Current Affairs of 20 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2016)
ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही. सिंधूला रौप्य पदक :
- अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने भारताच्या पी.व्ही. सिंधूला 19-21, 21-12, 21-15 असे हरवून 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकले.
- ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली.
- सिंधूने पिछाडीवरुन येवून पहिला गेम जिंकल्यामुळे भारतीय चाहत्यांची सुवर्णपदकाची आस आणखीनच तीव्र बनली परंतु वर्ल्ड चॅम्पियन मारिनने आपला सर्व अनुभव पणाला लावून दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये सिंधूचा पराभव केला.
- अंतिम सामन्यात पराभूत झाली असली तरी सिंधूने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करुन सव्वाशे कोटी भारतीयांची मने मात्र जिंकली आहेत.
- जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला कांस्यपदक मिळाले.
- तसेच उपांत्य सामन्यात सिंधूने ओकुहारा हिला तर कॅरोलिना मारिनने गत चॅम्पियन चीनच्या ली जुईरुईचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
Must Read (नक्की वाचा):
उसेन बोल्टची ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ हॅटट्रीक :
- जगातील सर्वांत वेगवान धावपटू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे जमैकाचा उसेन बोल्ट.
- एखादी रेस सहज जिंकणा-या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकत धावपट्टीवरचा बादशहा आपणच असल्याचे सिद्ध केले आहे.
- जमैकाला 4 बाय 100 रिलेत सुवर्णपदक मिळाले असून यानिमित्ताने उसेन बोल्टने आपलं ट्रिपल ट्रिपल साजरे केले.
- तसेच या सुवर्ण पदकासोबत सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच अॅथलिट ठरला आहे.
- उसेन बोल्टच्या खात्यात तीन ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदके जमा झाली आहेत.
- नऊ सुवर्णपदके जिकंणारा आजवरचा चौथाच खेळाडू ठरण्याचा मानही उसेन बोल्टला मिळाला आहे.
- बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग, 2012 सालच्या लंडन आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटरचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
महाराष्ट्र सदनात उभारणार लोकमान्य टिळकांचा पुतळा :
- दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- तसेच त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
- या समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
- मार्चमध्ये महाराष्ट्र सदनात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या पुतळ्याबाबत आढावा घेण्यात आला होता. या वेळी तिथे लोकमान्य टिळकांचा पुतळा नसल्याचे समोर आले होते.
- त्यामुळे महाराष्ट्र सदनाच्या स्वागत कक्षाच्या मध्यभागी लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला.
आज (दि.20) नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन :
- नरेंद्र दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते.
- तसेच त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स.1989 साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापन केली.
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.
- दाभोलकरांना मिळालेले पुरस्कार-
- समाज गौरव पुरस्कार – रोटरी क्लब
- दादासाहेब साखवळकर पुरस्कार
- शिवछत्रपती पुरस्कार – कबड्डी
- शिवछत्रपती युवा पुरस्कार – कबड्डी
- पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
- भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)
- अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने 2013 सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे.
- पहिल्याच वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.
- नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट, 2013 सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी 4 गोळ्या झाडून हत्या केली.
साक्षी मलिकला एअर इंडियाकडून बिझनेस क्लास तिकीट :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पहिलवान साक्षी मलिक हिला एअर इंडिया नेटवर्कने कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट बक्षीसरूपाने देण्याची घोषणा केली आहे.
- साक्षी एका वर्षाच्या आत हे तिकीट घेऊ शकते. पूर्ण देशभरात हरियाणाच्या साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच एअर इंडियाने साक्षीला ही अनोखी भेट दिली आहे.
- विशेष म्हणजे, जिंकल्यानंतर साक्षीने तिची विमानाने फिरण्याची इच्छा असल्यामुळे आपण खेळाडू बनलो, असे म्हटले होते.
- एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी साक्षीला एक पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, देशाला रिओत ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकून दिल्याचा एअर इंडियाच्या कुटुंबास तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.
दिनविशेष :
- 1885 : इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना.
- 1920 : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
- 1937 : प्रतिभा रानडे, कथा – कादंबरीकार यांचा जन्म दिन.
- 1944 : राजीव गांधी, भारतीय माजी पंतप्रधान यांचा जन्म दिन.
- 2008 : भारताचा खेळाडू सुशीलकुमार याला बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या प्रकारात ब्रॉंझ पदक मिळाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा