Current Affairs of 19 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2016)

भारतीय महिला मल्ल साक्षीची ऐतिहासिक कामगिरी :

  • रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पदकाची प्रतीक्षा असणाऱ्या भारतीयांसाठी महिला कुस्तीगीर साक्षी मलिकने कास्य पदकाची भेट दिली.
  • महिला कुस्तीतील 56 किलो वजनी गटात साक्षीने पिछाडी भरून काढत किरगिझस्तानच्या असुलू तिनीबेकोव्हा हिचा 8-5 असा पराभव केला.
  • ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत पदक मिळविणारी साक्षी पहिली महिला खेळाडू, तर ऑलिंपिक पदक मिळविणारी ती चौथी महिला खेळाडू ठरली.
  • तसेच यापूर्वी करनाम मल्लेश्‍वरी (2000 सिडनी), मेरी कोम (2012, लंडन), साईना नेहवाल (2012, लंडन) यांनी ऑलिंपिक पदक मिळविले होते.
  • मल्ल साक्षी मलिक ही 29 ऑगस्ट रोजी खेलरत्नची मानकरी ठरेल.
  • राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार निवड समितीने देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर तसेच नेमबाज जितू राय यांच्यासोबतच साक्षीच्या नावाची श्फिारस केली आहे.
  • 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक नंतर 2009 मध्ये ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, बॉक्सर विजेंदरसिंग आणि पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम.सी. मेरिकोम यांना एकाचवेळी खेलरत्नने सन्मानित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2016)

वनविभागातर्फे विशेष मोहीमला प्रारंभ :

  • नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
  • पाच-सहा टप्प्यांवर अर्थात 30 हेक्टरवर आठ उपयुक्त गवतांची लागवड करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे़ याचा पहिला टप्पा म्हणून 5 हेक्टरवर या गवतांची लागवड करून माळढोक वाढीच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.
  • नान्नज अभयारण्यातून पक्ष्यांनी पाठ फिरवली, त्यामागे अनेक कारणे आहेत़ त्यातील मुख्य कारण म्हणजे गवत आणि कीटकसंख्या़ पूर्वी या संपूर्ण क्षेत्रफळात बहुतांश उपयुक्त गवत होते़.  
  • कालांतराने उपयुक्त गवत कमी होत गेल्याने कीटकांची संख्या कमी होत गेली़ त्याचबरोबर काळवीट आणि ससे यांचीही संख्या रोडावत गेली़ खूप गांभीर्याने घेण्यासारखी ही बाब आहे.  
  • तसेच परिणामत: एकेकाळी शंभराच्या जवळपास माळढोक पक्ष्यांची संख्या होती, आता एक-दोनवर असल्याचा सर्वेक्षणातील अंदाज आहे़.  
  • निसर्गाच्या साखळीतील ही कडी सुस्थितीत ठेवण्यासाठी वनखात्याचे उपवन संरक्षक सुभाष बडवे यांनी कुरण व्यवस्थापनांतर्गत ह्यउपयुक्त गवतह्ण लागवडीची मोहीम हाती घेतली आहे.

उसेन बोल्टला आणखी एक सुवर्णपदक :

  • रिओ ऑलिंपिकमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकाविले आहे.
  • तसेच यापूर्वी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे.
  • उसेनने 200 मीटरचे अंतर 19.78 सेकंदात पूर्ण केले. याच स्पर्धेत कॅनडाच्या ऍड्रे डे ग्रासे याला रौप्यपदक, तर फ्रान्सच्या क्रिस्तोफीला कांस्यपदक मिळाले.
  • विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या कालावधीत त्याने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
  • स्पर्धेनंतर ‘मी जगात महान आहे हे सिद्ध करण्यासाठी मला आता आणखी काहीही करण्याची गरज नाही‘, अशा प्रतिक्रिया उसेनने व्यक्त केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर करणार डोंजा गावाचा विकास :

  • माजी कसोटीपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावाचा विकास करण्यास पुढाकार घेतला आहे.
  • खासदार आदर्श ग्राम योजनेतून गावाचा विकास करण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे गाव दत्तक घेतले आहे.
  • सचिनने डोंजा गावाची निवड केल्याबद्दल आनंद वाटतो. सचिनच्या या कृतीने या परिसरातील अन्य गावांतही विकासाचे हे मॉडेल राबवले जाईल, अशी भावना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी व्यक्त केली.

नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घोषित :

  • भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादव आपले निर्दोषत्व सिद्ध करू न शकल्यामुळे ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने (सीएएस) त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो रिओ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
  • (दि.18) भारतात दिवसभर साक्षी मलिकने कांस्यपदक मिळविल्याचा आनंद साजरा करण्यात येत होता. तर संध्याकाळी पी.व्ही.सिंधूचे पदक निश्‍चित झाल्याची आनंदवार्ताही आली होती.
  • तसेच दरम्यान रात्री उशिरा नरसिंग यादव स्पर्धेतून बाहेर झाल्याचे समोर आले आहे. 74 किलो वजनीगटाच्या प्रकारात (दि.19) यादवची लढत होणार होती.
  • नरसिंगच्या ऑलिंपिक सहभागास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) हिरवा कंदील दिला असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.
  • नरसिंगच्या स्पर्धेतील प्रवेशाबाबतची केवळ अधिकृत घोषणाच बाकी होती.
  • मात्र रिओतील स्थानिक प्रमाणवेळेनुसार सीएएसने वाडाचा निर्णय बाजूला ठेवत नरसिंगला स्पर्धेपासून दूर ठेवून चार वर्षांची बंदी लादली आहे.

दिनविशेष :

  • जागतिक छायाचित्र दिन.
  • 1871 : ऑर्व्हिल राईट, विमान विद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू यांचा जन्म दिन.
  • 1903 : गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक यांचा जन्म दिन.
  • 1918 : डॉ. शंकर द्याळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म दिन.
  • 1950 : डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका यांचा जन्म दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.