रव शोधून काढला आहे.
 • त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू विरघळवता येतात.
 • हे वायू द्रवाच्या सच्छिद्रता गुणधर्मामुळे शोषले जातात.
 • अनेक पर्यावरण स्नेही रासायनिक प्रक्रिया यातून शोधता येतील.
 • सध्या कार्बन पकडून तो समुद्राच्या तळाशी गाडला जातो, त्याला कार्बन सिक्वेट्रेशन असे म्हणतात त्यापेक्षा तो सच्छिद्र द्रवाने पकडता येत असेल तर ते जास्त फलदायी आहे.
 • ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

दिनविशेष :

 • 1493 : क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.Dinvishesh
 • 1803 : हैतीमधील क्रांती-व्हेर्तियेरेसची लढाई.
 • 1905 : डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
 • 1918 : लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
 • 1963 : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.