Current Affairs of 19 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2017)

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारीचा राजीनामा :

  • सातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला राजीनामा दिला.
  • विशेष म्हणजे, कंपनीचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना कंटाळून सिक्का यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
  • दोन लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या इन्फोसिसच्या नवीन एमडी आणि सीईओंची नियुक्ती आता 31 मार्च 2018 पर्यंत करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यमान परिचालन अधिकारी प्रवीण राव यांची हंगामी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली.
  • तसेच कंपनीचे काम सुरळीत चालावे, यासाठी सिक्का काही काळ कार्यकारी उपाध्यक्षपदी राहतील. वार्षिक 1 डॉलर वेतनावर ते नव्या सीईओचा शोध घेण्यास मदत करणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2017)

राज्य सरकारकडून प्रदूषणकारी कंपनी बंद करण्याचा आदेश :

  • कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान-चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डुकॉल ऑर्गेनिक्‍स ऍण्ड कलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिला.
  • एमआयडीसीतील प्रदूषणामुळे श्‍वान, तसेच चिमण्यांचे रंगही निळे झाल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यामुळे अखेर ‘एमपीसीबी’ला ही कारवाई करावी लागली.
  • 24 तासांत या कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.
  • आशिया खंडातील सर्वांत मोठी तळोजा औद्योगिक वसाहत प्रदूषणामुळे पोखरून निघाली आहे. या प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच मुक्‍या जिवांनाही बसत असल्याचे वर्तमानपत्राने उघड केले होते.
  • आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी परिसराचा दौरा केला. पाहणीदरम्यान वृत्तात तथ्य आढळून आल्यानंतर मोहेकर यांनी कंपनी बंद करण्याचा आदेश दिला.

भारताकडून व्हिएतनामला ब्राह्मोस क्षेपणास्त्र :

  • भारत आणि चीनमध्ये सिक्किम सीमेवरील डोक्लाम भागात महिन्याभरापासून जोरदार तणातणी सुरु आहे.
  • भारत आणि चीनमधील तणाव वाढला असताना भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. त्यामुळे आता चीनचा आणखी जळफळाट होण्याची शक्यता आहे.
  • चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यातच आता भारताने व्हिएतनामला मदत केल्याने चीन आणखी आक्रमक होऊ शकतो.
  • मात्र भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिएतनामसोबत असा काही व्यवहार झाला का, यावर भारताकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
  • ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. व्हिएतनामकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनच्या विरोधात समुद्री सीमेवर तैनात केले जाऊ शकते.
  • दक्षिणी चिनी समुद्रात हे दोन देश वारंवार एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळेच व्हिएतनामकडून भारताला करण्यात आलेल्या मदतीमुळे चीन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.

डोकलाम प्रकरणी चीनविरोधात भारताला जपानची साथ :

  • डोकलाम प्रश्नी चीनबरोबर सुरू असलेल्या वादात जपानने भारताला पाठिंबा दिला आहे.
  • वादग्रस्त क्षेत्रात पूर्वीची स्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत जपानने चीनला ठणकावले आहे.
  • सिक्किम-तिबेट-भूतान परिसरात असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ता निर्मितीचा प्रयत्न केला होता. हा परिसर भूतानचा आहे.
  • तसेच सामारिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसर असल्यामुळे भारताने चिनी सैन्याला रस्ता बनवण्यापासून रोखले हेाते. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे आहेत.
  • चीनने रस्त्याचे काम सुरू करून भूतानबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला आहे. जपानच्या भूमिकेमुळे भारताला नैतिक समर्थन मिळाले आहे.

दिनविशेष :

    • 19 ऑगस्ट 1918 हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर द्याळ शर्मा यांचा जन्मदिन आहे.
    • भारतीय ज्येष्ठ समाजसेविकालेखिका डॉ. सुधा नारायण मुर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.