Current Affairs of 20 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2015)

अनीश कपूर यांची नियुक्तीची शिफारस रद्द :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला “हिंदू तालिबान” असे म्हणणारे मूळ भारतीय वंशाचे ब्रिटिश मूर्तिकार अनीश कपूर यांची जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी करण्यात आलेली नियुक्तीची शिफारस अखेर रद्द करण्यात आली आहे.
 • राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तेथील जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी कपूर यांची शिफारस केली होती.
 • कपूर यांनी मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान “गार्डीयन”मधील एका लेखात भारतातील वर्तमान सरकारला “हिंदू तालिबान शासन” असे संबोधले होते.
 • लेखामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी मोदींसोबत कोणताही करार न करण्याचा सल्लाही कपूर यांनी दिला होता.
 • तसेच, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू तालिबानचा प्रसार होत असल्याचा आरोपही त्यांनी लेखाद्वारे केला होता.
 • कपूर हे मूळ मुंबईचे असून ते ब्रिटनमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहेत.
 • दरम्यान, नेहरू कला केंद्राच्या नियामक मंडळावरील त्यांच्या नियुक्तीची शिफारस रद्द करण्यात आली आहे.
 • त्यांच्यासह इतर 11 जणांच्या नावांची 16 नोव्हेंबर रोजी नियामक मंडळासाठी शिफारस करण्यात आली होती.
 • मात्र, शिफारस करण्यात आलेली एकूण 12 जणांची यादीच रद्द करण्यात आल्याची माहिती राजस्थानचे पर्यटनमंत्री कृष्णेंद्र कौर यांनी दिली आहे.

पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर :

 • दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 35 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
 • बारगड जिल्ह्यातील सोहेला येथे आयोजित कृषी मेळाव्यामध्ये पटनाईक यांनी या पॅकेजची घोषणा केली.
 • पॅकेजमधील ऐंशी टक्के रक्कम ही कृषिविकासावर खर्च केली जाणार असून, आठ हजार कोटी रुपये जलसिंचन, तेरा हजार कोटी रुपये ग्रामीण भागातील विद्युतीकरण आणि पंधरा हजार कोटी रुपये जलसिंचन प्रकल्पांच्या विकासावर खर्च केले जाणार आहे.
 • तसेच पटनाईक यांनी बारगड जिल्ह्यामध्ये दोन मध्यम स्वरूपाच्या जलसिंचन प्रकल्पांच्या उभारणीची घोषणा केली.
 • यातील एक प्रकल्प ओंग नदीवर उभारला जाणार असून, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
 • तर दुसरा प्रकल्प जीरा नदीवर उभारण्यात येईल, यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत.
 • या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

सर्वांत श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले :

 • फोर्ब्ज नियतकालिकाने जाहीर केलेल्या अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले आहे.
 • चाळिशीच्या आतील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांची यादी फोर्ब्जने प्रसिद्ध केली आहे.
 • फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्गने या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.
 • विवेक रामास्वामी (वय 30) हा भारतीय वंशाचा तरुण 50 कोटी डॉलरचा मालक असून, तो 33 व्या स्थानावर आहे. गुंतवणूक हा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे.
 • अपूर्व मेहता (वय 29) हा इंस्टाकार्ट या दैनंदिन वापरातील वस्तू पुरविणाऱ्या वेब कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
 • त्यांची संपत्ती 40 कोटी डॉलरएवढी असून, तो 40 व्या स्थानावर आहे.

फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस आज भारताच्या दौर्‍यावर :

 • भारताने प्रस्ताव केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस भारतात येत आहेत.
 • तसेच पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी हवामान परिषदेच्या तयारीबाबतही या वेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
 • या परिषदेच्या तयारीसाठी फॅबियस यांनी आखलेल्या दौऱ्याचा भारत हा पहिला टप्पा आहे.
 • यानंतर ते दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि कॅनडा या देशांचा दौरा करणार आहेत.
 • पॅरिस हवामान परिषद 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर यादरम्यान होणार आहे.
 • या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 80 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य :

 • सुरक्षाविषयक मुद्यांबाबत सहकार्य आणि समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य केले.
 • गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या यंत्रणेद्वारे दहशतवाद, तस्करी आणि अमलीपदार्थांच्या व्यवसायासारखे प्रश्‍न हाताळण्यात येतील.
 • मंत्रीस्तरीय यंत्रणा उभारल्यानंतर त्याला कराराचे स्वरूप दिले जाऊन हा करार शेन्गुन यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या भारत भेटीवेळी पूर्ण करण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
 • दहशतवाद, सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी आणि अंमलीपदार्थ तस्करी, असे विषय यापुढे याच यंत्रणेमार्फत हाताळले जाणार आहेत.
 • ही मंत्रीस्तरीय समिती दरवर्षी भेट घेऊन झालेल्या कामाचा आढावा घेईल, असे ठरले आहे.
 • याशिवाय या समितीला दोन्ही देशांमधील सहसचिव पदावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एक समिती सहाय करेल.

जनलोकपाल विधेयकाला मंजुरी :

 • दिल्ली सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली.
 • या विधेयकामुळे आता भ्रष्टाचारविरोधी संस्थेची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान सादर केलेल्या प्रस्तावानुसारच जनलोकपाल विधेयक असणार आहे, असा दावा सरकारने केला आहे.
 • दिल्ली सरकार लवकरच जनलोकपाल विधेयक विधानसभेत सादर करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.

सांस्कृतिक मंत्रालयाची गृहमंत्रालयाकडे शिफारस :

 • स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ) यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
 • सांस्कृतिक मंत्रालयाने या बाबतची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविली आहे.
 • स्वयंपाक ही एक कला असल्याने या पाककलेचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत सात भारतीय महिलांची निवड :

 • भारतीय महिलांची क्षमता आणि कर्तृत्वाचे दर्शन पुन्हा एकदा जगाला घडले आहे.
 • गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्यासह सात भारतीय महिलांची निवड बीबीसीने खूप प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत केली आहे.
 • राजकारण, विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रभावशाली, जागतिक नेत्या असलेल्या व तुलनेने कमी लोकप्रिय परंतु महत्त्वाकांक्षी अशा 100 महिलांची यादी बीबीसी दरवर्षी करीत असते.
 • इतर भारतीय महिलांध्ये रिम्पी कुमारी (शेती), मुमताज शेख (कॅम्पेनर) स्मृती नागपाल आणि कनिका टेकरीवाल (जोखीम घेऊन उद्योग सुरू करणारा) यांचा समावेश आहे.

दिनविशेष

 • लोकशिक्षण दिन
 • बालक हक्क दिन
 • 1917 : युक्रेन प्रजासत्ताक झाले.
 • 1984 : सेटीची स्थापना.
 • 1985 : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज 1.0 ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
 • 1998  : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.