Current Affairs of 18 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2017)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर :
- सन 2014-15 आणि 2015-16 वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- 2014-15 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी राज्यभरातून 19 ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे.
- तसेच 2015-16 सालासाठी एकूण 13 ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची निवड करण्यात आली आहे.
- वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयांना पुरस्कार दिला जातो.
- ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून जनतेला चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर्सला मंजूरी :
- भारतीय लष्करासाठी 4,168 कोटी रुपये खर्च करून सहा ‘अॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
- प्रभावी युद्धसज्जतेसाठी लढाऊ हेलिकॉप्टर मिळावीत ही लष्कराची फार काळापासूनची प्रलंबित मागणी होती. ही ‘अॅपाचे’ हेलिकॉप्टर मिळाल्यावर लष्करास तशा प्रकारची हेलिकॉप्टर प्रतणच उपलब्ध होतील.
- तसेच नौदलाच्या युद्धनौकांसाठी 490 कोटी रुपये खर्च करून दोन गॅस टर्बाईन खरेदी करण्याच्या प्रस्तावासही ‘डीएसी’ने मंजुरी दिली.
जनतेच्या शिफारशीने मिळणार पद्म पुरस्कार :
- विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी भारत सरकारतर्फे जाहीर होणारे ‘पद्म’ पुरस्कार यापुढे देशातील जनतेच्या शिफारशींवरून दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- निती आयोगाने उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड विविध मंत्रालयांच्या शिफारशींच्या आधारे केली जात असे. केंद्र सरकारने यात थोडी सुधारणा करून केवळ सरकारी शिफारशीचे बंधन काढून टाकले आहे. यापुढे देशातील कोणीही नागरिक ‘पद्म’ पुरस्कारासाठी नावांची ऑनलाइन शिफारस करू शकेल.
- तसेच या बदलामुळे प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करणार्या खर्या ‘हीरों’च्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक नागरिक आपल्या परीने देशासाठी काही तरी करू शकतो आणि तो तसे करत असतो असा आमच्या सरकारचा दृढ विश्वास आहे व म्हणूनच देशाला बलवान करण्यासाठी नागरिकांच्या या बलस्थानांचे एकत्रीकरण करणार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे कालवश :
- शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे 17 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
- सराफी व्यवसाय सांभाळून त्यांनी आयुष्यभर शेतकर्यांसाठी लढा दिला.
- समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. साने गुरुजींचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
- सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आणि संचालक होते.
- तसेच अंत्रोळी येथे नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या साथीने त्यांनी गावकर्यांसाठी दूध संस्था सुरू केली.
दिनविशेष :
- मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1699 मध्ये झाला.
- नेताजी सुभाषचंद्र बोस –
(बंगाली – सुभाष चॉन्द्रो बॉसु) (23 जानेवारी 1897 (जन्मदिन) – 18 ऑगस्ट 1945 (स्मृतीदिन ?) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात.
तसेच दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’ चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा