Current Affairs of 20 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2017)
व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ विकण्याच्या वृत्ताचे भारताकडून खंडन :
- ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.
- व्हिएतनामला ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा करार झाल्याचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला.
- व्हिएतनामबरोबर सुरक्षा क्षेत्रातील आमची भागीदारी सातत्याने वाढत आहे. परंतु, क्षेपणास्त्र विक्रीवरून करार झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
50 रूपयांच्या नव्या नोटेची वैशिष्ट्ये :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून लवकरच ती बाजारात येणार आहे.
- 50 रूपयांच्या या नव्या नोटेवर महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. तसेच या नोटेवर बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
- या नव्या नोटेवर देशाचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे. नोटेच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपीचे छायाचित्र आहे.
- गतवर्षी डिसेंबर महिन्यातच आरबीआयने लवकरच 50 आणि 20 रूपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचे जाहीर केले होते.
- 50 रूपयांच्या नव्या नोटेचा रंग हा फिकट निळा आहे. ही नोट आकाराने 135 मिमी लांब आणि 66 मिमी रूंद आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक डिझाइन आणि पॅटर्न आहेत.
नोटेचा समोरील भाग पुढील प्रमाणे असेल :
- 1. नोटेच्या वरील भागात डाव्याबाजूस 50 असे अंकी लिहिलेले असेल. प्रकाशातही हा अंक आरपार दिसेल.
- 2. देवनागरी भाषेत 50 लिहिलेले आहे.
- 3. मध्यभागी महात्मा गांधी यांचे छायाचित्र
- 4. छोट्या अक्षरात ‘RBI’, ‘INDIA’ आणि ’50’ असे लिहिलेले असेल.
- 5. नोटेत सुरक्षा धागा असेल ज्यावर भारत आणि RBI असले लिहिलेले असेल.
- 6. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नर यांची स्वाक्षरी त्याचबरोबर प्रॉमिस क्लॉज आणि महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्याबाजूस आरबीआयचे चिन्ह.
- 7. उजव्या बाजूस अशोक स्तंभ
- 8. 50 रूपयांचा वॉटरमार्क
- 9. नोट क्रमांक पॅनल असेल. यात अंकांचा आकार मोठा होत जाईल.
ट्रायचे कंपन्यांना आदेश कॉल ड्रॉप झाल्यास किंमत चुकवा :
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत.
- तसेच यानुसार दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठीच्या नियमांचा लागोपाठ 3 महिने भंग झाल्यास 10 लाखांचा दंड आकारला जाईल.
- ‘कॉल ड्रॉप’ प्रकरणात 1 ते 5 लाख इतका दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार एखाद्या कंपनीच्या कामगिरीवर दंड ठरवण्यात येईल.
- ‘दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या एखाद्या कंपनीला सलगच्या तिमाहींमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येईल. तर लागोपाठ तीन महिन्यांमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.
भारतात येणार अमेरिकेचं तेल :
- इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने(बीपीसीएल) चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे.
- इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदवली तर 10 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली.
- भारत हा जगातील तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे.
- तर चीन, द. कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकचे तेल खरेदी करणारा चौथा देश बनला आहे.
- आता भारतात पहिल्या खेपेत येणारे 2 लाख बॅरल तेल 10 कोटी डॉलर्स किंमतीचे आहे.
भारत करणार चीनचा पराभव
- भारताने वीज, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुरवठ्यासाठी संबंधित नियम अजून कडक करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. यामुळे चीनी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणं कठीण होईल.
- सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (CEA) देशातील पॉवर स्टेशन्स आणि स्मार्ट ग्रिड सिस्टम्सला सायबर हल्ल्यांपासून रोखण्यासाठी ज्या प्रकारचा रोडमॅप तयार करत आहे, त्यामुळे चिनी कंपन्यांना यामध्ये प्रवेश करणं कठीण होणार आहे.
- त्याचप्रमाणे टेलिकॉम सेक्टरमध्येही सुरक्षेचे नियम अजून कठीण केले जाण्याची शक्यता आहे.
आता पोलीसच खेळणार ‘ब्ल्यू व्हेल’ :
- जगभरात आतापर्यंत शेकडो मुलांचा जीव घेणाऱ्या व भारतातही दहशत निर्माण करणारा ‘ब्ल्यू व्हेल’ हा ऑनलाइन गेम आता खुद्द पोलीसच खेळणार आहेत.
- हा गेम खेळणारा आत्महत्येसाठी का प्रवृत्त होतो? गेमचा अॅडमिन त्याला नेमका कसा जाळ्यात अडकवतो?; याचा तपास करण्यासाठी ‘ब्ल्यू व्हेल’चं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे.
भारत बनेल पहिला एलईडी स्वयंपूर्ण देश :
- आगामी दोन वर्षांमध्ये (2019 पर्यंत) सर्वप्रकारच्या प्रकाशविषयक गरजा भागविण्यासाठी केवळ एलईडी दिव्यांचा वापर करणारा पहिला देश म्हणून भारताची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
- एलईडी दिव्यांमुळे ऊर्जेच्या वापरात बचत होऊन दर वर्षी 40 हजार कोटी रुपयांची बचत करण्यात येणार आहे. त्यासाठी 2019चे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
- केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वीजबचत करण्यासाठी आतापर्यंत 25.5 कोटी एलईडी बल्ब, 30.6 लाख एलईडी ट्यूब आणि 11.5 लाख ऊर्जा कार्यक्षम पंख्यांची विक्री करण्यात आली आहे.
जपानचा भारताला पाठिंबा :
- डोकलामच्या मुद्द्यावर जपानने भारताला पाठिंबा दिला आहे.
- डोकलाम प्रश्नी भारताला उघड पाठिंबा देणारा जपान हा पहिलाच देश आहे.
- अमेरिका आणि ब्रिटनने भारताचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे, मात्र दोन्ही देशांनी उघडपणे भारताची बाजू घेतलेली नाही.
- जपानच्या भूमिकेमुळे भारताचे राजनैतिक पातळीवरील यश अधोरेखित झाले आहे.
दिनविशेष :
- 1885 : इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना.
- 1991 : एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
- 1944 : राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्मदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा